ADVERTISEMENT
home / Travel in India
भारतात River Rafting साठी ही ठिकाणे आहेत बेस्ट

भारतात River Rafting साठी ही ठिकाणे आहेत बेस्ट

रिव्हर राफ्टिंग (River Rafting) एक रोमांचक आणि उत्साहवर्धक असा खेळ आहे. त्यामुळे लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध मंडळींपर्यंत रिव्हर राफ्टिंगचं क्रेझ पाहायला मिळतं. रिव्हर राफ्टिंग करणं कठीण असून त्यामुळे तुमच्या जीवाला धोका असू शकतो असं सांगितलं जातं. मात्र असं मुळीच नाही जर तुम्ही सुरक्षेची साधने वापरली आणि तज्ञ्ज व्यक्तीच्या सोबत रिव्हर राफ्टिंग केलं तर तुम्हाला या खेळाचा खरा आनंद नक्कीच लुटता येतो. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही रिव्हर राफ्टिंग करू शकता. यासोबतच भारतात अशी देखील अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही सोलो ट्रॅव्हल करू शकता. भारतात एकट्या प्रवाश्यांसाठी उत्तम ठिकाणे (Places For Solo Travelers In India In Marathi)

रिव्हर राफ्टिंग हा एक साहसी खेळ असून नदीच्या उंचसखल भागात खेळला जातो. नदीच्या मोठमोठ्या लाटांमधून बोटीत बसून तुम्हाला तरंगत जायचं असतं. वॉटर राफ्टिंग अशा ठिकाणीच केलं जातं जिथे पाणी फार खोल नसेल मात्र प्रवाह जोरदार असेल. राफ्टिंगसाठी रबरापासून तयार केलेल्या हलक्या बोटी वापरल्या जातात. शिवाय तुम्हाला पाण्यात पडल्यास तरंगण्यासाठी सुरक्षित हेल्मेट आणि फ्लोटिंग सूट घालण्यास सांगण्यात येतो. रिव्हर राफ्टिंग करताना तुम्हाला अचूक मार्गदर्शन मिळाले तर तुम्ही पाण्यात न पडता मस्त राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता. मात्र काही कारणाने जरी तुम्ही पाण्यात पडला तरी तुम्ही फ्लोटिंग सूटमध्ये पाण्यावर तरंगत राहता आणि हेल्मेटमुळे तुम्हाला गंभीर दुखापत होत नाही. तेव्हा मनसोक्त भटका आणि शेअर करा 100+ Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi

भारतातील रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळे (River Rafting In India)

रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी तुम्हाला परदेशात जाण्याची गरज नाही, भारतातही अनेक ठिकाणी तुम्ही या साहसी खेळाचा आनंद नक्कीच घेऊ शकता.

सिक्किम,दार्जिलिंग तीस्ता नदी 

सिक्किीम आणि पश्चिम बंगालमध्ये वाहणारी तीस्ता नदी रिव्हर राफ्टिंगसाठी बेस्ट आहे. ही नदी गंगटोकपासून कलिपोंग, दार्जिलिंगमध्ये वाहत जाते. तुम्ही जर या ठिकाणी फिरायला जाणार असाल तर तुम्हाला रिव्हर राफ्टिंग करण्याची आयती संधी मिळू शकते. तीस्ता नदीत तुम्ही ऑक्टोबर ते अगदी एप्रिलपर्यंत रिव्हर राफ्टिंग करू शकता. कारण इतर महिन्यांमध्ये पाण्याचा प्रवाह जोरदार असतो आणि पर्यटनही बंद असते. तीस्तानदीत रिव्हर राफ्टिंग करताना तुम्हाला निसर्ग रम्य डोंगरांचे दर्शन आणि थंड गार पाणी अंगावर घेण्याचा अनुभव मिळतो. नुकताच मी माझ्या कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत तीस्ता नदीत रिव्हर राफ्टिंग करण्याचा अनुभव घेतला.

ADVERTISEMENT

ऋषीकेश गंगा नदी

ऋषीकेशमध्ये वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र गंगा नदीत राफ्टिंग करण्याचा एक वेगळाच आनंद आहे. उत्तराखंडमध्ये फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गंगा नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग करायलाच हवं. ऋषीकेशमध्ये फिरायला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये या साहसी खेळाचं सर्वात जास्त क्रेझ दिसून येतं. ऋषीकेशमध्ये तुम्हाला जून ते सप्टेंबर महिन्यात रिव्हर राफ्टिंग करता येतं. शिवाय पर्यटनासाठीही ऋषीकेश खूपच छान आहे.

उत्तराखंड अलकनंदा नदी

उत्तराखंडमधील अलकनंदा नदीदेखील भारतात रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. या नदीत राफ्टिंग करणं हे साहसी आणि आव्हानात्मक आहे. कारण ही नदी गंगा नदीची एक मुख्य उपनदी आहे. जी गढवाल, चमोली, रूद्रप्रयागपासून वाहत जाते. तुम्हाला या ठिकाणी जून ते सप्टेंबर महिन्यात रिव्हर राफ्टिंग करता येईल.

लडाखमध्ये सिंधू नदी

अनेकांना वाटत असतं की रिव्हर राफ्टिंग करणं फक्त परदेशांमध्ये प्रचलित आहे. मात्र असं मुळीच नाही भारतातही अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला हा रोमांचक अनुभव घेता येतो. तुम्ही जर लडाखला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तिथेही रिव्हर राफ्टिंग करता येतं. जम्मू आणि काश्मिरच्या सिंधू नदीत तुम्हाला हा अनुभव घेता येईल. सिंधू नदी ही आशियातील सर्वात मोठी नदी आहे. या ठिकाणी तुम्हाला बर्फाच्छादित डोंगर आणि त्यात व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेता येईल. या नदीतही साधारणपणे जूलै ते सप्टेंबर महिन्यात रिफ्टर राफ्टिंग सुरू असतं.

कुर्ग बारपोल नदी

दक्षिण भारतातही कुर्ग मधये तुम्हाला रिव्हर राफ्टिंगचा आस्वाद घेता येईल. कुर्ग मधील बारपोल नदीत हा रोमांचक खेळ खेळला जातो. कर्नाटकात वाहणारी बारपोल नदी रिव्हर राफ्टिंगसाठी अतिशय उत्तम आहे. या ठिकाणी तुम्ही जुलै ते सप्टेंबर महिन्यात रिव्हर राफ्टिंग करू शकता.

ADVERTISEMENT

कर्नाटक डंडेली काली नदी

कर्नाटकमधील डंडेली नदीत रिव्हर राफ्टिंग करणं रोमांचक आणि सुंदर अनुभव देणारं आहे. यासाठीच दक्षिण भारतात डंडेली व्हाइट रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. वेगाने वाहणाऱ्या काली नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग करणं तुम्हाला नक्कीच आवडू शकतं. या ठिकाणी फिरायला येण्यासाठी तुम्ही नोव्हेंबर ते जून महिने निवडू शकता. 

कोलाड कुंडलिका नदी

पश्चिम भारतात महाराश्ट् वसलेलं कोलाड शहर पावसाळ्यात अनेकांना भुरळ घालतं. एवढंच नाही या ठिकाणी येण्याचं मुख्य कारण इथले साहसी खेळही आहेत. कोलाडमध्ये सह्याद्रीच्या पर्वत रांगामधून वाहणारी कुंडलिका नदी रिव्हर राफ्टिंगसाठी बेस्ट आहे. पुढे ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणूनच सर्वात जास्त वेगाने धावणारी नदी म्हणून ती प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही अगदी वर्षभर रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.

अरूणाचल प्रदेश ब्रम्हपुत्रा नदी

अरूणाचलमध्ये फिरण्याचा बेत असेल तर ब्रम्हपुत्राची उपनदी असलेल्या लोहित नदीत रिव्हर राफ्टिंग करायलाच हवं. या ठिकाणी कयाकिंग आणि राफ्टिंगसारखे साहसी खेळ खेळले जातात. रिव्हर राफ्टिंग करता करता तुम्हाला आजूबाजूला हिरवेगार जंगल, दऱ्याही पाहायला मिळतात. या ठिकाणी तुम्ही ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात रिव्हर राफ्टिंग करू शकता. 

हिमाचल प्रदेश स्पीती नदी

हिमाचल प्रदेश पाहण्याचा आणि तिथली संस्कृती जाणून घेण्याची अनेकांना आवड असेल. मात्र तुम्ही या ठिकाणी गेला तर स्पीती नदीत रिव्हर राफ्टिंग करायला विसरू नका.कारण भारतातील सर्वात लोकप्रिय रिव्हर राफ्टिंगपैकी हे एक ठिकाण आहे. आजूबाजूला असलेले बर्फाच्छादित डोंगर आणि निसर्ग तुमचं मन वेधून घेतं. या ठिकाणी तुम्ही जुलै ते ऑगस्ट या महिन्यात रिव्हर राफ्टिंग करू शकता. 

ADVERTISEMENT

कुल्लू मनाली व्यास नदी

कुल्लू मनाली हे पर्यटनासाठई एक प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे अनेक पर्यटक दरवर्षी या ठिकाणी जातात.  तुम्ही देखील कुल्लूला जाणार असाल तर इथल्या व्यास नदीत रिव्हर राफ्टिंग जरूर करा. मार्च ते जुलै महिन्यात या ठिकाणी फिरण्याचा खास मौसम असतो. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेता येईल.

आम्ही शेअर केलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि यापैकी कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही आजवर रिव्हर राफ्टिंग केलं आहे हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
30 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT