सारा अली खानने खूप कमी वेळात बॉलीवूड मध्ये स्वतःच स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण केलं आहे. केदारनाथ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत तिने गेल्या तीन वर्षांत अनेक चित्रपटांमध्ये स्वतःचा ठसा उमटवला. असं असलं तरी तिच्या अभिनयातून आणि दिसण्यातून सतत तिची आई अमृता सिंह आणि वडील सैफ अली खान यांची झलक पाहायला मिळते. ज्यामुळे चाहत्यांना तिने तिच्या आईवडिलांसोबत मोठ्या पदद्यावर एकत्र काम करावं असं वाटत राहतं. आनंदाची गोष्ट म्हणजे चाहत्यांची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण लवकरचनसारा अली खान आणि अमृता सिंह एकत्र काम करताना दिसणार आहेत. पण हा कोणताही चित्रपट नसून ती एका नामांकित ब्रॅंडची जाहिरात असणार आहे. या अॅडचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काय आहे ही जाहिरात
सारा अली खानने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती तिच्या आईसोबत एका फोटोत दिसत आहे. या पोस्टसोबत साराने कोणताच संदेश शेअर केलेला नाही. तिने फक्त काही न पाहिलेले फोटो दाखवण्यासाठी काही इमोजी शेअर केल्या आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा फोटो त्या जाहिरातीचा आहे. ज्यामध्ये या मायलेकी एकत्र काम करणार आहेत. या फोटोत अमृता सिंह यांनी निळ्या रंगाचा सलवार सूट तर सारा अली खानने सफेद रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केलेला आहे. या माहितीनुसार सारा आणि अमृताची जोडी पहिल्यांदाच एका जाहिरातीतून झळकणार आहे. ही जाहिरात एका हेअर केअर ब्रॅंडची असून हा ब्रॅंड लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या ब्रॅंडची आधी सारा अली खान अॅंबेसेडर होती आता अमृताही या ब्रॅंड अॅंबेसेडरचा एक भाग झाली आहे. ज्यामुळे आता या मायलेकीला एकत्र जाहिरात करण्याची ऑफर मिळाली आहे.
जवळजवळ तीस वर्षांनंतर अमृता सिंह करणार जाहिरात
या जाहिरातीमुळे अमृता सिंह पुन्हा एकदा जाहिरात विश्वात पदार्पण करत आहे. यापूर्वी तिने जवळजवळ तीस वर्षांपूर्वी जाहिरातीसाठी काम केलेलं आहे. गेली तीन दशकं अमृता सिंह ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहत होती. आताा मुलीसाठी ती पुन्हा एकदा या दुनियेत पदार्पण करत आहे. ही जाहिरात आता प्रदर्शित होण्यासाठी पूर्ण झाली असून लवकरच चाहत्यांना पाहता येणार आहे. साराने आतापर्यंत केदारनाथमध्ये सुशांत सिंह राजपूत, सिम्बामध्ये रणबीर सिंह, लव्ह आज कल 2 मध्ये कार्तिक आर्यन, कुली नं 1 साठी वरूण धवन या अभिनेत्यांसोबत काम केलेलं आहे. लवकरच ती अतरंगी रे चित्रपटातून अक्षय कुमार आणि धनुषसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. मात्र सध्या या जाहिरातीसाठी आईसोबत काम करणं तिच्यसाठी जास्त उत्कंठा वाढवणारं असेल. शिवाय लवकरच तिने अमृता सिंह आणि सैफ अली खान यांच्यासोबत एखाद्या चित्रपटातही दिसावं अशी चाहत्यांची इच्छा आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
नव्या कथानकासह ओह माय गॉड 2, अक्षयकुमारसोबत यामी गौतम मुख्य भूमिकेत
‘ये जवानी’ फेम अभिनेत्रीने लग्न केल्याचे सोशल मीडियावरून केले जाहीर
सुनिल शेट्टीचा नवा उपक्रम, गरजू लोकांसाठी करणार योग्य औषधांचा पुरवठा