logo
Logo
User
home / मनोरंजन
रुबिना दिलैक

रिलेशनशीपबद्दल पहिल्यांदाच बोलली रुबिना दिलैक

 रिलेशनशीपबद्दल खूप सेलिब्सना बोलयला अजिबात आवडत नाही. पण काही सेलिब्रिटी आपली मत अगदी बिनधास्त मांडतात. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे रुबिना दिलैक. रुबिना बिग बॉसची विजेती झाली. त्याआधीपासूनच तिच्या रिलेशनशीपबद्दल बरेच काही बोलले जात होते. पण आता तीच तिच्या रिलेशनशीपबद्दल व्यक्त झाली आहे.  तिने पहिल्यांदाच तिच्या या नात्याचा खुलासा केला आहे. रुबिना ज्याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती. तो तिच्या आदल्या सीझनमध्ये बिग बॉसचा स्पर्धक होता.

मौनी रॉय चढणार बोहल्यावर, हळदी-मेहंदीचे व्हिडिओ व्हायरल

वैयक्तिक आयुष्यावर बोलली रुबिना

 रुबिनाला एका मुलाखतीदरम्यान तिच्या खासगी आयुष्याबद्दल विचारले असता तिने या बद्दल सांगितले. ती म्हणाली, आधीच्या नात्यात मला जो त्रास झाला त्यावर विश्वास ठेवणे कठीण होेते. अभिनव शुक्लासोबत लग्न करण्याआधी ती ज्या नात्यात होती. त्या नात्याचा इतका परिणाम झाला होता की, पुढील काही काळासाठी मला कोणासोबत डेटवर जाणे नकोसे झाले होते. कोणावरही मी विश्वास ठेऊ शकत नव्हते. त्यामुळे माझे पहिले रिलेशनशीप हे खूप वाईट गोष्टींवर येऊन संपले. तिने यामध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी ती प्रसिद्ध अभिनेता असा उल्लेख करायला अजिबात विसरली नाही. तिच्या या गोष्टीचा आदर करत आम्हीही त्या अभिनेत्याचे नाव सांगणार नाही. पण अनेकांना त्याचे नाव माहीत आहे.

अभिनवसोबत केले लग्न

अभिनव शुक्लासोबत तिने लग्न केले. पण त्याच्यावरही तिला विश्वास बसत नव्हता. पण त्याचा स्वभाव आणि त्याचे वागणे यामुळे ती त्याच्या प्रेमात पडली आणि तिने त्याच्यासोबत लग्न करण्याचा विचार केला. या दोघांनी थाटामाटात लग्न केले. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी अधिक पसंती दिली. अभिनवसोबतही लग्नात अनेक अडचणी होत्या. हे बिग बॉसच्या सीझनमध्ये दिसून आले होते. या दोघांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर होते याचा खुलासा देखील त्यांनी केला होता. लग्न टिकावे यासाठीच तिने बिग बॉसमध्ये एकत्रित येण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी हा खुलासा केल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. त्यावेळी अनेकांनी रुबिनावरही ताशेरे ओढले होते. रुबिना कधीही कोणाचे ऐकत नाही असे देखील अनेकांनी म्हटले होते.  पण आता त्यांनी हा सगळा टीआरपीसाठी ड्रामा केला होता की त्यांचे खरेच काही झाले होते हा प्रश्नच आहे कारण आता सगळं काही आलबेल नक्कीच दिसत आहे.

राहुल वैद्यसोबतची भांडण

बिग बॉसमध्ये रुबिनाला खरी ओळख मिळाली ती राहुल वैद्यमुळे असेच म्हणायला हवे. अगदी पहिल्याच दिवसापासून या दोघांमध्ये खूप वाद दिसून आला होता. राहुल वैद्य अनेकदा योग्य मुद्दे मांडून तिच्यासोबत वाद घालत होता. राहुल वैद्यला तिचे विचार अजिबात पटत नव्हते. त्यांच्यामध्ये अगदी पहिल्यादिवसापासून वाद दिसून आला होता. त्याचा फायदा रुबिनालाही झाला होता. रुबिनाला कायम सिंपथी मिळत गेली. त्यामुळेच ती विजेतेपदावर पोहोचली होती. रुबिना ‘शक्ती’ या प्रसिद्ध मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. याशिवाय ती युट्युब चॅनलवरुनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. 

आता रुबिनाचा हा नवा खुलासा समोर आल्यामुळे चर्चा तर होणारच ना!

शाहिद कपूरच्या जर्सीला मिळाली नवी रिलीज डेट, कोरोनामुळे होता रखडला

27 Jan 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text