ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
स्तनांवरील केस काढण्यासाठी योग्य पर्याय

स्तनावर येत असतील केस तर केस काढण्यासाठी हे आहेत योग्य पर्याय

 शरीरातील हार्मोन्स बदलू लागले की, शरीरावर नको असलेल्या ठिकाणीही केस येऊ लागतात. महिलांना चेहऱ्यावर केस येण्याची समस्या खूप जणांना असेल पण तुम्हाला माहीत आहे का? महिलांच्या स्तनावर देखील केस येतात. खूप जणांना स्तनांवर केस येण्याची समस्या अगदी हमखास असेल तर काही जणांसाठी हा विषय अगदीच नवखा आणि वेगळा असेल. पण हो महिलांना स्तनावर केस येण्याचा त्रास होतो.आता हा त्रास म्हणता येणार नाही ही शरीरप्रवृत्ती आहे असेच म्हणावे लागेल. स्तनावर केस आल्यानंतर ते काढण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. पण त्यातून कायमची सुटका मिळवण्यासाठी तुम्ही नेमके काय करायला हवे किंवा केसांची वाढ कमी करण्यासाठी नेमके काय करायला हवे ते आज आपण जाणून घेऊया.

रेझर 

स्तनांवरील केस काढून टाकण्यासाठी रेझर हा एक सोा असा पर्याय आहे. शरीरावरील केस काढून टाकण्यासाठी काही खास रेझर मिळतात. स्तन हा महिलांचा अत्यंत नाजूक असा भाग आहे. त्यामुळे त्याच्यासाठी रेझर हा अगदी नाजूक आणि सहज केस काढणारा हवा. त्यामुळे रोजचा रेझर घेण्यापेक्षा छोटा आणि कमी धार असलेला रेझर घ्या. रेझरने अत्यंत हळुवारपणे केस काढून घ्या. त्यामुळे केस निघून जातील. जर तुम्ही अगदी नाजूकपद्धतीने केस काढले तर ते पुन्हा जाड येणार नाहीत. त्यामुळे रेझर हा एक उत्तम आणि चांगला पर्याय आहे. 

 लेझर ट्रिटमेंट

केस कायमचे काढून टाकण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. लेझर ट्रिटमेंट ही केस कायम काढून टाकण्यासाठी फारच फायद्याची ठरते. हल्ली बऱ्याच स्किन क्लिनिकमध्ये केवळ छातीचे केस काढण्यासाठी अनेक जण येतात. स्तनावर जेल लावून त्यावर मशीन फिरवली जाते. स्तनांच्या केसांची मूळ हळुहळू कमी होऊ लागतात. आता तुमचे केस किती जाड आहेत त्यावर तुम्हाला किती सेशन घ्यायचे आहेत ते अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही योग्य सल्ला घ्या आणि मग रेझर करा. रेझर हा सोप्पा आणि सुरक्षित असा पर्याय आहे जो तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल.

हेअर रिमुव्हल क्रिम

आता तु्म्हाला रेझरचा इफेक्ट नको असेल कारण खूप जणांना रेझरचा वापर केल्यामुळे स्तनांना रॅशेश येण्याची शक्यता असते. जर तुम्हाला साधा आणि सोपा पर्याय हवा असेल तर तुम्ही हेअर रिमुव्हल क्रिम देखील वापरु शकता. हेअर रिमुव्हल क्रिमचा वापर करुनही तुम्हाला स्तनावरील केस काढता येतात. स्तनावर खूप जास्त प्रमाणात केस असतील तर केस मुळापासून काढून टाकण्यासाठी हा एक उत्तम असा पर्याय आहे.

ADVERTISEMENT

स्तनांवरील केस काढताना

सौजन्य : Instagram
  • जर तुमच्या स्तनांवर अगदी पातळ दोन चार केस असतील तर त्याच्यासाठी संपूर्ण निप्पल्सवर रेझर मुळीच फिरवू नका. असे केल्यामुळे केस अधिक येण्याची शक्यता असते 
  • धारदार ब्लेडचा वापर करणे टाळा. कारण त्यामुळे त्वचेला नुकसान होण्याची शक्यता असते.
  • हेअर रिमुव्हल क्रिमचा वापर करणार असाल तर त्याचा जास्त वापर करणे टाळा. कारण अशा क्रिम्स या निप्पल काळे करु शकतात. शक्यतो जेथे केस आहे तेथेच क्रिम लावा. त्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही. 

आता स्तनांवरील केस काढण्यासाठी नेमकं काय कराल ते जाणून घ्या.

अधिक वाचा

स्तनांवरील केसांचा होत असेल त्रास तर करा हे सोपे उपाय

बिकिनी भागातील इनग्रोन हेअरचा त्रास असा करा कमी

ADVERTISEMENT

वापरा देशी पद्धत आणि मिळवा घनदाट केस, एका आठवड्यात होतील केस जाड

16 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT