ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सारा अली खानने काढली अक्कलदाढ, शेअर केला मजेशीर व्हिडिओ

सारा अली खानने काढली अक्कलदाढ, शेअर केला मजेशीर व्हिडिओ

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या मजेशीर आणि हटके अंदाजाने चाहत्यांचे नेहमीच मनोरंजन करत असते. त्यामुळे चित्रपटातील अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही चांगली लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या दिलखेचक अदांमधील फोटोंसोबतच ती ‘नमस्कार दर्शको’ असं म्हणत  तिच्या जीवनातील काही मजेशीर किस्से, डान्स व्हिडिओ शेअर करते. विशेष म्हणजे तिच्या या फनी व्हिडिओजनां सर्वात जास्त लाईक्स आणि कंमेट्स मिळत असतात. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण या व्हिडिओचा आनंद घेत असताना चाहत्यांनी तिची चिंताही वाटू लागली आहे.

सारा अली खानच्या अक्कल दाढेची सर्जरी

या व्हिडिओला सारा अली खानने कॅप्शन दिली आहे, “नमस्कार दर्शको, बाय बाय अक्कल दाढ ( ज्ञानी दात)” हा व्हिडिओ आहे सारा अली खानच्या अक्कलदाढेच्या ऑपरेशनचा. पंचवीशी अथवा तिशीनंतर अनेकांना अक्कलदाढ काढावी लागते. कारण अक्कल दाढ एकतंर खूप उशीरा येते. मात्र या काळात तिला येण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे ती हिरड्या, जबडा फाडून येण्याचा प्रयत्न करते. अशी चुकीच्या पद्धतीने आलेली अक्कलदाढ काढणं सोपं नसतं. त्यामुळे तज्ञ डेन्टिस्टच्या मदतीने ती सर्जरी करून काढावी लागते. बऱ्याचदा या सर्जरीला खूप वेळ लागतो आणि एक ते दोन दिवस अथवा आठवडाभर दाढ काढलेल्या ठिकाणी असह्य वेदना होतात. अक्कल दाढ काढण्यासाठी ऑपरेशनपूर्वी रूग्णाला भूल दिली जाते. साराचीही अक्कलदाढ नुकतीच काढण्यात आली. मात्र यासाठी दुःख करत बसण्यापेक्षा साराने अक्कल दाढ काढण्यापूर्वी आणि नंतरचा अनुभव शेअर करण्यासाठी चक्क एक मजेशीर व्हिडिओच शेअर केला आहे.

साराने या व्हिडिओत म्हटलं आहे की, ” नमस्कार दर्शको, मला वाफ करा कारण मी तुमच्यासोबत सध्या नीट बोलू शकत नाही आहे. तुम्हाला प्रत्येक वाक्यावर हसू येत आहे, माझ्यासोबत आता आहेत डॉ. शेट्टी. ते माझ्या अक्कलदाढेचं उद्धाटन असं मी बोलणार होती, मात्र तो शब्द योग्य ठरणार नाही. याचा अर्थ आहे एक्सट्रॅक्शन ला काय म्हणतात, उपटणे….हा… डॉक्टर शेट्टी जे माझे चांगले मित्र आहेत ते आता माझा दात आता उपटून काढणार आहेत” अर्थातच हा संवाद साराने तिच्या शुद्ध हिंदीतून केलेला आहे. हा व्हिडिओ करताना साराचा आवाज अतिशय अस्पष्ट आणि अडखणारा होता. कारण त्यावेळी तिला औषधांची भूल देण्यात आली होती. ज्यामुळे व्हिडिओमध्ये आईसोबत केलेल्या डिनरबाबत बोलता बोलता अचानक ती बेशुद्ध झाली. मात्र सर्जरी झाल्यावर आणि पूर्ण शुद्धीवर आल्यावर तिने तिचा व्हिडिओ पूर्ण केला. त्यावेळी खरंतर तिला मुळीच बोलता येत नव्हतं औषधांच्या परिणामामुळे काही काळासाठी तिचं तोंड पूर्ण बधीर झालं होतं. तरीदेखील तीने “नमस्ते मित्रांनो, माझी सर्जरी व्यवस्थित पार पडली आहे, यासाठी मी डॉक्टर शेट्टी यांनी धन्यवाद देऊ इच्छिते” या शब्दात हा व्हिडिओ पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे काही तासातच या व्हिडिओला वीस लाखांपेक्षा जास्त लाईक् मिळाले आहेत. शिवाय चाहत्यांना आता साराची चिंता वाटू लागल्याने अनेकांनी तिला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

‘बागी 4’ मध्ये टायगर श्रॉफसोबत मुख्य भूमिकेत सारा अली खान

दुबईत नाही ‘या’ ठिकाणी होणार सलमानच्या टायगर 3 चं शूटिंग

नव्या नवेली आणि मीझानच्या नात्यामुळे नाराज आहे जावेद जाफरी

ADVERTISEMENT
10 Feb 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT