एक स्त्रीचं दुस-या स्त्रीचं दु:ख समजू शकते. मग ती स्त्री आई असू शकते बहीण असू शकते किंवा मैत्रीण देखील असू शकते. पण स्त्री म्हणून आपल्या मनात चालणारे असंख्य विचार आपण फक्त स्त्रीकडेच व्यक्त करु शकतो. दोन स्त्रियांमध्ये विचार करण्याची पध्दत वेगळी असू शकते यात शंका नाही. पण दोघीही एकमेंकांच्या विचारांचा आदर करुन मनात चालणा-या विचारांची वाट मोकळी करु शकतात. अशाच दोन स्त्रियांची बाजू आई आणि मुलीच्या नात्यांतून ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या सिनेमातून दाखवण्यात आली आहे.
या सिनेमात अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) मायलेकीची भूमिका साकारत आहेत. चाकोरीबध्द विचार न करता चाकोरीत अडकलेल्या स्त्रीने बाहेर पडून ‘हे माझं आयुष्य आहे आणि मी ते माझ्याच पध्दतीने जगणार’ असा जगण्याचा दृष्टिकोन ठेवला आहे आणि त्या स्त्रीची भूमिका सईने अतिशय सुंदर पध्दतीने साकारली आहे. सईसमोर नीना कुळकर्णीसारखी कसलेली अभिनेत्री आहे. जिची स्वत:ची एक बाजू आहे, तिचा स्वत:चा स्वतंत्र आणि पारंपारिक असा विचार आहे. पण ती स्वत:चा विचार मुलीवर लादत नाही, तिला तिच्या गोष्टी करण्यापासून अडवत नाही. ती फक्त तिचा मुद्दा मांडून जाते. असं आईचं पात्रं नीना यांनी साकारलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सई आणि नीना यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात दोघींच्या जोडीला प्रेमाचं, आपुलकीचं स्वरुप लाभलं आहे. गंभीर तसेच विनोदी किस्सेदेखील या जोडीभोवती घडतात. जे प्रेक्षकांना २२ नोव्हेंबरला सिनेमागृहात पाहायला मिळणार आहेत. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ सिनेमात राजेश श्रृंगारपुरे आणि निखिल रत्नपारखी यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती स्मिता गानू यांनी केली आहे तर सहनिर्मिती अजित माधवराव पोतदार आणि सीमा निरंजन अल्पे यांनी केली आहे. प्रशांत गोखले हे सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.
सईचा सिंपल लुक
या चित्रपटात सई बऱ्याच दिवसांनी डी-ग्लॅमरस रोलमध्ये दिसणार आहे. यात तिचा लुक अगदी साध्या घरातली पंजाबी ड्रेस घालणारी असा दाखवण्यात आला आहे. या आधीही सईने असा सिंपल लुक आपल्या भूमिकांसाठी स्वीकारला आहे. पण ग्लॅमरस असो वा साधा असो आपल्या भूमिकांच्याबाबतीत सई नेहमीच काटेकोर असल्याचं दिसतं.
मराठीसोबत हिंदीतही सईची कामगिरी
लवकरच सई ताम्हणकर (Sai Tamhankar) बॉलीवूडमधल्या आगामी ‘मिमी’ चित्रपटातही दिसणार आहे. यामध्ये ती पहिल्यांदाच अभिनेत्री क्रिती सनोनसोबत काम करत आहे. या दोघींचा फोटो काही दिवसांपूर्वीच सईने शेअर केला होता. या चित्रपटासाठी दोघी राजस्थानमध्ये शूट करत होत्या. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहे. हा चित्रपट मराठीतील मला आई व्हायचंय या चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे.
New Age मराठी सिनेमाचा चेहरा Sai Tamhankar
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.