ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Shantit kranti

मैत्रीवर आधारित नवी वेबसिरिज, शांतीत क्रांती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मैत्री ही गोष्ट आयुष्याला एक वळण देणारं नातं आहे. मैत्रीच्या नात्यात कोणती बंधने नसतात की कोणते नियम… मैत्रीचे नाते म्हणजे निखळ आनंद देणारे नाते. एवढंच नाही तर कधी-कधी आयुष्यात काही बिघडलेल्या गोष्टी नीट होण्यासाठी मित्रांसोबत एक पिकनिक ब्रेक मस्ट असतो. अशावेळी जर जवळच्या मित्रांसोबत धमाल रोड ट्रिप फिक्स झाली तर मग काय विचारायलाच नको. लवकरच तीन मित्रांची अशी धमाल गोवा ट्रिप वेबसिरिजच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. यासोबत द्या खास फ्रेंड्सनां द्या मैत्री दिनानिमित्त खास शुभेच्छा

काय आहे शांतीत क्रांती

उत्तम, विचारप्रवर्तक कन्टेंटसोबत प्रादेशिक घटकांवर भर देत असताना सोनी लिव्ह या वाहिनीने आपल्या आगामी मराठी ओरिजिनल- ‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ज्यामध्ये मैत्री, प्रवास आणि स्वतःचा शोध दाखवण्यात येणार आहे. ही  कथा आहे तीन बेस्ट फ्रेंड्सची… ज्यांची नावे आहेत श्रेयस, प्रसन्न आणि दिनार. शांतीत क्रांती ही त्यांनी आपल्या आयुष्यातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गोव्याला केलेल्या रोड ट्रिपची गोष्ट आहे. एक साधी रोड ट्रिप त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणते. ती त्यांना आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि आयुष्यातील कधीही न अनुभवलेल्या गोष्टी अनुभवण्याची संधी देते. शांतीत क्रांती ही शांतता आणि कल्याणाचे प्रतीक असून या शोमध्ये सुंदर पद्धतीने तीन मित्रांची मैत्री दाखवण्यात आली आहे. अशी मैत्री जी अत्यंत अर्थपूर्ण आणि धमाल असून प्रेक्षकांना आपल्या जीवनाशी कनेक्ट होत जाते.

कसा होता शांतीत क्रांतीचा अनुभव  

भारतीय डिजिटल पार्टी (भाडिपा) या मराठी साहित्याच्या पेजचे संस्थापक सारंग साठे आणि पॉला मॅकग्लिन यांचे दिग्दर्शन असलेल्या या शोमध्ये लोकप्रिय मराठी कलाकार अभय महाजन (श्रेयस), ललित प्रभाकर (प्रसन्न) आणि आलोक राजवाडे (दिनार) आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसतील. या शोमध्ये लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री शिखा तलसानिया मराठीत प्रथमच दिसणार असून ती प्रमुख भूमिकेत दिसेल. नात्यातील असुरक्षिततेसारख्या समस्या, आयुष्यातील अशाश्वता, अपूर्ण स्वप्ने अशा समस्यांचा सामना करण्यापासून हा शो नवीन दृष्टीकोन आणि शिकवण हलक्याफुलक्या पद्धतीने लोकांसमोर आणतो. शांतीत क्रांती ही फक्त तीन जवळच्या मित्रांची कथा नाही तर त्यांचा स्वतःचा शोध आणि ओळख यांच्या दिशेने त्यांनी केलेला हा प्रवास आहे. आश्चर्यकारक, हास्याच्या उकळ्या फुटणारे क्षण, रस्त्यावरील अनुभव, दिलखेचक संवाद आणि ताल धरायला लावणारे रॅप संगीत यांच्यामुळे हा शो नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. या शोचे दिग्दर्शक सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लिन म्हणाले की, “शांतीत क्रांती हा फक्त शो नाही तर तो आयुष्याचा एक सुंदर अनुभव आहे. हा शो सोनीलिव्ह, आमची क्रिएटिव्ह टीम आणि आमच्या टॅलेंटेड कलाकारांमधील भागीदारीचा परिपाक आहे. त्यामुळे हा शो शक्य झाला आहे. रोड ट्रिप, कथा, निर्माण झालेल्या आठवणी आणि अनुभव हे सर्व नॉस्टॅल्जिया, हास्याचे क्षण आणि आयुष्याला मिळालेले धडे हे घेऊन येतील. ही कथा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आवडेल आणि आम्हाला आशा आहे की, ते नक्कीच या राइडचा आनंद घेऊ शकतील.”

श्रेयस तळपदे पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर, या मालिकेतून येतोय परत

ADVERTISEMENT

भेटली ती पुन्हा 2” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!!

नोरा फतेही आहे धकधक गर्लची फॅन, करायचं आहे माधुरीच्या बायोपिकमध्ये काम

29 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT