ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Shahrukh Khan in Jawan

शाहरुख खानच्या ‘जवान’ मध्ये दीपिका पदुकोण साकारणार महत्वाची भूमिका 

बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. शाहरुख गेल्या चार वर्षांत कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. मात्र गेल्या काही दिवसांत शाहरुखने बॅक टू बॅक चित्रपटांची घोषणा करून चाहत्यांना खूश केले आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांच्या यादीत ‘जवान’ या चित्रपटाचे नावही सामील आहे, हा एक ऍक्शनपट असेल. स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात शाहरुख खानसोबत साऊथ अभिनेत्री नयनतारा दिसणार आहे. पण आता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणही झळकणार असल्याची इंडस्ट्रीत चर्चा सुरु आहे.

दीपिका व शाहरुख यांच्यात झाली चर्चा 

नयनतारा व्यतिरिक्त जवान या चित्रपटात सान्या मल्होत्रा, राणा दग्गुबती आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकार देखील दिसणार आहेत आणि आता एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की या चित्रपटात दीपिका पदुकोण देखील छोट्या भूमिकेत दिसणार आहे.या रिपोर्टनुसार काही दिवसांपासून दीपिका व शाहरुख यांच्यात या चित्रपटासंदर्भात चर्चा सुरु होती. या चर्चेनंतर आता अशी माहिती बाहेर येतेय की दीपिका या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारणार आहे, जी चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका असेल. परंतु रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की अद्याप दीपिका आणि निर्मात्यांमध्ये या चित्रपटासंदर्भात कुठलाही कागदोपत्री करार झालेला नाही. 

हैद्राबादमध्ये शाहरुखने घेतली दीपिकाची भेट

अलीकडेच शाहरुख खान या चित्रपटाच्या कामासाठी हैद्राबादला  गेला होता. येथे त्याने दिग्दर्शक ऍटली यांचीही भेट घेतली. विशेष म्हणजे दीपिका पदुकोण देखील हैद्राबादमध्ये तिच्या ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. शाहरुखच्या या हैद्राबाद दौऱ्यात त्याने दीपिकाची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान आणि दिग्दर्शक ऍटली यांनी दीपिकाची भेट घेऊन तिच्याशी तिच्या व्यक्तिरेखेबाबत तसेच शूटिंगच्या तारखांबाबत चर्चा केली. दीपिका शाहरुख खानसोबत ‘पठाण’ या आगामी चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमचीही महत्वाची भूमिका आहे.

चित्रपट प्रदर्शित होणार पुढच्या वर्षी 

‘जवान’ हा चित्रपट रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तयार होत आहे, जो संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्माती गौरी खान आहे. संपूर्ण भारतात एकाच वेळी प्रदर्शित होणारा शाहरुखच्या तीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील हा पहिलाच चित्रपट असेल. या चित्रपटातील अभिनेत्याचा लूक खूपच वेगळा आहे, जो चाहत्यांना यापूर्वीच टीझरमध्ये बघण्यास मिळाला आहे.वास्तविक, शाहरुख खान दीर्घकाळ रुपेरी पडद्यावर न दिसल्याने शाहरुखचे सर्व चाहते नाराज झाले होते, मात्र आता त्याच्या ‘जवान’ या नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे तेव्हापासून किंग खानचे फॅन्स हा नवा चित्रपट बघण्यास अतिशय उत्सुक झाले आहेत. कारण हा टीझर पाहता शाहरुखचा हा चित्रपट खूप वेगळ्या विषयावर असल्याचे दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

या चित्रपटाचे नाव जवान आहे, त्यामुळे हा चित्रपट लष्करावर असेल किंवा सैनिकांवर असेल, असा अंदाज लावला जात आहे. चित्रपटाचा टीझर खूपच वेगळा आहे. यामध्ये समोर आलेला शाहरुखचा लूक त्याच्या आतापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा खूपच वेगळा आहे. टीझरमध्ये शाहरुखचा फक्त अर्धा चेहरा दिसत आहे. त्याचा अर्धा चेहरा बँडेजने झाकलेला आहे. टीझरमध्ये शाहरुख जखमी अवस्थेत दिसत आहे. सोबत हातात बंदूक आणि डोळ्यात कोणाचा तरी शोध असा शाहरुखचा लूक आहे. टीझर पाहून वाटतंय की शाहरुख चित्रपटात कोणत्यातरी मिशनवर आहे. 

हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

22 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT