ADVERTISEMENT
home / Age Care
केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी ‘अंडे का फंडा’

केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी ‘अंडे का फंडा’

निरोगी जीवन आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी नेहमी अंडे खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण अंड्यामध्ये असे अनेक गुणधर्म असतात ज्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होत असतो. अंड्यामध्ये  प्रोटीन, व्हिटॅमिन आणि ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे अंड्याला सूपरफुडचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे दररोज सकाळी न्याहारीमध्ये उकडलेल्या अंड्याचा समावेश जरूर करा. एवढंच नाही तर अंड्याचा तुमच्या केस आणि त्वचेवरदेखील चांगला फायदा होतो. यासाठी रोज खाण्यासोबत अंडे तुमचे सौंदर्य वाढविण्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

skin and hair Benefits of Eggs %281%29

अंड्याचे केसांच्या आरोग्यावर होणारे फायदे – Benefits Of Eggs For Hair

प्रोटीन्सचा स्त्रोत असलेले अंडे केसांसाठी फारच उपयुक्त आहे. एकतर अंडे तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होते. केसांना अंडे लावल्यामुळे केस लांब,  घनदाट आणि मजबूत होतात. केसांमध्ये एकप्रकारची नैसर्गिक चमक येते. शिवाय केस गळत असतील तर अंडे लावल्यामुळे केसांचे गळणे कमी होते. यासाठी जाणून घ्या अंड्याचे केसांवर काय फायदे होतात

केस चमकदार होतात-

केस कितीही मोठे आणि घनदाट असतील मात्र ते चमकदार नसल्यामुळे निस्तेज दिसत असतील तर तुमचे सौंदर्य फिके पडते. केस चमकदार असणे हे निरोगी केसांचे लक्षण आहे. त्यामुळे जर तुमचे केस निस्तेज दिसू लागले असतील तर नियमित केसांना अंडे लावण्यास सुरूवात करा. अंड्यामधील प्रोटीन्समुळे तुमच्या केसांना नैसर्गिक तेज मिळते.

ADVERTISEMENT

केस मजबूत होतात-

अनेकदा तुमचे केस मध्येच तुटू लागतात किंवा कोरडे झाल्यामुळे त्यांना फाटे फुटतात. केसांना फाटे फुटले की केसांची वाढ रोखली जाते. केसांना पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे ते निस्तेज दिसू लागतात. मात्र अंड्यातील ल्यूटीनमुळे केस गळणे थांबते आणि केस घनदाट दिसू लागतात.

केस लांब होतात-

केसांची वाढ ही तुमच्या आहारावर अवलंबून असते. कारण  तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयीचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होत असतो. जर तुम्ही पोषक आणि संतुलित आहार घेत असाल तर तुमच्या केसांची वाढ चांगली होते. मात्र जर तुमचा आहारच चुकीचा असेल तर तुम्हाला आहारात पुरेसे पोषकतत्व घेण्याची गरज आहे.

केसांची वाढ चांगली होते-

केस गळण्याची समस्या प्रत्येकाला आयुष्यात सहन करावी लागते. डॉक्टरांच्या मते दिवसभरात 100 केस गळणे ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यापेक्षा अधिक प्रमाणात केसगळत असतील तर मात्र तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण दिवसभरात शंभरपेक्षा अधिक केस गळणे हे केस गळण्याच्या समस्येचा संकेत आहे. केस गळणे रोखण्यासाठी तुम्ही घरीच अंड्याचा वापर करू शकता. कारण अंड्यामधील व्हिटॅमिन्समुळे तुमच्या केसांच्या त्वचेचे चांगले पोषण होते.

केस गळणे थांबविण्यासाठी एग हेअरमास्क

अंडे आणि ऑलिव्ह ऑईल-

दोन अंड्याचा पांढरा भाग आणि चार चमचे ऑलिव्ह ऑईल मिक्स करून एक चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावून एक तासाने केसांना शॅंपू करा. आठवड्यातून दोनदा हा प्रयोग केल्यामुळे तुमचे केस गळणे आपोआप थांबेल.

ADVERTISEMENT

अंडे, दूध आणि मध-

मध आणि दुधात मॉश्चराईझिंग गुणधर्म असतात तर अंड्यामध्ये प्रोटीन्स त्यामुळे या हेअरमास्कचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी दोन अंड्याचा पांढरा भाग, एक चमचा मध आणि दोन चमचे दूध एकत्र करा. तुम्ही गरजेनुसार दूधाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. हे मिश्रण केसांना लावा आणि चाळीस मिनीटांनी केसांना शॅंपू करा.

