रणवीर सिंग (Ranveer Singh ) च्या आगामी सिनेमा जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) तून अर्जुन रेड्डी (Arjun Reddy) तील अभिनेत्री शालिनी पांडे (Shalini Pandey) ही बॉलीवूडमध्ये धमाकेदार एंट्री करणार आहे.
बॉलीवूड स्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या त्याच्या 83 या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटानंतर तो पुन्हा एकदा यशराज कँपकडे वळणार आहे. क्रिकेटवर आधारित 83 चित्रपटानंतर रणवीरचा जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) या चित्रपटाचं शूटींग सुरू होईल. या चित्रपटात लीड रोलमध्ये रणवीर समोर असणार आहे अर्जुन रेड्डी (Arjun Reddy) चित्रपटातील अभिनेत्री शालिनी पांडे (Shalini Pandey). बऱ्याच दिवसांपासून याची चर्चा होती पण अखेर या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. अशाप्रकारे शालिनीची एंट्री यशराज कँपमध्ये झाली आहे.
अर्जुन रेड्डी स्टार शालिनी पांडे तिच्या पहिल्यावहिल्या बॉलीवूड चित्रपटात रणवीर सिंगसोबत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पोस्टर मेकर्सनी रिलीज केलं होतं. त्यानंतर या चित्रपटातील अभिनेत्रीबाबत फॅन्सना उत्सुकता होती. पण आता याचं उत्तर मिळालं आहे.
सूत्रानुसार चित्रपटाचे निर्माते मनीष शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी या चित्रपटातील शालिनीच्या एंट्रीवर शिक्कामोर्तब केलं आहे. या चित्रपटासाठी घेण्यात आलेल्या ऑडीशनमध्ये शालिनी पांडेने नॅचरल आणि स्पॉटँनियस अभिनय केला. ज्यामुळे या भूमिकेसाठी तिची निवड झाली. या बातमीमुळे शालिनीच्या फॅन्सना नक्कीच आनंद झाला आहे.
2017 साली दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकरोंडा (Vijay Deverakonda) सोबत अर्जुन रेड्डी चित्रपटात शालिनीनेही सुंदर अभिनय केला होता. तिच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं होतं. यानंतर आता ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहे.
OMG अर्जुन रेड्डी स्टार Vijay Deverakonada सोबत झळकणार Janhvi Kapoor
शालिनीनेही रणवीरसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. शालिनीने याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, मी नशीबवान आहे की, मला रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळत आहे. रणवीर सध्याच्या पिढीतील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. तो एक व्हर्सटाईल अभिनेता आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्यास मी खूपच उत्सुक आहे आणि मला चांगल काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल.
कबीर सिंगच्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्यास रणबीर कपूर उत्सुक
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.