सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सगळा देश दणाणून गेला आहे. या हत्येनंतर गँगवारच्या टार्गेटवर असलेल्या अनेकांना टेन्शन आले आहे. त्यातच सलमान खानला मिळालेली जीवे मारण्याची धमकी यामुळे मुंबईतही असा प्रकार होऊ शकतो हे ऐकून सर्वसामान्यही धास्तावले आहेत. सलीम खान यांना मॉर्निंग वॉकच्यावेळी मिळालेली एक संदिग्ध चिठ्ठी आणि त्यानंतर सुरु झालेला तपास यामध्ये अनेक गोष्टी पुढे येऊ लागल्या आहेत. आता सलमानला मिळालेल्या चिठ्ठीचे कनेक्शन हे पुण्यात जोडण्यात येत आहे. याचे कारण सिद्धू मुसेवाला हत्याकांडात असलेला पुण्याचा सौरभ महाकाल. ज्या गँगने सिद्धूचा घात केला तीच सलमानसाठी टपून बसली आहे. असे कळत आहे. दरम्यान हे नक्की प्रकरण काय चला जाणून घेऊया अधिक
सौरभ महाकाल आणि बिष्णोई गँगचा संबंध
सिद्धू मुसेवाला प्रकरणात काही शूटर्सना पकडण्यात आले आहे. या पैकी एक आहे तो म्हणजे पुण्याचा सौरभ महाकाल. गोल्डी ब्ररार आणि बिष्णोई गँगने सिद्धूची हत्या घडवून आणली. यामध्ये शूटर असलेल्या सौरभला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरु आहे. सलमानला याच गँगकडून 2018 साली धमकी आली होती. त्यामुळे आता हीच टोळी पु्न्हा एकदा घात करणार आहे का? किंवा या संदर्भात त्याच्याकडे काय अधिक माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी सौरभ महाकालला ताब्यत घेण्यात आले आहे. दरम्यान सिद्धू मुसेवालाच्या हत्येदरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरुनच महाकालला अटक करण्यात आली आहे.
मिळाली चिठ्ठी
वांद्रे येथे नेहमीप्रमाणे वॉक करायला गेलेल्या सलीम खान यांना त्यांच्या रोजच्या बाकावर बसल्यानंतर एक चिठ्ठी सापडली. त्यावर सिद्धू मुसेवाल्यासारखी सलमानची गत होईल असे लिहिले होते. इतकेच नाही तर त्यावर लॉरेन्स विश्षोई आणि गोल्डी ब्ररार यांची इनिशिअल्स देखील होती. त्यामुळे ही मस्करी की खरीच धमकी यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे.
काळविट प्रकरण अंगाशी
हम साथ साथ है या चित्रपटादरम्यान सलमानने काळवीटची केलेली शिकार त्याच्या खूपच जास्त अंगाशी आली होती. कारण या नंतर त्याला वेगवेगळ्या स्तरातून धमक्या आल्या होत्या त्यामध्ये लॉरेन्स बिष्णोईचा देखील समावेश होता. तुरुंगात असतानाही त्याने सलमान खानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी सलमान खान रेडी चित्रपटाचे शूट करत होता. त्याला मारण्याचे प्लॅनिंग तिहार जेलमधून झाले होते. त्यासाठी सगळी तयारीही झाली होती. पण सलमानला ज्या शस्त्राने मारायचे होते. ते शस्त्रच न मिळाल्यामुळे ते प्लॅनिंग तिथेच कोलमडले. या संदर्भात त्याचा सहकारी राहुल याला अटक करण्यात आली. त्यामुळेच या हत्येचं प्लॅनिंग समजू शकलं. सलमानला मारण्यासाठी त्याची माणसं मुंबईला देखील आली होती. पण ती पुन्हा परतली.
आता पोलीसांच्या चौकशीत काय समोर येणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.