अंडे आणि कोरफड-

हेअरमास्कचा हा एक उत्तम प्रकार आहे. कारण या मास्कमुळे यामुळे तुमच्या केसांचे चांगल्या प्रकारे पोषण होते. कोरफडामध्ये अॅंटी इनफ्लैंमटरी, अॅंटीसेप्टिक आणि मॉश्चराईझिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या केसांना आरोग्य मिळते. यासाठी दोन अंड्याचा पांढरा भाग आणि कोरफडाचा रस चांगल्या प्रकारे मिक्स करा. हा हेअरमास्क केसांवर कमीतकमी एक तास तसाच राहू द्या. त्यानंतर केस थंड पाण्याने धुवून टाका.

तुमचेही केस गळतायत? ‘या’ गोष्टी खाल तर थांबेल तुमची केसगळती

अंडे, मेथी आणि मेंदीचा हेअरमास्क-

या हेअरमास्क मुळे केसांमधील अतिरिक्त तेल नियंत्रित होते. केसांच्या त्वचेला थंडावा मिळतो. शिवाय यामुळे तुमच्या केसांचे गळणेदेखील थांबते.रात्रभर पाण्यात मेथीचे दाणे भिजत ठेवा हे दाणे मिक्सरमध्ये  वाटून घ्या. मेंदी पावडर, मेथीची पेस्ट आणि अंड्याचा पांढरा भाग व्यवस्थित एकत्र करा. ही पेस्ट केसांना लावा आणि एक तासाने केस स्वच्छ करा.

ADVERTISEMENT

skin and hair Benefits of Eggs 3

त्वचेवर होणारे अंड्याचे फायदे Egg Benefits For Skin

अंड्याचा त्वचेवर चांगला परिणाम होतो. तेलकट त्वचेपासून कोरड्या त्वचेपर्यंत सर्व प्रकारच्या त्वचेवर अंड्याचा सुपरिणाम दिसून येतो. अंड्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात फॅटी अॅसिड  असतात. त्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. अंड्यातील पांढऱ्या भागामुळे तुमच्या त्वचेतील सैलपणा कमी होतो. ज्यामुळे एंटी एजिंगसाठी अंडे तुम्ही वापरू शकता.

मॉश्चराईझिंग

स्ट्रेच मार्क्स आणि एंटी एजिंग ट्रिटमेंटसाठी घ्या ‘हॉट कॅंडल वॅक्स मसाज थेरपी’

जर तुमची त्वचा फारच कोरडी असेल तर एक अंडे चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि  मुलायम दिसू लागेल. शिवाय अंड्यामधील प्रोटीन्समुळे तुमच्या त्वचेचे चांगले पोषणदेखील होईल.

ADVERTISEMENT

स्कीन टाइटनिंग

अंडे एक उत्तम टोनरदेखील आहे. जर तुम्ही आठवड्यातून तीनदा चेहऱ्यावर अंडे लावले तर तुमची सैल पडलेली त्वचा पुन्हा पूर्ववत दिसू लागेल.

पफी आइज

कामाचा ताण आणि अपुरी झोप यामुळे तुमचे डोळे सुजल्यासारखे दिसू लागतात. अंड्याचा पांढरा  भाग डोळ्याखाली लावल्यामुळे तुमच्या पफी आइजची समस्या कमी होईल.

व्हाइटहेड्स

अनेकजणींना व्हाइटहेड्सची समस्या असते. नाक आणि हनुवटीवर व्हाइटहेड्स येतात. मात्र अंडे लावल्यामुळे तुमच्या व्हाइटहेड्सची  समस्या कमी होते.

अंड्यापासून असा तयार करा फेसमास्क How To Make Egg Face Mask

अंडे चेहऱ्यासाठी अगदी वरदान ठरू शकते. त्यामुळे त्वचेवर अंडे लावल्यामुळे अनेक चांगले फायदे होऊ शकतात.

ADVERTISEMENT

त्वचेचा रंग उजळतो

यासाठी एका अंड्याचा पांढरा भाग आणि एक चमचा मध एकत्र मिसळा. चेहऱ्यावर हा मास्क लावा आणि वीस मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक इंन्स्टंट ग्लो दिसू लागेल.

त्वचा मऊ आणि मुलायम होते

skin and hair Benefits of Eggs 2

यासाठी एक पिकलेले अॅवाकॅडो, एक अंडे, एक चमचा दही, एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा नारळाचे तेल एकत्र करा. हा फेसमास्क चेहऱ्यावर कमीतकमी पाच ते दहा मिनीटे असू द्या. सुकल्यावर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. या फेसमास्कमुळे तुमच्या त्वचेचे योग्य पोषण झाल्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम दिसू लागेल.

