करण जोहरला मिळाला आणखी एक नवा चेहरा... हा स्टार किड करणार ‘दोस्ताना 2’

करण जोहरला मिळाला आणखी एक नवा चेहरा... हा स्टार किड करणार ‘दोस्ताना 2’

सध्या सगळीकडे चर्चा होत आहे ती करण जोहरच्या इन्स्टा पोस्टची.. कारण करणने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एका हँडसम मुलाचा फोटो शेअर केला आहे. आता हा नवा मुलगा कोण? अशी जोरदार चर्चा सध्या सगळीकडे होऊ लागली आहे. त्याहीपेक्षा करणने शेअर केलेला फोटो म्हणजे हा देखील स्टार किड असल्याचे म्हटले जात आहे. लक्ष्य असे या नव्या अभिनेत्याचे नाव असून तो लवकरच दोस्ताना 2 या करणच्या प्रोडक्शन असलेल्या चित्रपटात दिसणार आहे.

ही Remix गाणी एकेकाळी होती फार प्रसिद्ध, तुम्हाला ही गाणी आठवतात का

आता आणखी एका स्टार किडची भर

Instagram

नेपोटिझमवरुन करणला या आधीही अनेकांना धारेवर धरले आहे. पण करण एका मागोमाग एक असे स्टारकिड लॉन्च करत चालला आहे. आता त्याचा दोस्ताना 2 हा चित्रपट लवकर फ्लोअरवर येणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट फायनल झाली असून त्यामध्ये एक नवा चेहरा असल्याचे कळत आहे. आता या नव्या चेहऱ्याचे नाव लक्ष्य असे असल्याचे कळत आहे. त्याला पाहिल्यानंतर अनेकांनी तो स्टार किड असल्याची जोरदार चर्चा सुरु केली आहे. आलिया, अनन्या, जान्हवी यानंतर आता आणखी एका स्टार किडची भर  करत असल्याचे सगळ्यांचे म्हणणे आहे. पण करणची पोस्ट नीट वाचली तर त्याने या पोस्टमध्ये कुठेही स्टार किड असा उल्लेख केला नाही. तर फक्त किड असा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ लोकांनी स्टार  किड असा काढला आहे.

कोण आहे लक्ष्य?

Instagram

आता इतका हँडसम अभिनेता येणार आणि ते ही इतक्या मोठ्या बिग बॅनरच्या चित्रपटात. म्हटल्यावर लोकं त्याला शोधणं अगदीच साहजिक आहे. पण तिकडेही नशीब कुठे? कारण लक्ष्य कोणत्याही सोशल  मीडियावर अॅक्टिव्ह नाही. त्याने त्याचं इन्स्टा अकाऊंटही आताच सुरु केले आहे. करणने ही पोस्ट शेअर केल्यानंतर आणि त्याने त्याचे अकाऊंट सुरु केल्यानंतर अवघ्या दोन तासात त्याचे 5 हजार फॉलोअर्स झाले आहेत. लक्ष्यबद्दल अधिक माहिती घेतल्यानंतर असे कळले आहे की, लक्ष्यने आपल्या अभिनयाची सुरुवात ‘पोरस’ या मालिकेतून केली आहे. शिवाय त्याने रोडीज या रिअॅलिटी शो मधूनही आपले टॅलेंट दाखवले आहे. आता हिरे की परख तो जोहरी को होती है म्हणूनच की काय करणने त्याला आपल्या या चित्रपटात संधी दिली आहे. 

श्रीदेवीचा वॅक्स स्टॅच्यू पाहून कपूर कुटुंबिय झाले भावूक

नवा जोश, नवे चेहरे करणार दोस्ताना 2

Instagram

दोस्ताना 2 चा विचार केला तर या चित्रपटाची उर्वरित स्टारकास्ट लोकांना माहीत झाली आहे. या चित्रपटात सध्याच्या सेन्सेशन कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर आहे तर तिसरी व्यक्ती ही यश असल्याचे कळत आहे. त्यामुळे आता दोस्ताना 2 सज्ज झाला आहे. 

टीव्हीवरील 5 प्लस साईज अभिनेत्री, ज्यांना वजनापेक्षा टॅलेंट वाटतो महत्त्वाचा

आता रिमेक करणार का जादू

करण जोहरचा दोस्ताना हा चित्रपट 2008 साली रिलीज झाला होता . या चित्रपटात प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होते. त्यावेळी हा चित्रपट खूप चालला होता. खुमासदार कॉमेडी आणि प्रियांकाच्या अदा या चित्रपटात प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या होत्या त्यामुळे आता हा दोस्ताना 2 नेमकी काय जादू दाखवणार ते देखील पाहणे महत्वाचे आहे. दरम्यान, हा चित्रपट कधी रिलीज होणार या बाबत कोणतीही अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

आता ही गोष्ट तर नक्की झाली आहे की, लक्ष्य हा स्टार किड नाही आणि सध्याच्या घडीला त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण या चित्रपटानंतर तो कोण आहे हे देखील नक्की कळेल.