पहिल्यांदा आई होणं ही भावनाच काही वेगळी असते. बाळासह आईचाही जन्म होत असतो. कारण पहिल्यांदा बाळाला जन्म देताना आईला बाळाची काळजी कशी घ्यायची (lahan balachi kalji kashi ghyavi) याचा अजिबातच अनुभव नसतो. नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी (navjat balachi kalji in marathi) यासाठी अनेक जणी अगदी गरोदरपणातही पुस्तकं वाचतात. पण बाळाचा जन्म झाल्यानंतरच त्याचा खरा अनुभव येऊ लागतो. बाळाची काळजी कशी घ्यावी (Baby Care Tips) या पहिल्यांदाच आई होणार असणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी गरजेच्या आहेत. लहान बाळाची काळजी कशी घ्यावी, त्याचे खाणे पिणे, पोषण आणि त्याची स्वच्छता यावर विशेष लक्ष द्यावे लागते. नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी हे या लेखातून आपण जाणून घेऊया.
Table of Contents
- नवजात बाळाचे पोषण (Nourishment Of Newborn Baby)
- बाळाला कसे हाताळावे (Handling A Newborn)
- बाळाला कसे घालावे डायपर (Diapering Tips For Newborn Babies)
- बाळाला आंघोळ घालण्याच्या टिप्स (Bathing Basics For Newborn Babies)
- नवजात बाळाला कसे द्यावे स्तनपान (Feeding And Burping Your Newborn Baby)
- बाळाला कसे झोपवावे (Sleeping Basics Of Newborn Babies)
- गरोदरपणानंतरच्या काही महत्त्वाच्या बाबी (Some Important Things After Delivery)
- प्रश्नोत्तरे (FAQ’s)
नवजात बाळाचे पोषण (Nourishment Of Newborn Baby)
आपल्या पहिल्या डिलिव्हरीच्या वेळी आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत नसतात. सर्वात पहिले हॉस्पिटलमध्ये आपल्या डॉक्टरांकडून नवजात बाळाची काळजी (navjat balachi kalji in marathi) घेताना बाळाला दूध कसे पाजावे (Baby Food) आणि त्यावेळी बाळाचं पोषण कसे करावे याबाबत जाणून घ्यायला हवे. बाळाच्या जन्मानंतर प्रत्येक आई आणि बाबा आनंदी असतात. मात्र हे प्रेम करताना त्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे.
- नवजात बाळाला दूध पाजताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. स्तनपान (Breast Feeding) करत असाल तर बाळाच्या भूकेच्या हिशेबानेच त्याला दूध पाजावे. नवजात बाळांना जेव्हा भूक लागते तेव्हा ते रडू लागतात आणि आपल्या हाताची बोटं तोंडात घालतात तेव्हा आईने समाजावे की, त्याला भूक लागली आहे आणि त्याला स्तनपान द्यावे
- स्तनपान चालू नसेल आणि बाटलीने दूध पित असेल तरीही बाळाच्या भुकेच्या वेळेलाच त्याला दूध द्यावे. अन्यथा त्याला पचत नाही. नवजात बाळाला साधारण 3-4 तासाने दूध पाजणे गरजेचे आहे. तुम्ही स्तनपान देत असाल तर किमान 10-15 मिनिट्सपर्यंत स्तनपान बाळाला द्यावे
- तुमचे बाळ व्यवस्थित स्तनपान करत नसेल अथवा दूध पिण्याची इच्छा दाखवत नसेल तर त्वरीत आपल्या डॉक्टरांना संपर्क साधावा
- सगळीच नवजात बालकं स्तनपानावेळी तोंडात हवा भरून घेतात ज्यामुळे त्यांचे पोट फुलते. त्यामुळे स्तनपान करून झाल्यावर बाळाला वरच्या दिशेने पकडावे आणि पाठीवर थोपटावे जेणेकरून बाळाला ढेकर येऊन पोटातील हवा निघून जाते
- स्तनपान देत असणाऱ्या आईने योग्य खाण्यावर लक्ष द्यावे
बाळाला कसे हाताळावे (Handling A Newborn)
नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेताना बाळाला कसे हाताळावे आणि नक्की कोणत्या गोष्टी कराव्यात हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
- बाळाशी सतत बोलावे – हे कदाचित तुम्हाला सुरूवातीला थोडे अजीब वाटते. मात्र आईने सतत आपल्या बाळाशी बोलावे. नवजात बाळाच्या मेंदूसाठी हे गरजेचे आहे. नवजात बाळाचा मेंदू विकसित होण्यासाठी आईने आणि घरातील सर्वांनी त्याच्याशी सतत बोलत राहायला हवे. यामुळे ध्वनी आणि शब्दांची मेंदूमध्ये सक्रियता राहते.
- रडायला लागल्यावर बाळाला हलवू नये – आपण नेहमी पाहतो की, बाळ रडायला लागल्यावर अनेक जण त्याला कुशीत घेऊन हलवू लागतात. बेबी केअर टिप्समध्ये मात्र याला मनाई केली आहे. नवजात शिशु रोग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुलांना असे हलविण्याने त्यांच्या मेंदूला झटका बसू शकतो, त्यामुळे बाळाच्या डोक्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. मुलांना असे हलविण्यापेक्षा त्यांना उचलून हळूहळू चाला आणि त्यांची पाठ थोपटा. तसंच आई म्हणून तुम्ही त्यांच्यासमोर गाणे गुणगुणत राहिलात तरीही त्यांना बरं वाटतं
- त्वचेचा स्पर्श आहे गरजेचा – आई झाल्यानंतर तुम्हाला सर्वात जास्त लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे बाळाला तुमचा स्पर्श सतत देणे. बाळाला तुमच्या स्पर्शातूनच प्रेम आणि काळजी कळते. तुमच्या बाळाला तुमच्या अंगाची उष्णता जाणवू देणेही गरजेचे आहे. याला कांगारू केअर असेही म्हटले जाते. आईने नेहमी आपल्या नवजात बाळाला छातीशी कवटाळावे. हे बाळाला उष्णतेसह त्यांचे हृदयाचे ठोके नियमित करण्यासही मदत करते. तसंच त्वचेच्या स्पर्शामुळे बाळांचा विकासही उत्तम होतो असे अभ्यासात सांगण्यात आले आहे.
- बाळाला कसे कुशीत घ्यावे – नवजात बाळांना प्रेम आणि काळजी ही मुख्यत्वे हवी असते. त्यामुळे आईने नेहमी त्यांना छातीशी कवटाळावे आणि त्यांना कुशीत घ्यावे. जेणेकरून बाळ शांतपणे झोपते. जास्तीत जास्त आईचा स्पर्श होणे गरजेचे आहे
वाचा – 5 महिन्याच्या बाळाचा आहार
बाळाला कसे घालावे डायपर (Diapering Tips For Newborn Babies)
काही जण बाळांना डायपर घालतात. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणि सुविधेनुसार डायपरच्या कपड्यांसाठी डिस्पोजेबल डायपरचा वापर करू शकता. मात्र तुम्हाला हे दिवसातून 10 वेळा बदलावे लागणार. त्यासाठी तुम्ही कसे डायपर वापरावे ते जाणून घ्या.
- डायपर बदलताना कसे हाताळावे – एक स्वच्छ डायपर अथवा स्वच्छ फोल्ड केलेला कॉटनचा कपडा, डायपर ऑईंटमेंट, कोमट पाणी, पुसण्यासाठी स्वच्छ कपडा, कापूस हे सर्व बाळासाठी कायम तयार असावे
- एकदा डायपर खराब झाल्यानंतर त्वरीत ते डायपर काढून टाकावे. त्यानंतर बाळाला पोटावर झोपवा आणि कोमट पाण्यात कापूस बुडवून बाळाचा मागचा भाग अगदी अलगद हाताने स्वच्छ करा आणि सुक्या कपड्याने पुसून घ्या. जेणेकरून रॅश येणार येणार नाहीत
- त्यानंतर डायपर ऑईंटमेंट लावा आणि मग नवे डायपर घाला. तसंच नवं डायपर लगेच घालू नका. डायपरमुळे बाळाची त्वचा लगेच लाल होते. कारण त्याची त्वचा अत्यंत नाजूक असते. तसंच तुम्ही अँटिबॅक्टेरियल पावडरचाही उपयोग करून घेऊ शकता
- डायपरमुळे सतत त्वचा लाल होत असेल तर मात्र तुम्ही त्वरीत डॉक्टरांना संपर्क साधावा
- कोणते कपडे घालावेत – आपल्या बाळाला नेहमी स्वच्छ कपडे घालावेत याची काळजी घ्या. रंगीत कपडे घालण्यापेक्षा पांढरे आणि कॉटनच्या कपड्यांना प्राधान्य द्या. तसंच कपड्यांना बटण आणि पिन्ससारख्या गोष्टी असू नयेत याची काळजी घ्या
बाळाला आंघोळ घालण्याच्या टिप्स (Bathing Basics For Newborn Babies)
नवजात शिशुला आंघोळ घालण्यासाठी काही ठिकाणी अनुभवी मावशींना बोलावण्यात येते. पण तुम्हाला तुमच्या बाळाला आंघोळ घालायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
- बाळाला कशी घालावी आंघोळ – आंघोळ घालताना गर्भनाळ ओली करू नये. साधारण एक महिन्यापर्यंत नाभी ओली ठेवावी लागते. बाळाला आंघोळ घालताना Baby Soap, Baby Shampoo याचाच वापर करावा. चांगल्या कंपनीचे उत्पादनच वापरावे.
- बेबी ऑईल (Baby Oil) ने बाळाचा मसाज करावा. सतत झोपून असल्याने बाळाचे अंग आखडते. मसाजमुळे त्याला बरे वाटते आणि त्याचे शरीरही मजबूत होते. आंघोळ झाल्यावर स्वच्छ टॉवेलने हळूवर बाळाला पुसावे
- बाळाला आंघोळ घालताना त्याच्या डोळ्यात आणि कान, नाकात पाणी जाणार नाही याची काळजी घ्या. आंघोळीनंतर कापसाने त्याचे डोळे, कान, नाक व्यवस्थित हलक्या हाताने पुसून घ्या
- बाळ थोडेसे मोठे झाल्यावर तुम्ही त्याला टबमध्ये आंघोळ घालू शकता. त्यासाठी तुम्ही कोमट पाणी घ्या आणि नंतर बसून आंघोळ घाला. बसण्यासाठी बाळ तयार असेल तेव्हाच हे करू शकता
- स्वतःची स्वच्छता ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. दिवसातून आईनेही दोन वेळा किमान आंघोळ करावी. घामट शरीर ठेऊ नये
नवजात बाळाला कसे द्यावे स्तनपान (Feeding And Burping Your Newborn Baby)
स्तनपान देणाऱ्या मातांना नेहमीच काळजी घ्यावी लागते. स्तनपान करताना बाळाला व्यवस्थित श्वास घेता येईल आणि आपल्या स्तनांखाली त्याचा चेहरा गुदमरला जाणार नाही याची नीट काळजी घ्या
- बेबी फिडिंग बाटलीची स्वच्छता – ज्या महिला स्तनपान देत नाहीत आणि बाळ बाटलीने दूध पित आहे, त्यांनी फिडिंग बाटलीची स्वच्छता नीट करायला हवी. अन्यथा बाळाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. नियमित स्वरूपात फिडिंग बाटली स्टर्लाईज करा. दूध पाजण्यापूर्वी बाटली नीट स्वच्छ धुवा. निप्पलची स्वच्छता ठेवा. अन्यथा बाळ आजारी पडू शकते
- दूध पाजल्यावर ढेकर का आवश्यक – दूध पाजल्यावर बाळाला ढेकर देणे आवश्यक आहे. फिडिंगनंतर बाळाला छातीशी कवटाळून हलके हलके थोपटा. असं केल्यावर बाळाला ढेकर येतो. हा ढेकर पोटात गेलेली हवा काढून टाकतो. त्यामुळे बाळाला त्रास होत नाही आणि बाळ शांतपणे झोपते
बाळाला कसे झोपवावे (Sleeping Basics Of Newborn Babies)
नवजात बाळ हे साधारणतः दिवसातून 16 तासांपेक्षा अधिक वेळ झोपते. 3-4 तासाने भूक लागल्यावर उठते आणि दूध पिऊन परत झोपणे हाच बाळाचा काही दिवस दिनक्रम असतो. मात्र त्याची काही विशिष्ट वेळ नसते. बाळ उठत नसेल तर तुम्ही त्याला 4 तासाने उठवायलाच हवे.
- बाळाला कसे झोपवावे – बाळाला दिवस आणि रात्र समजायला वेळ लागते. साधारण पहिले तीन महिने बाळ दिवसभर झोपते आणि रात्री जागते. बाळाला झोपवताना कोणत्याही प्रकारची उशी अथवा डोक्याखाली उंच गोष्ट ठेऊ नये. कारण यामुळे बाळाला SIDS होण्याची शक्यता असते. बाळ एकाच बाजूला झोपत असेल तर तुम्ही त्याची बाजू बदला. बंद खोलीत बाळाला झोपवू नका. वेंटिलेशन असेल अशाच खोलीत झोपवा. जेणेकरून त्याला स्वच्छ हवा मिळेल.
- बाळाच्या रडण्यावर द्या लक्ष – काही लोकांचं म्हणणं असतं की लहान मूल रडतंच. पण हा विचार अयोग्य आहे. बाळ रडतं त्याचे काही ना काही तरी कारण असतंच. त्याला कोणत्या तरी गोष्टीची गरज असते. खाणे आणि झोपणे या दोन गोष्टीसाठी हमखास नवजात बाळ रडते. बाळ रडत असेल तर लक्ष द्या. आधी त्याला दूध द्या. त्यानंतरही रडत असेल तर त्याला थोपटून झोपविण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरही रडत असेल तर त्याला बरं वाटत नाही हे समजा आणि डॉक्टरांकडे त्वरीत न्या.
गरोदरपणानंतरच्या काही महत्त्वाच्या बाबी (Some Important Things After Delivery)
डिलिव्हरीनंतर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी.
- बाळाला काय हवंय जाणून घेण्याची लावा सवय – आपल्या बाळाला नक्की काय हवंय याची सवय करून घ्या. भूक आणि झोप या दोन महत्त्वाच्या गोष्टी बाळाला हव्या असतात. वेळेवर त्याचे पोट भरणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याला विशिष्ट वेळेत दूध पाजत राहा. तसंच झोपल्यानंतर त्या ठिकाणी जास्त गोंधळ नसेल याची काळजी घ्या. स्तनपान देऊन बाळाचे पोट व्यवस्थित भरते आहे की नाही याचीदेखील नीट तपासणी करा. पोट भरत नसेल तर बाटलीने दूध पाजा
- गादीपासून खेळणी ठेवावीत दूर – बाळासाठी आपण अनेक खेळणी आणतो. पण बाळ झोपताना कितीही सॉफ्ट खेळणी असतील तरी बाळ झोपले आहे त्याठिकाणापासून दूर ठेवा. बाळाच्या झोपेत ही खेळणी व्यत्यय आणतात. तसंच बाळाला लागण्याचीही शक्यता असते. मुलायम खेळण्यांनी बाळाच्या त्वचेला अलर्जी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे शक्यतो दूरच ठेवा
प्रश्नोत्तरे (FAQ’s)
1. बाळाची काळजी घेताना आईची चिडचिड होऊ शकते का?
पहिल्यांदाच आई झाल्यावर काही गोष्टी कळत नाहीत. आजूबाजूला कोणी सांगायला नसेल आणि झोपही अपूर्ण होत असेल तर चिडचिड होणं हे साहजिक आहे. पण सतत चिडचिड करू नका. स्वतःवर नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करा
2. बाळाला कपड्यांमध्ये कसे ठेवावे?
बाळाचे हात पाय सरळ रेषेत राहावे यासाठी काही महिने बाळाला कापडात गुंडाळून त्याचे हातपाय बांधून ठेवावे लागतात. यासाठी तुम्ही नर्स अथवा घरातील मोठ्या माणसांकडून व्यवस्थित प्रशिक्षण घ्यावे. कापड नेहमी कॉटनचेच वापरावे.
3. बाळाला गाणे ऐकवणे योग्य आहे का?
बाळाला झोपवताना तुम्हाला जसे येईल तसे गाणे तुम्ही म्हणा. रेकॉर्डेड गाणे ऐकवण्यापेक्षा याचा बाळावर जास्त चांगला परिणाम होतो. तसंच तुमच्याशी बाळ अधिक चांगले जवळीक साधते.