केळं हे सर्वसामान्याचं फळ आहे. त्यामुळेच भूक लागल्यानंतर गरीबातील गरीबही केळी खाण्याला पसंती देतो. आता या केळ्यांची किंमत खिशाला परवडणारी असते. म्हणजे 10 रुपयांना 4 वगैरे अशी केळी बाजारात मिळतात. पण अभिनेता राहुल बोसला मात्र दोन केळ्यांचे चक्क 400 रुपये भरावे लागले आहे. केळी खाल्यानंतर तो ज्यावेळी त्याचे पैसे द्यायला गेला. त्यावेळीच दोन केळ्यांची किंमत पाहून तोही चाट पडला आणि त्याने लगेचच याचा व्हिडिओ केला आणि ट्विटरवर शेअर केला.
नेमकं प्रकरण काय?
राहुल बोस काही कामानिमित्त चंदिगढ येथील jwmarriot हॉटेलमध्ये राहायला होता. त्याने जीममध्ये जाण्याआधी दोन केळी मागवली. त्या केळ्यांसोबत हॉटेलने बीलही पाठवले.. तेव्हा त्या दोन केळ्यांची किंमत चक्क 442.50 रुपये इतकी लावली होती. ही किंमत GST सकट लावण्यात आली होती. ते बील पाहून त्याने लगेचच एक व्हिडिओ केला. 22 जुलै रोजी त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला असून त्याला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामधील काही प्रतिक्रिया लोकांनी राहुल बोसच्या विरोधातही दिल्या आहेत. राहुल बोसला काही लोकांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचेदेखील म्हटले आहे.
मुंबईतील नाईट लाईफ अनुभवायचं आहे, मग या ठिकाणांना जरूर भेट द्या
You have to see this to believe it. Who said fruit wasn’t harmful to your existence? Ask the wonderful folks at @JWMarriottChd #goingbananas #howtogetfitandgobroke #potassiumforkings pic.twitter.com/SNJvecHvZB
— Rahul Bose (@RahulBose1) July 22, 2019
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडिओमध्ये राहुल बोसने झालेला सगळा प्रकार सांगितला आहे. तो शुटींगसाठी चंदीगढ येथील JWmarriot या हॉटेलमध्ये थांबला होता. त्याने त्याची लॅविश रुम दाखलवली. याशिवाय त्याने मागवलेली केळी आणि त्याचे बीलही दाखवले आहे. केळ्यांच्या किंमतीवरुन त्याने या हॉटेललाही फटकारले आहे. ही एक प्रकारे लूट असल्याचे म्हटले आहे.
Confirmed : करण पटेलनी सोडली ‘ये है मोहब्बतें’ सीरियल
आता फळांच्या किमतीही गगनाला
राहुल बोसने हा व्हिडिओ शेअर करत या खाली जी कॅप्शन लिहिली आहे. त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कारण एका फ्रुट प्लॅटरची किंमतही इतकी जास्त नसेल तितकी या दोन केळ्यांची आहे असे त्याने सांगितले. शिवाय कोण म्हणतं की, फळं आरोग्याला हानीकारक नाहीत..(कारण ती खिशाला हानीकारक ठरु शकतात असे त्याला म्हणायचे आहे.)
प्रतिक्रियांचा पाऊस
राहुलने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. गरीबांचे फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळ्याची किंमत इतकी कशी असे प्रश्न उपस्थित केले आहे. याचा फटका भविष्यात सामान्यांना बसू देऊ नका अशा प्रतिक्रियाही युजर्सनी दिल्या आहेत. या शिवाय GST चा मुद्दा उपस्थित करत अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. वाचा प्रतिक्रिया
आता या नव्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकतील का,तुम्हाला काय वाटतं
They r smart they mentioned it as food not banana
— Namita (@Namita312009) July 24, 2019
its fraud, they can't charge GST on fresh fruits & vegetables.
— Atul KHULLAR (@AtulKhullar) July 22, 2019
gold plated Bananas ?
— કડક ચા कडक चहा வலுவான தேநீர் (@KadakChaa) July 22, 2019
That's the reality. I am happy that you atleast dared to share it otherwise people who consider themselves a celebrity, would have not done it@JWMarriottChd @RahulBose1
— Susheel Dwivedi (@tech01u2) July 24, 2019
विश्वरुपम 2मध्ये दिसला होता राहुल बोस
राहुल बोसने अनेक चित्रपट केले आहे. लीड रोलही केले आहेत. पण आता तो फारच कमी चित्रपटातून दिसतो. 2018 साली आलेल्या विश्वरुपम 2 या चित्रपटात तो दिसला होता. आणि सध्या तो एका चित्रपटाच्या शुटींगसाठी चंदीगढमध्ये आहे. 51 वर्षांचा राहुल बोस अनेक बंगाली चित्रपटातूनही दिसला आहे. करीना कपूरसोबत तो चमेली या चित्रपटात दिसला होता. पण तो नुसताच अभिनेता नसून दिग्दर्शक, स्क्रिन प्ले रायटर, समाजसेवक आणि रग्बी खेळाडूसुद्धा आहे.