डार्क सर्कल्स कमी होतात

अनेकदा दगदग आणि ताणामुळे तुमच्या डोळ्यांच्या त्वचेखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी एका अंड्याचा पांढरा भाग, किसलेले गाजर आणि एक चमचा कोरफडाचा रस घ्या. हे मिश्रण चांगले एकत्र करून डोळ्यांच्या खालील भागावर लावा. दहा ते पंधरा  मिनीटांनी सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या फेसमास्क मुळे तुमचे डार्क सर्कल्स कमी होतील.

ADVERTISEMENT

Face Sheet Mask : चेहऱ्यावर इंन्स्टंट ग्लो येण्यासाठी वापरा ‘हे’ फेस शीट मास्क

चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात

जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर अंडे तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरू शकते. यासाठी एक अंडे घ्या त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. अंडे आणि लिंबूरस चांगल्या प्रकारे एकत्र करा. हा फेसमास्क चेहऱ्यावर लावा आणि फेसमास्क सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. या मास्कमुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डाग कमी होतील.

त्वचा मऊ आणि मुलायम होते

एक अंडे, दूध आणि किसलेले दुधी एकत्र करून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून पंधरा मिनीटांनी फेसपॅक सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवून टाका. या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा मऊ  आणि मुलायम होते.

एंटी- एजिंग

जर तुमच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागल्या असतील तर अंडे तुम्हाला पूर्ववत करू शकते. यासाठी दोन चमचे शिजलेला भात, एक अंडे, एक चमचा लिंबू आणि एक चमचा बदाम पावडर एकत्र करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर चेहरा धुवून टाका. तुमचा चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि इतर एजिंगच्या खुणा कमी  होतील.

ADVERTISEMENT

तेलकट त्वचेसाठी

अंडे आणि ओटमील पावडर एकत्र केल्यास एक छान फेसस्क्रब तयार होऊ शकतो. तेलकट त्वचेसाठी हा फेसस्क्रब फारच उपयुक्त ठरू शकतो.

Hair Spa: घरीच पार्लरप्रमाणे ‘हेअर स्पा’ कसा कराल (Hair Spa At Home In Marathi)

FAQ’s

दररोज चेहऱ्यावर अंड्याचा पांढरा भाग लावता येऊ शकतो का  ?

नक्कीच, तुम्ही चेहऱ्यावर दररोज अंड्याचा पांढरा भाग लावू शकता. अगदी सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसातून दोनवेळा देखील तुम्ही अंड्याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. शिवाय असे केल्यामुळे तुमची स्कीन नक्कीच मऊ आणि मुलायम दिसू लागते.

अंडे चेहऱ्यावर अथवा त्वचेवर कसे लावावे?

अंड्यावर एक छोटेसे छिद्र पाडून तुम्ही त्यातून अंड्याचा पांढरा भाग बाहेर काढू शकता. या पांढऱ्या भागाला चांगले फेटून घ्या. ज्यामुळे ते चांगले फ्लफी होईल. चेहऱ्यावर हे मिश्रण इतर घटकांसोबत लावा. स्कीन ताणली जाऊ लागली की चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा.

ADVERTISEMENT

केसांना अंड्याचा हेअरमास्क लावल्यावर शॅंपू करणे योग्य आहे का?

अंड्याचा हेअरमास्क लावल्यावर अर्ध्या  अथवा एक तासाने तुम्ही केस शॅंपू करू शकता. मात्र केस शॅंपी केल्यावर केस फक्त थंड पाण्यानेच धुवा. अंडे लावल्यावर केसांना अंड्याचा वास येऊ लागतो त्यामुळे त्यानंतर केस शॅंपू करणे फारच गरजेचे आहे.

अंडे लावल्यामुळे केस खरंच वाढतात का?

अंडयामधील पोषक तत्त्वांमुळे तुमच्या केसांचे योग्य पोषण होते. ज्यामुळे केस लांब आणि मजबूत होतात. ब्युटी एक्सपर्टच्या मते आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना अंडे लावल्यामुळे केसांची वाढ चांगली होते.

अंड्यामधील पांढरा भाग की पिवळा बलक चांगला असतो?

अंड्यामधील पांढरा भाग आणि पिवळा बलक दोन्हीही उपयुक्त असतात. ज्यांचे केस तेलकट असतील त्यांनी अंड्याचा पांढरा भाग केसांना लावावा आणि ज्यांचे केस कोरडे असतात ज्यांनी अंड्यातील पिवळा बलक केसांना लावावा.

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

ADVERTISEMENT

Egg Face Mask For Soft Skin in Hindi

#DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय

पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय

लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

10 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT