सध्या #BBM चा सीझन 2 सुरु आहे.पण या स्पर्धेच्या पहिला सीझनचा स्पर्धक पुष्कर जोग सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पुष्कर जोग आणि जास्मीन हे दोघं लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे आणि यासाठी याच स्पर्धेची दुसरी स्पर्धक सई लोकुर जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर या संदर्भात चर्चांना उधाण आलं असून स्वत: पुष्कर जोग आणि जास्मीन यांनी काही वृत्तपत्रांना यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
विशू, दगडूनंतर आता अभिनेता प्रथमेशला मिळाली नवी ओळख
नेमकं प्रकरण काय?
तरं झालं असं की, हा सगळा खेळ सोशल मीडियावर सुरु झाला. ट्विटवर एकाने पुष्कर जोग आणि त्याची बायको जास्मीन हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे ट्विट केले. या ट्विटमध्ये जास्मीनने पुष्करला unfollow केल्याचे सांगण्यात आले. शिवाय पुष्करने देखील तिला unfollow केल्याचे म्हटले आहे. याशिवाय जास्मीनने तिच्या अकाऊंटमध्ये असलेले पुष्करसोबतचे सगळे फोटो डिलीट केले आहेत. त्यांच्या दोघांमधील दुराव्याला सई लोकुर कारणीभूत असल्याचे यात म्हटले आहे. मग काय हे ट्विट केल्यानंतर तातडीने या ट्विटवर अनेकांचे रिट्विट येऊ लागले. कोणताही विचार न करता अनेकांनी या ट्विटवर आपली मतं नोंदवली.
Jasmine and pushkar havent been following each other. She deleted their pics together. Fuskya also unfollowed jasmine's sister. Looks like they have separated and the reason is sai lokur.
— Scientist Vaibhav (@OfficeVGM) July 15, 2019
What you said could be true. But, we don't really know the situation. Someone posted on insta that Jasmine also unfollowed Megha because she is still friends with Pushkar.
— sameer phatak (@PhatakSameer) July 15, 2019
जुन्या फोटोंवरुन नको ते अंदाज
फादर्स डे चे निमित्त साधत पुष्करच्या बायकोने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन तिचा आणि फेलिशाचा फोटो शेअर केला यात तिने पालक होणं म्हणजे दोन्ही रोल निभावणं असं म्हणतं. फेलिशाचे सगळे मीच आहे अशा आशयाची पोस्ट लिहिली. त्याखाली #strongwomen #motherfathersअसे काही हॅशटॅग वापरले. यावरही लोकांनी नको ते अंदाज काढायला सुरुवात केली. पण या सगळ्यात काहीच तथ्य नसल्याचे कळत आहे.
म्हातारपणातही बॉलीवूड स्टार्स दिसत आहेत ‘हॉट’
पुष्कर आणि जास्मीनचा खुलासा
या सगळ्या चर्चेनंतर एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पुष्कर जोगने या सगळ्या अफवा असल्याच्या सांगितल्या आहेत. माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे देखील तो म्हणाला आहे. हे करण्यासाठी कोणीतरी नक्कीच पैसे घेतले असतील असे दिसत आहे. तर दुसरीकडे जास्मीनने या प्रकरणावर काही बोलायला नकार दिला आहे. ती म्हणाली सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करणे म्हणजे सगळं ठिक असणे असं नाही. त्यामुळे यावरुन जर कोणी काही बोलत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही.
सई लोकुरमुळे आला दुरावा
आता या दुराव्याचे कारण सांगितले जात आहे सई लोकुर. #BBM सुरु असताना त्यांचे आत चांगले पटत होते. ती दोघं कायम एकत्र असायची. त्यांच्या या जवळकीतेमुळेच त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगत होत्या. पण त्यांची निखळ मैत्री होती. पण ती खेळाची स्ट्रॅटर्जी असल्याचेही मग अनेकांना कळाले होते. पण आता पुन्हा एकदा सई आणि त्याच्या मैत्रीला नको ते वळण दिले जात असून या सगळ्यासाठी सई लोकुरला जबाबदार असल्याचे नाहक म्हटले जात आहे.
त्यामुळे आता या सगळ्या अफवा असून एका पोस्ट किंवा कोणाच्या ट्विटवरुन या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणे किंवा नाही ठेवणे हे आपल्या हातात आहे.