घरात लहान मूल असणं म्हणजे आईसाठी नेहमीच एक काळजीचे कारण ठरते. विशेषतः मुलांना सतत सू सू होत असते अथवा शी होत असते त्यामुळे त्वचेवर येणाऱ्या रॅशेसने मूल अधिक चिडचिडे होते. साधारण 2 – 8 वर्षांच्या मुलांसाठी या समस्या अतिशय त्रासदायक ठरतात. पण आई आणि बाळाचा विचार करून आता ‘सुपरबॉटम्स’ ही अशी पहिली कंपनी आहे ज्यांनी लहान मुलांसाठी आरामदायी अंडरवेअर्स आणि सुपर लाँड्री शीट्सचा विचार करत याचे उत्पादन बाजारात आणले आहे. वाढत्या मुलांची चिडचिड कमी व्हावी आणि त्यांना योग्य आराम मिळावा हाच विचार करून वाढत्या मुलांसाठी याचे खास डिझाईन्स करून घेण्यात आले आहे. याची अधिक माहिती घेण्यासाठी सुपरबॉटम्स (SuperBottoms) च्या संस्थापक पल्लवी उटगी यांच्याशी आम्ही बोललो.
100 टक्के कॉटनचा वापर
बाळाला डायपर घालूनही बऱ्याचदा रॅश येण्याच्या समस्या होतात. पल्लवी उटगी यांनी या नव्या अंडरवेअरबाबत सांगितले. जे शंभर टक्के कॉटनपासून तयार करण्यात आले असून बाळाच्या त्वचेसाठी आणि हायजीनसाठीही उत्तम आहे. तसंच हे ऑर्गेनिक कॉटन असून बाळाला लघ्वी केल्यानंतरही ओलेपणा न जाणवता कोरडेपणा जाणवतो आणि त्यामुळे बाळ चिडचिडेपणा करत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे धुता येते आणि याचा पुनर्वापर करता येतो. डायपर एकदा वापरल्यानंतर फेकून द्यावे लागते मात्र या अंडरवेअरचा हा फायदा होतो. तसंच अन्य डायपरच्या तुलनेत हे 70 टक्के कमी महाग असून अधिक काळ टिकणारे आहे. तसंच नैसर्गिक वापर अर्थात इको – फ्रेंडली उत्पादन असून पर्यावरणालाही यामुळे हानी पोहचत नाही असे हे उत्पादन बनविण्यात आल्याचे पल्लवी यांनी सांगितले आहे.
काय आहे सुपर लाँड्री शीट्स
बाळाचे कपडे धुण्यासाठी आपण नेहमीचे साबण वापरल्यास, ते व्यवस्थित धुतले जात नाहीत आणि बाळाच्या त्वचेसाठी हे अजिबातच चांगले नाही. खास बाळाचे कपडे धुण्यासाठी इको-फ्रेंडली आणि स्किन फ्रेंडली असे हे सुपर लाँड्री शीट्स बनविण्यात आले आहेत. नवजात बाळ आणि मुलांच्या कपड्यांसाठी आणि डायपर्ससाठी हे खास डिटर्जंट्स बनविण्यात आले आहेत, जेणेकरून मुलांना कोणताही त्रास होऊ नये. यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स वापरण्यात आलेले नाही अशी माहिती पल्लवी यांनी दिली. तसंच ज्या व्यक्तींची त्वचा संवेदनशील आहे त्या व्यक्तीदेखील याचा वापर करू शकतात असंही त्यांनी सांगितले. जेव्हा आपण नियमित लाँड्री डिटर्जंटचा वापर करतो तेव्हा त्यात फॉस्फेट्स, एसएलएस अशा गोष्टींचा वापर करण्यात आलेला असतो. ज्यामुळे त्वचेला त्रास होतो. मात्र लहान मुले आणि पर्यावरणाचा विचार करून पहिल्यांदाच असे सुपर लाँड्री शीट्स बनविण्यात आले आहेत ज्याचा वापर नवजात आई अथवा संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तीही करू शकतात. भारतामध्ये ही संकल्पना पहिल्यांदाच राबविण्यात आल्याचेही पल्लवी यांनी आम्हाला सांगितले आहे. तसंच यामुळे वेळही वाचतो आणि तुम्हाला अथवा अगदी पर्यावरणालाही कोणती हानी पोहचत नाही. पर्यावरणाला जी हानी पोहचली आहे त्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्ही अगदी लहान पाऊल उचलले असल्याचीही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. लहान मुलांच्या सुरक्षेसाठीच आमचा प्रयत्न कायम राहील असंही त्यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची किंमतही अवास्तव नसून 10, 45, 90 शीट्सची किंमत अनुक्रमे 99, 420 आणि 790 रूपये अशी आहे. त्यामुळे सगळ्याच बाबतीत फायदा असल्याचेही दिसून येत आहे. तुम्ही तुमच्या बाळाच्या त्वचेसाठी काळजीत असाल तर तुम्ही नक्कीच याचा एकदा वापर करून बघायला काहीच हरकत नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक