अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यातील सर्वच गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. श्वेताचा चाहतावर्गही मोठा असल्यामुळे तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओज पटकन व्हायरल होतात. नुकतंच श्वेताने तिची मुलगी पलकसोबत केलेलं एक बोल्ड फोटोशूट इन्स्टावर शेअर केलं आहे. श्वेता तिवारी आणि पलक तिवारीच्या या बोल्ड आणि हॉट अवतारने सध्या सोशल मीडियावर आग लावली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.
श्वेता आणि पलकचा स्विमिंग पूल अंदाज
श्वेता तिवारी आणि तिची मुलगी श्वेता तिवारी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत असतानाचे काही फोटो सोशल त्यांनी मीडियावर शेअर केले. बघता बघता हे फोटो नेटवर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये चाळीशीतील श्वेताचा ग्लॅम अंदाज दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाची तर तिची मुलगी पलकने पांढऱ्या रंगाची बिकिनी घाललेली असून दोघीही या लुकमध्ये हॉट आणि ग्लॅम दिसत आहेत. श्वेताने या फोटोंसोबत “जेव्हा कधी संभ्रमावस्थेत असाल तेव्हा स्विमिंग करून मोकळे व्हा” असं लिहीलं आहे. यावर अभिनेत्री दिव्यांतका त्रिपाठीने तू नेहमीच हॉट दिसतेस अशी कंमेट दिली आहे. अभिनेता अश्मित पटेलने तर तिला मीदेखील स्विमिंग करण्यासाठी आतूर झालो आहे अशा शब्दात कंमेट दिली आहे. श्वेता आणि पलकचा हा हॉट अवतार सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्या दोघींनाही खूप कंमेट त्यांच्या या पोस्टवर मिळत आहेत. काही युझर्सनीं तर त्यांना स्विमिंग पूलला आग लावली असं म्हटलं आहे. या कंमेटवरून दोघींचे किती फॅन फॉलोव्हर्स आहेत हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल.
श्वेता तिवारीप्रमाणेच तिची मुलगीदेखील दिसायला खूप सुंदर आणि ग्लॅमरस आहे. ज्यामुळे आईसोबत तिचीदेखील नेहमीच चर्चा सुरू असते. श्वेता तिवारीचं आयुष्य नेहमीच खडतर होतं. दोन वेळा लग्न आणि घटस्फोट अशा संघर्षमय समस्यांना तिने तोंड दिलेलं आहे. मात्र तिचं तिच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम आहे. तिची मुलगी पलक तर तिच्याच पावलांवर पाऊल ठेवत मोठी होत आहे. श्वेता लवकरच मेरे डॅड की दुल्हन या मालिकेतून झळकणार आहे. या मालिकेत ती गुनित ही भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या प्रमोशनसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये ती नवरीच्या लुकमध्ये दिसत होती. शिवाय तीने हा लुक शेअर करत असं लिहीलं होतं की “फायनली हा दिवस खूप वर्षांनी आला. मला माझा लुक खूप आवडला आहे. आशा आहे अंबरलाही नक्कीच आवडेल” ज्यावरून श्वेता पुन्हा तिसऱ्यांदा लग्न करणार का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. आयुष्यात काही घडलं तरी श्वेताने स्वतःच्या हिंमतीवर अभिनयक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शिवाय ती तिच्या दोन्ही मुलांची जबाबदारीदेखील चांगल्या पद्धतीने निभावत आहे. पलक तिवारी ही तिचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे. तर तिच्या दुसरा नवरा अभिनव कोहली यांचा मुलगा रेयांशदेखील घटस्फोटानंतर ती एकटीच सांभाळत आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
‘रंग माझा वेगळा’ मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल
सणासुदीला ट्राय करा खणापासून तयार केलेले हे हटके आऊटफिट
कॉटन पैठणी आहे ट्रेंडमध्ये, गोल्डन आणि सिल्व्हर दोन्ही काठ दिसतात छान