ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
राधे बनून परतणार सलमान, दोन चित्रपटांचे करणार मॅशअप

राधे बनून परतणार सलमान, दोन चित्रपटांचे करणार मॅशअप

दरवर्षी ईदला चित्रपट घेऊन सलमान येतो. यंदा तो दबंग 3 घेऊन येणार आहे. पण सलमान खूप पुढचा विचार करतो. त्याला आता पुढच्या ईदला प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन यायचे आहे. त्यामुळेच सलमान आता काहीतरी मोठे करण्याचा विचार करत आहे. या आधी कधीही न केलेला प्रयत्न सलमान करणार आहे. सलमान दोन चित्रपटांचे मॅशअप करणार असून तो त्याचा ‘तेरे नाम’ चित्रपटातील ‘राधे’ बनून परत येणार आहे.

राधेवर सलमानचं विशेष प्रेम

Instagram

सलमानच्या आयुष्यातील अनेक चित्रपटांच्या भूमिका फारच गाजल्या आहेत. तेरे नाम हा त्याचा चित्रपट त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. सलमानचा तो अभिनय आठवला की आजही रडू कोसळते. सलमानला आता याच राधेला परत आणायचे आहे. पण थोडं वेगळ्या स्वरुपात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमानला असे काही करण्याचे फार वर्षांपासून मनात आहे. सलमान ‘तेरे नाम’ आणि ‘वाँटेड’ या चित्रपटाला एकत्र करणार आहे, असे सध्या कळत आहे.

ADVERTISEMENT

रणबीर आणि आलियाच्या लग्नाचा फोटो होतोय व्हायरल, यातलं तथ्य नक्की काय

पुढच्यावर्षी चित्रपट रिलीज करण्याच्या बेतात

आता तुम्हाला माहीत असेलच की, सलमान खानने संजय लीला भन्साळी यांच्या ‘इन्शाअल्लाह’ या चित्रपटाला रामराम केला आहे. त्यामुळे आता पुढच्यावर्षी कोणता चित्रपट आणायचा याच्या पेचात सलमान आहे. या वर्षी त्याचा ‘दबंग 3’ हा चित्रपट येणार आहे. त्याचे शुटींग पूर्ण झाल्यानंतर लगेचच या चित्रपटाचे काम सलमान सुरु करणार आहे. असे कळत आहे. या दोन्ही चित्रपटातील गाण्यांचे मॅशअप करण्याचे काम सलमानने आधी सुरु केले आहे. ‘तेरे नाम’ आणि ‘वॉटेंड’ या दोन्ही चित्रपटांची गाणी प्रसिद्ध होती. आता मॅशअप केल्यानंतर ही गाणी काय कमाल करतात हे सुद्धा पाहावे लागेल. 

करण जोहरला मिळाला आणखी एक नवा चेहरा… हा स्टार किड करणार दोस्ताना 2

 

ADVERTISEMENT

तीन चित्रपटांवर काम सुरु

Instagram

सलमानकडे पुढच्या वर्षी ईदला कोणता चित्रपट आणायचा हा प्रश्न असला तरी तीन चित्रपटांच्या सीक्वलचे त्याचे काम सध्या सुरु आहे. या चित्रपटांमध्ये ‘तेरे नाम 2’, ‘नो एंट्री 2; आणि ‘वाँटेड 2’ या चित्रपटाचा समावेश आहे. त्यामुळे भाईजानकडे आधीच तीन चित्रपट पदरात आहे. पण त्याला प्रयोग म्हणून दोन चित्रपटांचे मॅशअप करायचे आहे आणि त्याचसाठी त्याचे काम सध्या सुरु आहे.

निकचं चुकीचं वय सांगितल्याने पुन्हा एकदा प्रियांका चोप्रा झाली ट्रोल

ADVERTISEMENT

किक2 ला मिळाला ब्रेक

खरंतर सलमान खानची किक 2 हा चित्रपट पुढच्यावर्षी रिलीज होणार होता. पण साजिद नाडियादवालाच्या घोषणेनंतर मात्र हा चित्रपच पुढीलवर्षी रिलीज होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले त्यामुळे किक 2 ला ब्रेक लागल्यानंतर पुढच्यावर्षी काय रिलीज करायचे हा मोठा प्रश्न सलमानसमोर होताच. 

भाईजानची मदत

Instagram

सध्या सोशल मीडिया सेन्सेशन असलेल्या राणू मंडलवर सगळीकडून स्तुतीसुमने उधळली जात आहे. पण भाईजान खऱ्या अर्थाने राणू मंडलच्या मदतीला धावून आला. कारण त्याने राणू मंडलला मुंबईत चक्क घर दिले आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या राणाघाट स्टेशनवर गाणं गाणाऱ्या राणूला मुंबईत हक्काचं घर मिळवून देण्याचं काम सलमानने कलें आहे.

ADVERTISEMENT

आता भाईजानच्या या मॅशअप चित्रपटासाठी पुढच्या वर्षापर्यंतची वाट सगळ्यांना पाहावी लागणार आहे.

05 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT