ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सलमान खान फार्महाऊसवर करत आहे शेती, भर पावसात चालवला ट्रॅक्टर

सलमान खान फार्महाऊसवर करत आहे शेती, भर पावसात चालवला ट्रॅक्टर

बॉलीवूड अभिनेता सलमान खान कोरोना व्हायरसचे संक्रमण टाळण्यासाठी गेले चार महिने पनवेल मध्ये आहे. मुंबईपासून दूर तो त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसवर निवांत जीवन जगत आहे. लॉकडाऊन असूनही सोशल मीडियावरून मात्र तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात नक्कीच आहे. सध्या पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. पनवेल हे ग्रामीण भागात येत असल्यामुळे तिथे शेतीच्या कामांना सुरूवात झाली आहे. सलमानही त्यांच्या फार्महाऊसवर सध्या शेतीची कामं करताना दिसत आहे. बॉलीवूडच्या भाईजानने नुकताच एक असा व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून त्याचे चाहते फार खुश झाले आहेत.

सलमान स्वतः ट्रॅक्टर चालवत करत आहे शेतात नांगरणी

चित्रपटातील एखाद्या सीनची गरज म्हणून किंवा एखादी गावकऱ्याची भूमिका साकारताना यापूर्वी तुम्ही सलमानला ट्रॅक्टर चालवताना नक्कीच पाहिलं असेल. मात्र सध्या तो त्याच्या शेतात खरोखरच ट्रॅक्टर चालवून नांगरणी करत आहे. सलमानने स्वतः त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला त्याने ‘फार्मिंग’ अशी कॅप्शन दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘सर्व शेतकऱ्यांना सलाम’अशी कॅप्शन देत स्वतःचा चिखलाने माखलेला एक फोटो शेअर केला होता. तेव्हा सर्वांना सलमानने हे फक्त फोटोशूटसाठी असे केले आहे असं वाटत होतं. आता मात्र त्याने स्वतः भर पावसात आणि चिखलाने भरलेल्या शेतात ट्रॅक्टर चालवण्याचं काम केल्यामुळे सर्वच त्याचे कौतुक करत आहेत. 

चाहते करत आहेत भाईजानचं कौतुक

शेतीसाठी जमीन नांगरणी, भात लावणी अशी कामं करणं हे नेहमीच कष्टाचं असतं. गेले चार महिने फार्महाऊसवर राहून सलमानलादेखील अशा कामांमध्ये रस निर्माण झाला आहे. ट्रॅक्टर चालवत असलेल्या या व्हिडिओमधून तोही अशी कष्टांची  कामे देखील करू शकतो हे सिद्ध झालं आहे. एवढंच नाही तर गुडघ्याभर चिखलात उभं राहून त्याने भातलावणी केली आहे. या फोटोंसोबत सलमानने ‘दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम… जय जवान जय किसान’ असं शेअर केलं आहे. सलमान जरी शेतीची कामं करत त्याच्या भल्यामोठ्या फार्महाऊसवर रमला असला तरी त्याच्या चाहत्यांना त्याला पुन्हा लवकरच चित्रपटातून पाहण्याची ईच्छा आहे.

सलमान फार्महाऊसवरूनच चाहत्यांचे करत आहे मनोरंजन

लॉकडाऊनच्या काळात फार्महाऊसवरच सलमान आणि जॅकलिनने मिळून एक अल्बम तयार केला होता. हा अल्बम सोशल मीडियावर प्रंचड हिट झालाच शिवाय त्याचा मेकिंग ऑफही प्रेक्षकांना खूप आवडला. या अल्बमचं सगळं काम सलमान, जॅकलिन आणि त्याच्यासोबत तेव्हा असलेल्या कुटुंबिय आणि मित्रमंडळींनी केलं होतं. या अल्बममधली सलमान आणि जॅकलिनची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. लॉकडाऊनमुळे सलमानचा ‘राधे’ चित्रपट प्रदर्शित झाला नाही पण त्याने या अल्बम मधून प्रेक्षकांना भेट दिली होती. आता अनलॉकची फेज सुरू झाली असल्यामुळे सलमान त्याचं फार्महाऊस सोडून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याबाबत उत्सुकताना निर्माण झाली आहे. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

अजय- काजोलच्या रिललाईफ नात्याला झाली 22 वर्ष पूर्ण

थिएटर पुन्हा उघडण्याच्या बाबतीत शेखर कपूर यांनी दिली महत्वाची बातमी

ADVERTISEMENT

शिल्पा शेट्टीचा खुलासा, सुखी जीवन जगण्यासाठी ‘या’ व्यक्तीला करते फॉलो

20 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT