ADVERTISEMENT
home / केस
Signs to wash hair

केस कधी धुवावे हे ओळखण्यासाठी फॉलो करा या टिप्स

अनेकांना दररोज केस धुण्याची सवय असते तर काही जण आठवड्यातून एकदाच केस धुतात. केसांची निगा राखण्यासाठी ते योग्य वेळी धुणे गरजेचं आहे. मात्र जर तुम्ही दररोज केस धुतले तर अति प्रमाणात केसांवर शॅम्पूचा वापर झाल्यामुळे तुमचे केस कोरडे पडतात. यासाठी आठवड्यातून नेमके किती वेळा केस धुवावे हे प्रत्येकाला माहीत असायला हवे. प्रत्येकाच्या केसांचा प्रकार वेगवेगळा असतो. त्यामुळे नेमके कधी केस धुवावे हे सर्वांसाठी सारखे असू शकत नाही. यासाठी तुमचे केस धुण्याची वेळ झाली आहे हे तुम्हाला स्वतःच ओळखावे लागेल. यासाठी आम्ही केस धुण्यासाठी योग्य वेळ दर्शवणारे काही संकेत (Signs to Wash Hair) तुमच्यासोबत शेअर करत आहोत. यासोबतच वाचा 10 कारणे केस कधी कापावेत | When To Do Haircut In Marathi

केस धुण्याचे संकेत असे ओळखा (Signs to Wash Hair)

  • त असतील पण तुम्हाला ते वारंवार शॅम्पू करायचे नसतील तर तुम्ही ड्राय शॅम्पूचा वापर करू शकता.
  • केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तुम्हाला केस धुणं गरजेचं आहे
  • केसांमधील ड्राय स्काल्प वर येण्यामुळे केसांमध्ये खाज येत असेल तर याचा अर्थ तुम्ही आता केस धुवायला हवे.
  • केसांचा गुंता वाढला असेल तर याचा अर्थ तुमच्या केसांमधील मऊपणा कमी झाला आहे अशावेळी केस धुणं गरजेचं असतं.
  • केस शॅम्पू आणि कंडिशनर केल्यावर केसांमधून सुंगध येत राहतो, हा सुंगध कमी झाला आणि केसांना घाणेरडा वास येऊ लागला की समजा तुमचे केस धुणं आता गरजेचं आहे.
  • केसांचे टेक्स्चर खराब झाले असेल तर तुम्ही केस बरेच दिवस धुतले नाहीत हे ओळखा.

केस धुण्यासाठी काही टिप्स (Hair Wash Tips) 

Signs to wash hair

केस कधी धुवावे यासोबत ते कसे धुवावे हे तुम्हाला माहीत असायला हवं.

केस बरेच दिवस धुतले नाहीत तर केस चिकट होतात, केसांची चमक कमी होते. यासाठी या पद्धतीने केस धुवा आणि वाढवा केसांचे आरोग्य

  • सर्वात आधी केसांना योग्य पद्धतीने ओलं करा, कारण केस ओले न करता केसांना शॅम्पू केल्यामुळे केसांचे जास्त नुकसान होते. शिवाय ओल्या केसांवर शॅम्पू योग्य पद्धतीने पसरतो आणि केस लवकर स्वच्छ होतात.
  • त्यानंतर शॅम्पू स्काल्पवर व्यवस्थित लावा. कारण स्काल्प चिकट झाल्यामुळे केस जास्त खराब दिसतात.
  • जास्तवेळ केसांमध्ये शॅम्पू न ठेवता तो मुळांपासून स्वच्छ होण्यासाठी केस व्यवस्थित धुवा. केस रगडून अथवा जास्त चोळून धुवू नका. त्यापेक्षा हळूवार हाताने केसांमधील शॅम्पू पाण्यासोबत वरून खालच्या दिशेला जाईल असा स्वच्छ करा. 
  • केसांमधील पाणी निथळून काढून टाका आणि ओलसर केसांवर मध्यभागाकडून टोकाकडच्या दिशेला शॅम्पू लावा. स्काल्पवर चुकूनही कंडिशनर लावू नका.
  • कंडिशनर दोन ते तीन मिनीट केसांमध्ये ठेवा आणि लगेच पाण्याने धुवून टाका. 
  • केस धुण्यासाठी शक्य असल्यास साधं अथवा कोमट पाणी वापरा. अति गरम पाण्याने केस धुवू नका. 
  • केस स्वच्छ करण्यासाठी मऊ टॉवेल अथवा जुनं टी शर्ट वापरा, केस टर्कीशच्या टॉवेलने रगडून पुसू नका.
  • केस ड्रायरने कोरडे न करू नका कारण असं केल्यामुळे ते अति कोरडे पडतील आणि कंडिशनरचा परिणाम कमी होईल.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
12 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT