अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला जाऊन आता काहीच महिने झाले असतील पण अजूनही अनेकांच्या आठवणीतून अजूनही सिद्धार्थ गेलेला नाही. सिद्धार्थची सगळ्यात जवळची आणि खास असलेली मैत्रीण शहनाज गील अजूनही या दु:खातून बाहेर आलेली नाही. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरुन गायब असलेली शहनाज तिच्या नव्या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. सिद्धार्थच्या आठवणीत तयार केलेले गाणे आणि आगामी सिनेमा याचे प्रमोशन करताना ती एवढी भावूक झाली तिला अश्रू अनावर झाले. तिचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. पाहुयात नेमकं काय झालं ते
भारती सिंहचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण, 15 किलो वजन केलं कमी
हौसला रख
दिलजीत दोसांज आणि शहनाज गील यांचा ‘हौसला रख’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी शहनाजसमोर ज्यावेळी सिद्धार्थचा विषय आला. त्यावेळी शहनाज फारच भावुक झाली. ती भावना आवरायचा प्रयत्न करत होती. पण तिला तिच्या भावना अजिबात आवरता आले नाही. तिला रडू कोसळले. ती ढसाढसा रडू लागली. तिच्या बाजूला असणाऱ्या दिलजीत दोसांज यांने तिचे सात्वंन केले. भावना आवर. असे सांगून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण हा व्हिडिओ पाहून #sidnaaz खूपच भावुक झाले आहेत. असे व्हायला नको होते. अशा प्रतिक्रिया सगळीकडून उमटत आहेत. इतकेच नाही. तर अनेक ठिकाणी हा व्हिडिओ देखील व्हायरल होऊ लागला आहे. त्यावर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.
अभिनेता आर्यन हगवणेचा लक्षवेधी लुक ‘खुर्ची’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर
सिद्धार्थचे दु:ख विसरली नाही शहनाज
सिद्धार्थला जाऊन काही महिने झाले असतील पण अजूनही अनेकांना सिद्धार्थ गेला असे अजिबात वाटत नाही. सिद्धार्थ गेल्यानंतर शहनाज पूर्णपणे ढासळून गेली होती. ती काही दिवस प्रकाशझोतातून दूर निघून गेली होती. इन्स्टा अकाऊंटपासून ते कोणत्याही सोशल मीडियावर तिने आपले काहीही व्हिडिओ किंवा पोस्ट करणे बंद केले होते. त्याच्या मृत्यूपश्चात तिने कोणतीही पोस्ट केली नाही. त्यामुळे अजूनही ती त्यातून सावरलेली नाही हे दिसत आहे. सिद्धार्थच्या आठवणीत तिने एक गाणं पोस्ट केलं आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ सगळीकडे दिसत आहे. हे गाणं शूट करतानाही तिला अनेकदा आठवणींचा बांध फुटला असेल यात काही शंका नाही.
शहनाजने केले वजन कमी
शहनाज गील आणि सिद्धार्थ यांची मैत्री बिग बॉसच्या घरात झाली होती. घरात त्यांची मैत्री चांगलीच फुलली होती. त्या सीझनपासूनच त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध लोकांनाही आवडले होते. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र आणि पुढे ते लग्न करतील अशाही अफवा येत होत्या. पण या अफवांना झुगारुन हे दोेघे छान एकत्र होते. अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र असायचे. मधल्या काळात शहनाज वेगळी दिसू लागली की, कारण तिने चांगलेच ट्रान्सफॉर्मेशन केले होते. तिचा नवा लुक अनेकांना आवडला. तिने गेल्या वर्षभरात वजन कमी करुन झीरो फिगर केली त्यामुळेच ती अधिक चर्चेत आली होती.
सिद्धार्थच्या आठवणीत भावूक झालेली ही शहनाज त्या आठवणीतून कधी बाहेर पडणार असा प्रश्न आहे.
Bigg Boss Marathi:आणखी एका वाईल्ड कार्ड एंट्रीची एक्झिट, नीथा शेट्टी बाहेर