‘रंग माझा वेगळा' मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल

‘रंग माझा वेगळा' मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल

मराठी अभिनेत्रींमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांची साडी स्टाईल ही खूपच मस्त असते. प्रत्येक साडी अगदी सहजतेने  कॅरी करून  त्याला आपल्या व्यक्तिमत्वाने सजवणारी अशीच एक अभिनेत्री म्हणजे हर्षदा खानविलकर. सध्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून हर्षदा ही सौंंदर्या इनामदार म्हणूून आपल्या भेटीला रोज येतच आहे. तिची स्टाईल आणि तिच्या साड्या हादेखील नेहमीच चर्चेचा विषय असतो. हर्षदाने गेल्या दोन दशकांपासून मराठी मालिका, चित्रपट, रंगभूमी गाजवली आहे. मालिकांमध्ये नेहमीच वेगवेगळी भूमिका रंगवणारी हर्षदा ही खऱ्या आयुष्यात जशी आहे तशीच नेहमी प्रेक्षकांच्या समोरही असते. तिचा औराच काही वेगळा आहे. विशेषतः साडी नेसल्यानंतर हर्षदाची स्टाईल अधिक खुलून येते आणि तिचे व्यक्तिमत्त्व अधिक भारदस्त दिसते. 

प्रतिपदा क्लोथिंगच्या साड्यांमधील हर्षदाची स्टाईल

हर्षदा खानविलकर सध्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमध्ये सासूची भूमिका साकारत आहे. एखाद्या खलनायिकेची छटा असणारी ही व्यक्तिरेखा असूनही हर्षदाचे काम प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. हर्षदा या मालिकेत वेगवेगळ्या स्टाईल्सच्या साड्या नेसते  आणि तिची प्रत्येक साडी ही आपल्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवी असं प्रत्येक महिलेला नक्कीच मालिका बघताना एकदा तरी वाटून गेले असेल. हर्षदा खानविलकरने नेसलेली साडी म्हणजे अप्रतिमच असणार असं एक समीकरण झालं आहे. प्रतिपदा क्लोथिंगच्या अथर्व चव्हाणने हर्षदासाठी काही खास साड्या डिझाईन केल्या होत्या. त्यामध्ये हर्षदाचं सौंंदर्य खुलून दिसत असून त्या साड्यांनाही हर्षदाच्या वक्तिमत्वामुळे साज चढला आहे. लाईट ग्रीन रंगाच्या या रॉ सिल्क पैठणीमध्ये हर्षदा खूपच सुंदर दिसत असून याच्या ब्लाऊजवरील डिझाईनही लक्ष वेधून  घेत आहे.  

बनारस सिल्कमधील सहज वावर

बनारस सिल्क साड्या या अतिशय हलक्या असतात आणि दिसायला तितक्याच रॉयलदेखील. हर्षदाने हा लुक अत्यंत सुंदररित्या कॅरी केला आहे. हिरव्या रंगाच्या बनारसी सिल्क साडीमध्ये अगदी सहज वावर दिसून येत आहे. हा रंगही डोळ्यांना अगदी ताजेपणा मिळवून देत आहे. आपल्याही वॉर्डरोबमध्ये अशीच एखादी बनारसी सिल्क असावी अशी इच्छा बळावली तर नवल वाटायला नको. 

पैठणीतील शान

पैठणी ही तर महाराष्ट्राची शान आहे. पैठणीमध्ये काही ठराविक रंग असतात असा समज आहे.  पण खरं तर काही रंग हे पैठणीमध्ये खूपच उठावदार दिसतात. हर्षदाने नेसलेल्या या रॉ सिल्क पैठणीचा वाईन रंग डोळ्यांना एक वेगळा फ्रेशनेस देत असून साडी ही महिलांसाठी नेहमीच उत्कृष्ट फॅशन राहिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असा लुक करण्यासाठी तुम्ही MyGlamm ची लिपस्टिक नक्की वापरू शकता. 

Beauty

MyGlamm LIT Liquid Matte Lipstick

INR 395 AT MyGlamm

कोणत्याही रंगात ढळणारी हर्षदा

‘रंग माझा वेगळा’ असं मालिकेचं नाव असलं तरीही खऱ्या आयुष्यात कोणत्याही रंगात ढळणारी हर्षदाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा बनवली आहे. राणी रंगाच्या या साडीमध्ये हर्षदा अप्रतिम दिसत असून ही स्टाईल केली आहे शाल्मली टोळ्येने केली आहे. साधी पण तरीही आकर्षक अशी ही हर्षदाची अदा नक्कीच तिच्या चाहत्यांच्या मनात घर करते. हर्षदाची ही स्टाईल फॉलो करणारेही अनेक चाहते आहेत.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक