आजकाल निरोगी राहण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि शांत मनस्थितीची गरज आहे. नियमित व्यायाम करणं शक्य नसेल तरी नियमित तीस मिनीटे चालण्याचा सराव तरी प्रत्येकाने केला पाहिजे. कोरोनाच्या काळात आरोग्याचे महत्त्व पटल्यामुळे अनेकांनी मॉर्निंग वॉकची सवय स्वतःला लावून घेतली आहे. मॉर्निंक वॉक केल्यामुळे दिवस फ्रेश आणि उत्साही होतो. मात्र वॉक करताना मोबाईल मात्र मुळीच जवळ बाळगू नये. यामुळे तुमचे वॉकमधील लक्ष तर जातेच शिवाय तुमच्या शरीरावरही दुष्परिणाम होतात.
जाणून घ्या वॉक करताना का बाळगू नये मोबाईल
मोबाईल ही सध्या माणसाची प्राथमिक गरज झाली आहे. त्यामुळे झोपताना, उठल्यावर, काम करताना, जेवताना सतत मोबाईल जवळ बाळगण्याची सवय प्रत्येकाला जडली आहे. मोबाईलच्या एका क्लिकवरून तुम्ही जगातील सगळी खबर ठेवत असला तरी काही काळ मोबाईल पासून दूर राहणं शरीर आणि मन दोघांसाठी खूप गरजेचं आहे. कारण मोबाईल ही फक्त गरजेची गोष्ट नसून तुमचं व्यसन झाली आहे. त्यामुळे गरज नसतानाही मोबाईल पाहण्याचे वेड सर्वांना लागलेले आहे. यासाठीच जाणून घ्या मॉर्निंग वॉक करताना मोबाईल जवळ बाळगल्यामुळे तुमच्या मन आणि शरीरावर काय दुष्परिणाम होतात.
काय होतात दुष्परिणाम
चालताना जर तुम्ही हातात मोबाईल ठेवणार असाल तर तुम्हाला कालांतराने या शारीरिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
- वॉक करताना हातात मोबाईल असेल तर तुमचे लक्ष मोबाईलमध्ये जाते आणि तुमचे चालणे, चालताना होणारे फायदे याकडे लक्ष जात नाही. थोडक्यात तुमचे चालण्यातील लक्ष मोबाईलमुळे विचलित होते.
- सतत हातात मोबाईल हातात पकडल्यामुळे तुमच्या शरीरातील मांसपेशींवर चुकीचा ताण येतो. कारण चालताना तुमचे हात स्थिर नसततात. चालताना हाताला व्यायाम मिळणे खूप गरजेचे असते. मात्र हातात मोबाईल असल्यामुळे तुमच्या स्नायूंवर चुकीचा ताण येतो. ज्यामुळे हात दुखण्याची शक्यता वाढते.
- तुमच्या शरीराची हालचाल चुकीची झाल्यामुळे तुमच्या शरीराचे पोश्चर चुकते आणि त्याचा ताण शरीरावर येतो. सतत हातात मोबाईल घेऊन वॉक केल्यामुळे तुमची पाठ, कंबर दुखू शकते. ज्यामुळे पाठीत बाक येणं अथवा शरीराचा आकार बदलणं असा त्रास तुम्हाला कालांतराने जाणवू शकतो. लक्षात ठेवा वॉकमुळे मन शांत आणि शरीर सुदृढ होते. त्यामुळे काही मिनीटे चालताना मोबाईल जरा दूरच ठेवला तर ते तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच हिताचे ठरेल. कारण मोबाईलमुळे तुमचे संपूर्ण लक्ष मोबाईलकडे खेचले जाते.
- सकाळी मन एकाग्र झालं की शांत आणि निवांत मनाचा परिणाम दिवसभर तुमच्या शरीरावर दिसतो. अशा मन:स्थितीत काम करण्याचा उत्साहदेखील वाढतो. पण मोबाईलमुळे तुम्हाला व्यायामाचा चांगला फायदा मिळत नाही. तुमचे लक्ष सतत मोबाईलमध्ये असल्यामुळे मन शांत राहत नाही.
- चालण्यासाठी तुम्ही बागेत अथवा जॉगिंग पार्कमध्ये जात असाल. तर आजूबाजूचे वातावरण, सकाळची प्रसन्नता, सूर्योदय, पक्षांचे आवाज,सकारात्मक लोकांचा सहवास या गोष्टींना तुम्ही मोबाईलमुळे मुकू शकता.
वजन कमी करण्यासाठी नेमकं किती पावले चालणं आहे गरजेचं
जाणून घ्या हाडांवर कसा होतो गॅझेट्सचा दुष्परिणाम, तज्ज्ञांचे मत
सकाळी चालण्याचे अप्रतिम फायदे (Morning Walk Benefits In Marathi)