अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलीवूडची एक अशी अभिनत्री आहे जी सतत तिच्या फिटनेसबाबत सतर्क असते.निरोगी राहण्यासाठी शिल्पाने योगविद्या शिकून घेतली आहे. नियमित वर्कआऊट आणि हेल्दी फूड हे तिच्या चिरतरूण सौंदर्याचं रहस्य आहे. एवढंच नाही तर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सनां सतत फिटनेसचे धडे देत असते. आता निरोगी जीवनशैलीसाठी शिल्पाने एक कठोर निर्णय घेतला आहे. हा निर्णय ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल.
शिल्पाने काय घेतला आहे निर्णय
शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या मुलासह म्हणजे वियान सोबत शेतात जाऊन सेंद्रिय भाज्या निवडत आहे. या व्हिडिओसोबत शिल्पाने एक भली मोठी पोस्ट चाहत्यांसाठी लिहीली आहे. ज्यात तिने तिच्या या निर्णयाचा खुलासा केला आहे. या पोस्टनुसार शिल्पा आता पूर्णपणे ‘शाकाहारी’ होणार आहे. शिल्पाने पोस्टमध्ये शेअर केलं आहे की, “मला स्वतःचा विकास स्वतःच करायचा आहे हे माझं एक स्वप्नच आहे. मात्र आता मी तुमच्यासोबत असं काहीतरी शेअर करू इच्छिते जे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. खरंतर हा माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि इथपर्यंत पोहचण्यासाठी मला अनेक टप्पे पार करावे लागले. हा निर्णय माझ्यासाठी नक्कीच कठीण होता. एका क्षणीतर मला हा निर्णय जवळजवळ अशक्य वाटू लागला होता. ज्यामुळे मी हे करणं कदाचित सोडून देईन असं वाटलं होतं. पण मी आता फायनली पूर्ण शाकाहारी झाली आहे. सुरूवातीला मी पर्यावरणातून माझ्यातर्फे कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. काही वर्षांपासून माझ्या असं लक्षात आलं आहे की, मांसाहारामुळे जंगलच नाही तर पर्यावरणातील कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन आणि नायट्रोजनही कमी होत आहे. शाकाहारी झाल्यामुळे केवळ प्राण्यांनाच वाचवता येतं असं नाही तर यातून अनेक आजारही कमी होतात. त्यामुळे हा निर्णय आपले आरोग्य आणि पर्यावरणाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे असं मला वाटतं” असं आणि बरंच काही तिने या पोस्टमधून चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. तिच्या मते पृथ्वीवर जे बदल होत आहेत त्यासाठी माणूसच जबाबदार आहे.यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या जीवनशैलीत बदल करणं आता गरजेचं आहे. शाकाहारी झाल्यामुळे शिल्पा तिच्या युट्यूब चॅनेलवर भविष्यात कोणतीही नॉन-व्हेज डिश शेअर करणार नाही. मात्र यापूर्वी तिने शेअर केलेल्या नॉन-व्हेज डिश मात्र ती नक्कीच डिलीट करणार नाही.शिल्पाच्या या पोस्टवर तिच्या मित्रमंडळी आणि चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शिल्पा शेट्टी आाणि तिचं सुखी कुटुंब
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे बॉलीवूडचे एक हॅपी कपल आहे. त्यांच्या लग्नाला आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. शिल्पा शेट्टी नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली असून तिला सरोगसीच्या माध्यमातून मुलगी झाली आहे. तिच्या मुलीचं नाव शमिशा असून तिचे क्यूट फोटो आणि अपडेट ती सतत फॅन्ससोबत शेअर करत असते. शिल्पा नेहमीच तिच्या मुलाला मुलाला वियानलादेखील काहितरी चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करत असते. शिल्पाने लग्नानंतर चित्रपटात काम करणं कमी केलं होतं. मात्र शिल्पा बऱ्याचदा रिअॅलिटी शो आणि फिटनेस व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत असते. तिचे फूड आणि फिटनेस असे दोन्ही व्हिडिओज प्रेक्षकांना फार आवडतात. लवकरच शिल्पा बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा चित्रपटात दिसणार आहे. तिचा ‘निकम्मा’ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. लॉकडाऊन या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत पुन्हा बदलली शनाया, रसिका येणार का परत
इंडो-चायना गलवान तणावावर अजय देवगण बनवणार चित्रपट
जिया चौहानने देवी पार्वतीची भूमिका साकारण्यासाठी स्वतःमध्ये केले असे बदल