ADVERTISEMENT
home / मनोरंजन
shamshera_fb

शमशेराचा टीझर पाहून प्रेक्षक झाले थक्क

 सध्या बॉलिवूडचे फार काही चांगले दिवस आहेत असे अजिबात दिसत नाही. एका मागून एक चित्रपट येतायत खरे पण बॉक्स ऑफिसवर त्याची फारशी जादू चालताना दिसत नाही. आता महिन्यांपूर्वी आलेल्या कोणत्या चित्रपटाने तुमचे मन जिंकले असा विचार केला तरी खूप डोके खाजवावे लागेल. पण आता बॉलिवूडचे वाईट दिवस जाणार आहेत कारण मोस्ट अवेटेड अशा ‘शमशेरा’ ( Shamshera) चा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर बऱ्याच महिन्यांनी चांगला चित्रपट पाहायला मिळेल असा प्रतिसाद मिळत आहे. काय आहे हा टीझर आणि कसा असणार शमशेरा चला घेऊया जाणून 

अधिक वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’ मध्ये दीपिका पदुकोण साकारणार महत्वाची भूमिका

समशेरा मनाला भावणारा

रणबीर कपूर स्टारर समशेरा ( Shamshera) या चित्रपटाची खूप जोरदार चर्चा आधीपासूनच सुरु होती. याच्या फर्स्ट लुकची सगळीकडे चर्चा होत असताना आता याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अन्यायाविरोधात लढण्यासाठी आलेला हा देवदूत पहिल्या फ्रेममध्येच आपले मन जिंकून जातो. कारण त्याची एंट्री होताच जो दबदबा निर्माण होताना दाखवला आहे त्यामुळे हा चित्रपट एकदम दमदार असणार आहे असे दिसते. एका लढवय्याच्या रुपात रणबीर कपूर असून त्याचा लुकही एकदम वेगळा आहे. मोठी दाढी, केस आणि मेस्सी असा त्याचा लुक पाहिल्यानंतर तुम्हाला साऊथचा रफ लुक आल्यासारखे नक्की वाटेल. आताशी याचा दोन मिनिटांचा टीझर आलेला आहे. आदित्य चोप्रा निर्मित या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होईल. कारण हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात 22 तारखेला रिलीज होणार आहे. 

साऊथमध्ये होणार डब

आतापर्यंत आपल्याला साऊथचे चित्रपट हिंदीत डब करायची सवय झाली आहे. साऊथ चित्रपटांचे चाहते पाहता अनेक निर्माते या चित्रपटांचे राईट्स घेण्यासाठी पुढे असतात. नुकताच KGF येऊन गेला या चित्रपटाने सगळ्या हिंदी चित्रपटांना मागे टाकले. पण समशेरा हा चित्रपट तामिळ, तेलुगु या भाषांमध्ये डब होणार आहे. याचे टीझरही या भाषांमध्ये रिलीज झालेले पाहून नक्कीच बॉलिवूडकरांसाठी अभिमानाची अशी गोष्ट आहे. 

ADVERTISEMENT

संजय दत्त व्हिलनच्या भूमिकेत

संजय दत्तचा अभिनय हा उतरत्या वयात अधिक चांगला परिपक्व होत चालला आहे असे म्हणायला हवे. कारण त्याने आता केलेल्या काही भूमिका या चांगल्याच भावणाऱ्या आहेत. KGF मध्ये त्याने साकारलेला अधिरा अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहे. संजय दत्तचा अभिनयच नाही तर त्याचा लुक हा देखील प्रत्येक चित्रपटात भाव खाऊन जाणारा असतो. संजय दत्त हा एकेकाळी लीड रोल मध्ये आणि हिरोच्या भूमिकेत दिसायचा पण आता त्याला व्हिलन हा सगळ्यात जास्त शोभतो असे म्हणावे लागेल. आता या चित्रपटातही संजय दत्त नक्कीच भाव खाऊन जाणार आहे यात काहीही शंका नाही. 

शमशेराचा हा टीझर तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की बघा. तुम्हाला कोणाचा लुक सगळ्यात जास्त आवडला आम्हाला नक्की कळवा. 

23 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT