ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सलमान खानचा खुलासा, राधे चित्रपटाची कमाई देणार कोरोनाग्रस्तांना

सलमान खानचा खुलासा, राधे चित्रपटाची कमाई देणार कोरोनाग्रस्तांना

भारतात सध्या कोविडचे संक्रमण वाढताना दिसत आहे. त्यामुळे सध्या दररोज कोरोनाग्रस्तांचा वाढणारा आकडा सर्वांच्या चिंतेचे कारण ठरत आहे. कोरोना महामारीमध्ये बॉलीवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे. बॉलीवूडचा भाईजानही यात नक्कीच कमी नाही. सलमानने नुकतंच जाहीक केलं आहे की त्याच्या आगामी चित्रपट राधेमधून मिळणारी कमाई तो कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहे. कोरोना महामारीत गरजेच्या असलेल्या ऑक्सिजन सिलेंडर, वॅटिंलेटर आणि इतर गोष्टींसाठी तो देणगी देणार आहे. सलमान खान फिल्म्स आणि झी इंटरटेंटमेंटने मिळून हा निर्णय घेतलेला आहे. 

सलमान खान ‘राधे’तून करणार कोरोनाग्रस्तांची मदत

सलमानचा राधे १३ मे ला काही ठिकाणी थिएटर आणि ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. या शिवाय अनेक डीटीएच फ्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र यासाठी प्रेक्षकांना काही ठराविक पैसे मोजावे लागणार आहे. ज्या पैशांमधून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देणगी दिली जाणार आहे. आश्चर्य म्हणजे सलमानच्या राधेने प्रदर्शित होण्याआधीच कमाई करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झी स्टुडिओने आधीच या चित्रपटाचे सर्व हक्क खरेदी केलेले आहेत. ज्यासाठी झी स्टुडिओने करोडोंचे मानधन दिलेले आहे. आता चित्रपटगृह आणि ओटीटी अशी दोन्ही माध्यमांवर प्रदर्शित झाल्यामुळे चित्रपटाची कमाई करोडोंच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सलमानने काही दिवसांपूर्वी ईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचं जाहीर केलं होतं. मात्र देशभरात वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या आणि त्यामुळे झालेले लॉकडाऊन पाहता हा निर्णय बदलण्यात आला. आता भारतातील काही मोजक्या ठिकाणी आणि युरोप, मिडल ईस्ट, सिंगापूर, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा जवळजवळ चाळीस देशांमधील चित्रपटगृहात राधे प्रदर्शित केला जाणार आहे. या व्यक्तिरिक्त ओटीटी माध्यमावर प्रेक्षकांना घर बसल्या राधे पाहता येणार आहे. मात्र या चित्रपटातून जी काही कमाई होणार आहे ती भारतातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.

राधे सलमानचा सर्वात छोटा चित्रपट

राधे हा सलमान खानच्या करिअरमधील सर्वात छोटा  चित्रपट असणार आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खानचा राधे १४४ मिनीट म्हणजेच एक तास ५४ मिनीटांचा आहे. ज्यामुळे सलमानच्या संपूर्ण करिअरमधला सर्वात छोटा चित्रपट ठरणार आहे. याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र प्रेक्षकांना आजवर सलमानचा इतका छोटा चित्रपट पाहण्याची नक्कीच सवय नाही. राधेमध्ये सलमान खानसोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत असणार आहेत. राधे चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभूदेवाने केलं आहे. जर कोरोना आणि लॉकडाऊन हे दुष्टचक्र सुरू झालं नसतं तर मागच्या वर्षीच ईदच्या मुहूर्तावर चाहत्यांना सलमानचा राधे  चित्रपटगृहात पाहता आला  असता. मात्र आता तो रखडत रखडत या वर्षीच्या ईदला प्रदर्शित होत आहे. आता फक्त याच गोष्टीचा दिलासा आहे की राधे प्रदर्शित होताना प्रेक्षकांना फक्त मनोरंजनच देणार आहे असं नाही तर त्याच्यातून होणाऱ्या कमाईतून एक महत्त्वाचं सत्कर्मदेखील केलं जाणार आहे. त्यामुळे चाहते आता या चित्रपटाची अगदी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

लवकरच येणार ‘दृश्यम 2’ चा हिंदी रिमेक, अजयचा दिसणार नवा अंदाज

अभिनेत्री उपासना सिंह सापडली संकटात, कोविड नियमाचं केलं उल्लंघन

दीपिका पादुकोणच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण

ADVERTISEMENT
05 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT