बॉलीवूडवर तीन खान अधिराज्य गाजवत आहे. किंग खान शाहरुख खान, चुलबूल पांडे सलमान खान आणि परफेक्शनिस्ट आमीर खान यांच्यातील वाद सगळ्यांनाच जगजाहीर आहेत. त्यामुळे हे तिघे कधीच कोणत्या चित्रपटात एकत्र काम करत नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ द्यायला सुरुवात केली आहे. पण तिघांनी तरीही एकत्र स्क्रिन फार वेळासाठी शेअर केली नाही. पण आता हे तिघे एकत्र येणार असल्याची चिन्ह आहेत. कारण नुकतचं एक मोशन पिक्चर प्रदर्शित झाले आहे. या मोशन पिक्चरमध्ये मुळेत तीन खान एकत्र असल्याचे म्हटले जात आहे.
या कारणांमुळे ‘पानिपत’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची नापसंती
खरचं तीन खान येणार का एकत्र
आता काहीही झालं तरी तीन खान एकत्र येणार नाही असे अनेकांना वाटत असेल. पण आता या मोशन पिक्चरच्या निमित्ताने एकत्र आल्याचे म्हटले आहे. आमीर खान आणि करीना कपूर स्टारर ‘लाल सिंह चड्ढा’ नावाचा चित्रपट येणार आहेत. या चित्रपटाचे मोशन पिक्चर रिलीज झाले आहे.. त्या खाली एक कॅप्शन लिहिले आहे. ‘क्या पता हम मै है कहानी या कहानी मै है हम’ या कॅप्शनमुळेच हे तिघे पुन्हा एकदा एकत्र येत असल्याचे म्हटले जात आहे. काही ठिकाणी या तिघांचे एकत्र केलेले फेक पोस्टरही शेअर केले जात आहे. अजून या चित्रपटाचे शुटींग सुरु असून या सेटवरील फोटोही या आधी व्हायरल झाले आहेत.
Bigg Boss 13: स्ट्राँग स्पर्धक सिद्धार्थ शुक्लाची एक चूक महागात, झाला बेघर
एका मोठ्या वेबसाईटने दिली माहिती
इंटरटेन्मेंट विश्वास काम करणाऱ्या एका मोठ्या वेबसाईटने ही माहिती लीक केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन खान एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. पण त्यावर आम्ही कोणतीही खात्री देऊ शकत नाही. कारण त्यांच्यातील वाद त्यांनी मिटवण्याचा या आधी प्रयत्न केला आहे. संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी ते एकमेकांकडे पार्टीलासुद्धा जातात. पण आता ‘लाल सिंह चड्ढा’च्या निमित्ताने ते एकत्र येणार असतील तर मग चांगलेच आहे नाही का
या आधी केली आहेत काम
‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात आमीर खान-सलमान खान ही जोडी दिसली होती. नुकतीच या चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाली. या चित्रपटाच्यावेळी स्क्रिन टाईमिंगवरुन या दोघांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाला बराच वेळ घेतला. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होण्यासाठी 3 वर्ष लागली होती. 3 वर्षांनी हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट आजही अनेकांना लक्षात आहे. तर शाहरुख आणि सलमान हे ‘करण अर्जुन’, ‘हम तुम्हारे है सनम’, ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात दिसले होते.
हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक
आतापर्यंत अनेक हॉलीवूडपटाचे रिमेक करण्यात आले आहे. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 1994 साली आलेल्या फॉरेस्ट गंप चित्रपटाचा रिमेक आहे. फॉरेस्ट गंपच्या सुरुवातीप्रमाणेच या चित्रपटाची सुरुवात आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.