“जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही,
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही”
– कवी संदीप खरे
Table of Contents
- बेस्ट आयुष्यावरील शायरी | Best Shayari On Life In Marathi
- जीवनावरील शायरी | Shayari In Marathi On Life
- आयुष्यावरील शायरी चारोळी | Shayari On Life In Marathi
- खोलवर अर्थ असलेली आयुष्यावरील शायरी | Deep Shayari On Life In Marathi
- दुःखी आयुष्यावरील शायरी | Sad Shayari On Life In Marathi
- लेटेस्ट आयुष्यावरील शायरी | Latest Shayari In Marathi On Life
संदीप खरेच्या या कवितेप्रमाणे आयुष्य हे नेहमीच गूढ आणि रहस्यमय असतं. जीवनात प्रत्येकाला येणारा अनुभव हा सारखा कधीच नसतो. कोणाच्या आयुष्यात आनंद असतो तर कोणाच्या आयुष्यात दुःख, सुखदुःखाचा हा सारीपाट प्रत्येकाला कधी ना कधी तरी खेळावाच लागतो. आयुष्यात आलेल्या या कडू, गोड आठवणी कवी मात्र काव्य पद्धतीने इतरांसमोर मांडू शकतात, यातीस काही काव्यप्रकारांना आपण शायरी असं म्हणतो. आयुष्यात आलेले हे अनुभव शायरी रूपात इतरांसोबत वाटले की सुख वाढतं आणि दुःख कमी होत जातं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत अशाच काही आयुष्यावरील शायरी (Shayari On Life In Marathi) या लेखात तुम्ही पाहू शकता Best Shayari On Life in Marathi, Sad Shayari On Life in Marathi, Emotional Shayari In Marathi On Life, Latest Shayari In Marathi On Life… आम्हाला खात्री आहे की, निरनिराळ्या भावना व्यक्त करणाऱ्या या आयुष्यावरील शायरी तुम्हाला नक्की आवडतील. यासोबतच वाचा गुड मॉर्निंग शायरी | Good Morning Shayari In Marathi, वेळेवर आधारित स्टेटस आणि शायरी | Time Status, Quotes, Shayari, Suvichar Marathi, दु:खातील शायरी (Marathi Sad Shayari)
बेस्ट आयुष्यावरील शायरी | Best Shayari On Life In Marathi
जीवन खूप सुंदर आहे, आयुष्यात येणाऱ्या सर्व चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव मांडणाऱ्या या काही आयुष्यावरील शायरी (Shayari in Marathi on Life) ज्या तुम्ही शेअर करू शकता तुमच्या मित्रमंडळी आणि जिवलगांसोबत…
1.आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.
2.आयुष्यातील काही क्षण एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तिथेच मिळतील. कारण एकांताच आपला स्वतःशी संवाद होत असतो.
3. ना कोणाच्या अभावाने जगतो, ना कोणाच्या प्रभावाने जगतो… असे जीवन माझं आहे, मी फक्त स्वतःच्या स्वभावाने जगतो.
4. जीवनात अनुभव अमुल्य असतात, कसं जगायचं हे नकळत शिकवतात.
5. जगाला काय आवडेल ते करू नका, तुम्हाला काय वाटतं ते करा. कारण कदाचित तुमचं आजचं वाटणं उद्या जगाची आवड बनेल.
6. जीवनात जगाला नाही,स्वतःला बदला. तुम्ही बदलला की जग आपोआपच बदलेल.
7. साधी माणसं आणि सरळ रस्ते प्रत्येकाला समजतीलच असं नाही
8. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे, चांगली पत्ते मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पत्त्यांवर चांगला डाव खेळणं नक्कीच आपल्या हातात असतं.
9. आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीच तोडू नका.
10. आपले तर खूप आहेत आयुष्यात पण आपलेपणा कोणाकडेच नाही.
जीवनावरील शायरी | Shayari In Marathi On Life
जीवन हे जर एक पुस्तक असेल तर या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर तुम्हाला चांगले वाईट अनुभव दडलेले आहेत. हे अनुभव शेअर करण्यासाठी खास जीवनावरील काही निवडक शायरी (Best Shayari On Life in Marathi).
1. आयुष्य हे सर्कसमधल्या जोकरासारखं झालंय, कितीही दुःख असलं तरी जगासमोर हसावंच लागतं.
2. आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखवू नका, जी तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते.
3.आयुष्याची स्वप्न पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं, गुलाबाला स्पर्श करताना काट्यांचं भान नेहमी ठेवायचं असतं.
4. स्वप्न पाहायचं थांबलं की आयुष्यही थांबतं, विश्वास उडाला की आशा संपते, काळजी घेणं सोडलं की प्रेम कमी होतं… म्हणूनच स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या… कारण आयुष्य खूप सुंदर आहे.
5. आयुष्यात स्वतःबद्दल चांगलं सांगणारे खूप भेटतील, पण आपल्याबद्दल जाणून घेणारे मात्र नेहमी मोजकेच असतील.
6. आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे, टेस्ट केलं तरी वितळतं, वेस्ट केलं तरी वितळतं !!! म्हणून टेस्ट करायला शिका कारण वेस्ट तर ते आपोआपच होत असतं.
7. आयुष्य सुंदर आहेल फक्त आयुष्यात येणारे स्वार्थी लोक जवळ असायला नको.
8. आयुष्य ही अवघड शाळा आहे, कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठावूक नसतं, कोणती परिक्षा आहे आपल्याला माहीत नसतं. या परिक्षेत इतरांची कॉपी देखील करता येत नाही. कारण, प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच वेगळी असते.
9. देह सोन्याने मढवून फायदा नाही, त्यापेक्षा आयुष्य सोनेरी करा… कारण मेल्यावर देहाची राख होते पण सोन्यासारखी माणसं नेहमी लक्षात राहतात.
10. आयुष्य आरामात जगायचे असेल तर सर्व ऐकून घ्या, पाहून घ्या. उगाच व्यर्थ बडबड करण्यात आयुष्य वाया घालवू नका.
आयुष्यावरील शायरी चारोळी | Shayari On Life In Marathi
आजकाल सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्याचा ट्रेंड आहे. तुम्हालाही तुमच्या फेसबूर, व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवण्यासाठी शायरी हव्या असतील तर वाचा या आयुष्यावरील शायरी (Latest Shayari In Marathi On Life)
1. आयुष्य तेच आहे, पण दर दिवशी नव्याने जगायचं, समरसून प्रत्येक क्षण जगलो तरी, नाही कशातही खूप अडकायचं
2. जीवनात सगळं मिळत नाही, म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो, कुठल्यातरी वळणावर, आपला वाट पाहणाराही असतो.
3.जीवन कसं पक्ष्यासारखं असावं, कुठेही उडावं आणि कसं ही जगावं, मरताना देखील कधी कुणावर आपलं ओझं नसावं.
4. आयुष्य हे असंच असायचं, वर्तमान काळात घर करून राहायचं आणि भूतकाळास मागे सारायचं, भविष्याकडे मात्र नजर रोखून पाहायचं
5. आयुष्य कसं असतं बाभळीच्या पालवी सारखं, काट्यात फुलणारं आणि काट्यातच विरणारं
6. आयुष्य जगताना ते मनमोकळेपणाने जगावं, स्वतःचं ऐकता ऐकता कधीतरी समोरच्याचंही ऐकावं.
7. आयुष्य हे चित्रासारखं आहे, मनासारखे रंग भरले की फुलासारखं खुलून येणारं
8. एकदा तरी आयुष्यात असे कुणीतरी भेटावे, ज्याला माझे दुःख न सांगता कळावे
9. जीवन हे रहस्य आहे, इथे सगळंच लपवायचं असतं, मनात कितीही दुःख असलं तरी दुसऱ्यांपुढे हसायचं असतं
10. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठएवा मैत्री सर्वांशी करा मात्र विश्वास फक्त स्वतःवरच ठेवा
खोलवर अर्थ असलेली आयुष्यावरील शायरी | Deep Shayari On Life In Marathi
आयुष्यातील प्रत्येक अनुभव तुम्हाला नकळत काही तरी धडा देत असतो. म्हणूनच इतरांचे अनुभव आपल्याला मार्गदर्शक ठरतात. असेच काही जीवनाचा खोलवर दडलेला अर्थ सांगणाऱ्या आयुष्यावरील शायरी (Deep Shayari on Life in Marathi)
1. आयुष्य हे दुचाकीसारखं आहे… तोल सांभाळण्यासाठी तुम्हाला सतत पुढे जातच राहवं लागेल.
2. एखाद्याला त्याच्या अडचणीच्या काळात जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.
3. सगळे म्हणतात आयुष्य खूप सुंदर आहे. पण मला तुला बघितल्यावर यावर विश्वास बसला.
4. आयुष्य म्हणजे खेळ नाही, फुकट मिळालेला वेळ आहे, आयुष्य एक कोडे आहे जितकं सोडवाल तितकं ते थोडं आहे.
5. आयुष्य खूप छोटं आहे, त्यामुळे ते अशा लोकांच्यासोबत ते घालवा जे तुमची किंमत जाणतात.
6. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त त्याला प्रेमाची साथ हवी, एका ह्रदयाला दुसऱ्या ह्रदयाची हाक हवी
7. जन्म टिंबासारखा असेल तर आयुष्य ओळीसारखं आहे, टिंब टिंब मिळून ते पुढे सरकत असतं.
8. आयुष्यात कधी कधी असं वाटतं की काही माणसं जरा आधी भेटली असती तर किती बरं झालं असतं आणि काही माणसं भेटलीच नसतील तर खूप बरं झालं असतं.
9. आयुष्य सुंदर आहे फक्त आपल्याला दुसऱ्याच्या मनाला जपता यायला हवं आणि आपल्या मनाप्रमाणे जगता यायला हवं.
10. इतरांचा द्वेष करत वेळ घालवण्याइतकं आपलं आयुष्य नक्कीच मोठं नाही.
दुःखी आयुष्यावरील शायरी | Sad Shayari On Life In Marathi
जीवनात जसं सुख वाट्याला येतं तसंत दुःखही येत असतं. अशा कठीण काळात जगणं सुसह्य व्हावं यासाठी दुःखी आयुष्यावरील शायरी (Sad Shayari on Life in Marathi)
1. आयुष्य एक शापशिडीचा खेळ आहे, इथं शिड्या कमी पण गिळणारे सापच जास्त आहेत.
2. आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीच चोरू शकणार नाही.
3. स्वप्न फुकटंच असतात, पण त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
4. एकट्यानेच लढावी लागते आयुष्याची लढाई, लोक सल्ला देतात पण सोबत देत नाहीत
5. आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा निर्णय तुझा आहे, पण मरेपर्यंत मी तुझी साथ देईन हा शब्द माझा आहे.
6. आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीच न बोलता आठवणी निघून जातात. तरीपण आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात.
7. विश्वास हा किती छोटा शब्द आहे, वाचायला सेंकद लागतो तर विचार करायला मिनीट लागतो. समजायला दिवस लागतो तर सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागतं.
8. माझ्या आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक अभ्यास तुझा आहे, कहाणी तर माझी होती पण प्रत्येक पानावर तुझं नाव आहे.
9. वेडावलोय तुझ्याचसाठी, सांभाळून मला घेशील का, जीवापाड प्रेम करतो तुझ्यावर आयुष्यभर साथ देशील का
10. आयुष्यातील असंख्य समस्यांची दोन कारणं असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो.
लेटेस्ट आयुष्यावरील शायरी | Latest Shayari In Marathi On Life
सोशल मीडिया हा आजकाल लोकांसमोर व्यक्त होण्याचं प्रभावी माध्यम ठरत आहे. तुम्हालाही आयुष्यावर काही बोलायचं असेल तर शेअर करा हे लेटेस्ट आयुष्यावरील शायरी स्टेटस (Latest Shayari in Marathi On Life).
1.आयुष्य खूप लहान आहे, जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा.
2. आयुष्यात तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे जगलात याला जास्त महत्त्व आहे.
3. आयुष्य समुद्र आहे, ह्रदय त्याचा किनारा आहे, नाती म्हणजे लाट आहेत, मात्र महत्त्व त्यालाच आहे तुमची लाट किनाऱ्यावर कितीवेळा येते.
4. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलत राहतात,सर्व प्रश्न सोडवून सुटत नाहीत, तर काही प्रश्न सोडून दिले तर आपोआप सुटतात.
5. चारचौघात बसण्यापेक्षा कधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेवून बसावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं…
6. भावनांना अंत आहे असं नाही, आयुष्य शांत आहे असं नाही, मनात खंत आहे असं नाही, दिसतो साधा पण मी संत आहे असं नाही.
7. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणं आणि आयुष्यातील सगळ्यात मोठं यश म्हणजे आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे.
8. आयुष्य तुम्हाला मागे खेचत असेल तर लक्षात ठेवा तुम्ही खूप पुढे जाणार आहात, कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो.
9. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे पण लढण्यात शान आहे
10. जीवनात चढ उतार येत असतात. नेहमी हसत राहा. कारण असा चेहरा काय कामाचा जो कधीच हसत नाही.
Conclusion – आम्ही शेअर केलेल्या या आयुष्यावरील शायरी Shayari On Life In Marathi, Best Shayari On Life in Marathi, Sad Shayari On Life in Marathi, Emotional Shayari In Marathi On Life, Latest Shayari In Marathi On Life तुम्हाल कशा वाटल्या हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.