संजय लीला भन्साळीचा आगामी प्रोजेक्ट म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानीच असते. भव्य दिव्य सेट, उत्तम दिग्दर्शन आणि सक्षम कलाकार असं त्याच्या चित्रपटाचं स्वरूप असतं. जे नेहमीच प्रेक्षकांचे डोळे दिपवून टाकणारं ठरतं. संजय लीला भन्सालीने नुकतंच हिरामंडी या वेबसिरिजमधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्याचा निर्णय घेतला आहे. संजल लीला भन्साळीची वेबसिरिजही त्याच तोडीची असणार यात शंका नाही . मात्र सुरवातीला या वेबसिरिजमध्ये दिग्गज अभिनेत्री रेखा असणार अशी चर्चा होती. मात्र आता त्याने रेखा ऐवजी चक्क ऐश्वर्याला कास्ट केल्यामुळे संजय आणि रेखामध्ये काहितरी बिनसल्याचा सूर उमटत आहे.
रेखा ऐवजी ऐश्वर्याचं का झालं कास्टिंग
संजय लीला भन्साळीसोबत पुन्हा काम करण्यासाठी ऐश्वर्या उत्सुक आहे. ऐश्वर्याने तिचा आवडता दिग्दर्शक मणिरत्नमसोबत आगामी चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण केलं आहे. त्यामुळे तिच्याकडे आता नव्या प्रोजेक्टसाठी चांगला वेळ आहे. संजय लीला भन्साळीदेखील खूप दिवसांपासून ऐश्वर्याच्या डेट मॅनेज होण्याची वाट पाहत होता. ज्यामुळे त्याने हिरामंडीसाठी ऐश्वर्याला साइन केल्याची चर्चा आहे. याबाबत अजूनही कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भूमिकेसाठी आधी संजयच्या मनात रेखाचे नाव होते. मात्र त्याने आता आपला विचार बदलला असून रेखा ऐवजी तो ऐश्वर्याची निवड करत आहे. याचं कारण काही वर्षांपूर्वी संजयला रेखासोबत काम करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. रेखाचे वागणे त्रासदायक वाटू लागल्यामुळे त्याने त्या चित्रपटात तब्बूला कास्ट केले होते. फितूर या चित्रपटात आधी रेखाला कास्ट करण्यात आलं होतं.
हिरामंडीमध्ये का असावं रेखाने
संजय लीला भन्साळीची वेबसिरिज हिरामंडी हा सेक्स वर्कर्सवर आधारित आहे. ज्यामध्ये हुमा कुरैशी, सोनाक्षी सिन्हा यांची वर्णी लागलेली आहे. या वेबसिरिजमध्ये मुजरा हे आकर्षणाचे केंद्र असणार आहे. बॉलीवूडमध्ये रेखाप्रमाणे मुजरा आजवर कुणीच सादर केलेला नाही. यासाठीच आधी संजयने रेखाचा विचार केला होता. मात्र मागील अनुभवावरून संजयने हा निर्णय बदलला आहे. फितूरच्या वेळी रेखाने विचित्र वागत अचानक चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. ज्यामुळे आता संजय लीला भन्साळीला रेखा या भूमिकेसाठी योग्य वाटत नाही आहे. ज्यामुळे आता रेखा की ऐश्वर्या यावर लवकरच अधुकृत शिक्कामोर्तब केलं जाईल आणि प्रेक्षकांना एक नवी वेबसिरिज पाहता येईल.
फँड्रीच्या शालूने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल, म्हणाली…
शमिताच्या वयावरून अक्षरा आणि ऊर्फीने घेतली फिरकी, म्हटले ‘मावशी’