देशभरात वाढत असलेल्या कोरोनाच्या भीतीमुळे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा रखडलेल्या बहुचर्चित चित्रपटांची लिस्ट तयार झाली आहे. त्यातीलच एक आहे शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेला जर्सी चित्रपट… खरंतर जर्सी 31 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. सुट्टीचा दिवस असल्यामुळे हा चित्रपट सुपरहिट होईल अशी निर्मात्यांना आशा होती. मात्र कोरोना संक्रमण वाढू लागले आणि निर्मांत्यांना चित्रपट प्रदर्शित करणं रद्द करावं लागलं. आता पुन्हा एकदा निर्माते या चित्रपटासाठी नवी रिलीज डेट प्लॅन करत आहेत.
मौनी रॉय चढणार बोहल्यावर, हळदी-मेहंदीचे व्हिडिओ व्हायरल
जर्सीला मिळाली का नवी रिलीज डेट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता निर्मांत्यांना जर्सीसाठी नवी रिलीज डेट मिळाली आहे. जर्सी लवकरच म्हणजे फेब्रुवारीत प्रदर्शित होऊ शकतो. कारण निर्माते या चित्रपटासाठी 18 अथवा 25 फेब्रुवारी या तारखा फायनल करण्याच्या विचारात आहेत. लवकरच यापैकी एका तारखेची अधिकृत घोषणा केली जाईल. चित्रपटगृता प्रदर्शित करण्यासाठी जर्सी चित्रपटाची सेंसॉर सर्टिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
तापसी पन्नू ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, भारतीय चित्रपट संस्थेने जाहीर केली यादी
जर्सीला सेन्सॉर बोर्डचा हिरवा कंदील
जर्सी हा एक स्पोट्स ड्रामा असला तरी कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. या चित्रपटात कोणतीही हिंसा अथवा इंटिमेट सीन्स नाहीत त्यामुळे सेंसॉरने या चित्रपटाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. सीबीएफसीने चित्रपटातील कोणताही सीन कापलेला नाही. चित्रपट दोन तास पच्चावन्न मिनीट लांबीचा आहे. तेलुगू चित्रपट जर्सीचा हा हिंदी रिमेक असणार आहे. ज्यात एक अपयशी क्रिकेटर त्याच्या मुलासाठी जर्सी खरेदी करण्यासाठी करत असलेला संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात पहिल्यांदा शाहिद आणि मृणाल एकत्र काम करत आहेत. अल्लू अरविंद यांनी चित्रपटाची निर्मिती तर गौतम तिन्ननुरीने दिग्दर्शन केलं आहे. गौतमनेच मूळ तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं.