ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं रोमॅंटिक फोटोशूट, चाहत्यांना आवडला अंदाज

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं रोमॅंटिक फोटोशूट, चाहत्यांना आवडला अंदाज

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच शेरशाहमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरदार सुरू आहे. काही दिवसांपू्र्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तो पाहून चाहत्यांना चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता वाटत आहे. पण एवढंच नाही या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि कियारामध्ये सूत जुळल्याचीदेखील चर्चा आहे. ज्यामुळे या नव्या फ्रेश जोडीची ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांना पाहयला मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या दोघांनी एक रोमॅंटिक फोटोशूट केलं. सध्या हे फोटोशूट व्हायरल झाल्याने चाहत्यांच्या लाईक्स आणि कंमेटचा पाऊस त्यांच्या पोस्टवर पाहायला मिळत आहे.

कियारा आणि सिद्धार्थची लव्ह केमिस्ट्री

बॉलीवूडमध्ये कियाराची ग्लॅमरस गर्ल म्हणून ओळख निर्माण झाली आहे. कबिर सिंहमध्ये प्रीती साकारत कियाराने तिच्या अभिनयाची झलकही चाहत्यांना दाखवून दिली. तर स्टुडंट ऑफ दी इअर मधून पदार्पण केलेल्या सिद्धार्थ मल्होत्रानेही आता  बॉलीवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला आहे. विशेष म्हणजे ही फ्रेश जोडी शेरशाहमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटादरम्यान ते दोघं एकमेकांना डेडही करू लागले आहे. दोघांनीही जाहीरपणे याची कबुली दिली नसली तरी ते दोघं बऱ्याचदा एकमेकांसोबत स्पॉट होतात. काही दिवसांपूर्वीच कियाराचा वाढदिवसही सिद्धार्थने एकत्र साजरा केला. सध्या दोघंही शेरशाहच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. मात्र या प्रमोशनसाठी केलेलं फोटोशूट सध्या खूपच चर्चेत आहे. कारण या फोटोशूट दरम्यान दोघांची रिअल लाईफ लव्ह केमिस्ट्रीदेखील दिसून आली आहे. सिद्धार्थ आणि कियाराचा हा रोमॅंटिक अंदाज चाहत्यांना नक्कीच आवडला आहे. ज्यामुळे त्यांच्या फोटोवर सेलिब्रेटी आणि चाहत्यांच्या अनेक कंमेटस दिसू लागल्या आहेत. 

सिद्धार्थ आणि कियाराचा रोमॅंटिक अंदाज

शेरशाहसाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये सिद्धार्थ आणि कियारा खूपच क्यूट वाटत आहेत. कियाराने या फोटोसाठी काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर सिद्धार्थ काळा, ब्लू सूटमध्ये दिसत आहे. शेरशाह 12 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यामध्ये सिद्धार्थने विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे.  शेरशाह चित्रपटात कारगील युद्धातील अनेक प्रसंग दाखवण्यात आले आहेत. कियाराने विक्रम बत्रा यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. कियारा आणि सिद्धार्थचा एकत्र असा हा पहिलाच चित्रपट आहे. ज्यामुळे खऱ्या खुऱ्या जीवनात एकमेकांच्या प्रेमात आखंड बुडालेल्या या फ्रेश जोडीला पडद्यावर रोमान्स करताना पाहण्यासाठी

कोण होणार करोडपती’च्या मंचावर येणार करोडोंचे आवडते हास्यवीर

ADVERTISEMENT

आणखी एक मराठी अभिनेत्री खूप वर्षांनी दिसणार छोट्या पडद्यावर

बेल बॉटममधला लाराचा लुक व्हायरल, इंदिरा गांधींच्या भूमिकेत ओळखणं कठीण

09 Aug 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT