केस काळे करण्याचे घरगुती उपाय - Home Remedies For Black Hair In Marathi | POPxo

पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय (Home Remedies For Black Hair In Marathi)

पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय (Home Remedies For Black Hair In Marathi)

‘हे केस असेच उन्हात नाही पांढरे झाले’, असं नेहमीच थोरामोठ्यांकडून बोललेलं तुम्ही ऐकलं आहे. पूर्वीच्या काळी ही गोष्ट नक्कीच योग्य होती, कारण तेव्हा वाढतं वय आणि अनुभवानुसारच केस पांढरे होत होते. मात्र आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात केवळ वयामुळं नाही तर तणाव आणि प्रदूषणामुळे लोकांचे केस लवकर काळे व्हायला लागले आहेत. सध्या उन्हातच केस पांढरे होत आहेत असं म्हटलं तर नक्कीच अति नाही होणार. मात्र असं असतानाही काळे आणि घट्ट केसच सर्वांना आवडत असतात. डोक्यावर एकही पांढरा केस दिसला तरीही पूर्ण दिवस चिंता करण्यात जातो की, केस पांढरे व्हायला लागले आहेत. त्यामुळे आपण अगदी मेंदीपासून डाय आणि हेअरकलर हा सगळ्याच गोष्टी हाताळून पाहतो. पण केस काळे व्हायला लागल्यावर तुम्हाला चिंता करायची खरंच गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला केस काळे करण्याचे असे काही उपाय सांगणार आहोत, जे तुम्ही आतापर्यंत करून पाहिले नसतील. तसंच याबरोबरच डाय केल्यामुळे काय नुकसान होतं आणि केसांना काळं राखून ठेवण्यासाठी कोणतं खाणं आवश्यक आहे याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


केसांना काळं करणाऱ्या डायमुळेही होतं नुकसान


कमी वयात केस पांढरे होण्याची कारणं


केसांना काळं करण्याचे २० घरगुती उपाय


केसांना काळं ठेवणं का आवश्यक आहे (How To Keep Black Hair In Marathi)


तुम्ही बॉलीवूडच्या अथवा टीव्हीच्या बऱ्याच सिनिअर्स अभिनेत्यांना पाहिलं आहे. पण त्यांच्याबद्दल वाचल्याशिवाय तुम्ही त्यांच्या वयाचा अंदाज बांधू शकता का? थोडा त्रास नक्कीच होतो. हीच आहे काळ्या केसांची जादू. वास्तविक रेखापासून ते हेमामालिनी, माधुरी दीक्षित, अनिल कपूर आणि सलमान खान सर्वच मोठे कलाकार नेहमी आपले केस काळे करूनच सर्वांसमोर येतात. त्यामुळे त्यांचं वय नक्की किती आहे हे ओळखणं कठीण जातं. केवळ सेलिब्रिटीज नाही तर सामान्य माणूसही स्वतःचं वय लपवण्यासाठी केस काळे करतात. काळे केस हे तुमच्या वयापेक्षा तुम्हाला कमी वयाचं दाखवण्यास मदत करतात. आणि का नसावं? शेवटी तरूण दिसणं प्रत्येकालाच आवडतं आणि त्यासाठी केस काळे असणं गरजेचं आहे.


Rekha %281%29
कमी वयात केस पांढरे होण्याची कारणं (What Causes White Hair)


वाढत्या वयासह केसांचं पांढरं होणं ही साधारण गोष्ट आहे मात्र, जेव्हा केसांचं वय हे तुमच्या वयापेक्षा जास्त दिसू लागतं तेव्हा तो चिंतेचा विषय होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या केसांचा काळा रंग हा मेलानिन (Melanin) नामक पिगमेंटमुळे असतो. हे पिगमेंट केसांच्या मुळाशी असतात. जेव्हा मेलानिन बनणं बंद होतं तेव्हा केस पांढरे होऊ लागतात. वेळेआधीच केस पांढरे होण्याची खूप कारणं आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची कारणं आम्ही तुम्हाला सांगत आहोत...


1. वेळेपूर्वी केस पांढरे होण्याचं एक कारण अनुवंशिकता हे आहे. तुमच्या आई अथवा वडिलांचे केस लवकर पांढरे झाले असल्या, तुमचेही केस लवकर पांढरे होतात.


2. शरीरामध्ये प्रोटीन, लोह, विटामिन बी१२ अशा पोषक तत्वांची कमतरता असल्यास, केस पांढरे होऊ लागतात.


3. प्रमाणापेक्षा जास्त तणाव घेतल्यास किंवा तणावपूर्ण वातावरणात काम केल्यास, केस लवकर पांढरे होतात.  


4. केसांमध्ये विविध केमिकलयुक्त क्रीम लावल्यास किंवा हेअर कलर केल्यामुळेही केस पांढरे होतात. त्याशिवाय स्ट्रेटनिंग आणि कर्लिंग मशीनचा जास्त उपयोग केल्यास, केसांना नुकसान पोचते आणि केस पांढरे होऊ लागतात.


5. डिप्रेशन, झोपेच्या गोळ्या वा गरजेपेक्षा जास्त अँटीबायोटिक औषधं घेतल्यामुळेही केस पांढरे होतात.


6. कमी वयात मधुमेह वा थायरॉई़डसारखे आजार झाल्यास, केस पांढरे होण्याचं कारण ठरतं.


7. नशीले पदार्थ, अल्कोहल, धूम्रपान इत्यादी जास्त घेतल्यामुळेही केस सफेद होतात. यापासून दूर राहणंच जास्त चांगलं.


8. वाढतं प्रदूषण आणि धूळ - मातीच्या सतत संपर्कात आल्यामुळेही केसांचा काळेपणा निघून जातो आणि केस पांढरे होतात.


White Hair  %281%29


केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय देखील वाचा


केसांना काळं करणाऱ्या डायमुळेही होतं नुकसान (Side Effects Of Hair Dye)


केसांना काळं करण्यासाठी बरेच लोक डायचा वापर करतात. डायमध्ये केमिकल्स असतात जे केसांचे नुकसान करतात. ज्याचा परिणाम केस कोरडे होणे किंवा गळणे किंवा डोक्यावर बऱ्याच ठिकाणी केस गायब होणे असाही होतो. विशेषतः गरोदर महिलांनी डॉक्टरांना विचारल्याशिवाय हेअरडायचा वापर करू नये कारण हेअर कलर हा गरोदर आईसह नवजात बाळालाही नुकसान पोहचवू शकतो. केसांना डाय करण्यापूर्वी तुम्हाला कोणती एॅलर्जी तर नाही ना याचीदेखील काळजी घेतली पाहिजे. हे जास्त लावल्यामुळे कोंडा, खाज अथवा डोळ्यांच्या चारही बाजूला लाल होणे वा सूज अशा समस्या येऊ शकतात. यासाठी तुम्ही हेअर तज्ज्ञाकडे अथवा ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सल्ला घेऊ शकता. एका संशोधनानुसार, गडद रंगांच्या कायमस्वरूपी हेअरडायमुळे ल्युकेमिया वा लिम्फोमा असे आजार होऊ शकतात.


Black hair Dye %281%29
केसांचा काळेपणा राखून ठेवण्यासाठी तेल (Essential Oils For White Hair)


तसं तर बाजारामध्ये बऱ्याच प्रकारचे तेल उपलब्ध असतात जे केस काळं करण्याचा दावा करत असतात. मात्र तुमच्या स्वयंपाकघरामध्ये अशा काही गोष्टी उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वतःसाठी तेल बनवू शकता. याची खास गोष्ट ही आहे की, घरी बनवल्यामुळं कोणत्याही तऱ्हेच्या केमिकलपासून हे मुक्त असेल. आम्ही तुम्हाला इथे घरच्या घरी तेल बनवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत...


1. एक मूठ कडिपत्त्यात ३ चमचे नारळाचे तेल घालून गरम करावे आणि मग हे तेल थंड होऊ द्यावे. तुमचं तेल तयार आहे. हे तेल आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांच्य मुळापासून लावून मालिश करावं.


2.  एक चमचा मोहरी तेलामध्ये दोन चमचे एरंडेलाचे तेल मिसळून घ्यावं. गरम करून पुन्हा थंड व्हायला ठेवावं. त्यानंतर साधारण १० मिनिट्स केसांच्या मुळापासून मालिश करावं. त्यानंतर १ तासाने केस शॅम्पूने धुऊन साफ करून घ्यावे. हेदेखील तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा लावू शकता.


3. मेंदीची पानं आणि नारळ तेलानेही तुमचे केस काळे करण्यासाठी तेल बनवू शकता. त्यासाठी सर्वात पहिले ३-४ चमचे नारळ तेल चांगले उकळवून घ्यावे. त्यामध्ये नंतर मेंदीची पानं टाकावीत. नारळाचं तेल साधारणं तपकिरी रंगाचं होईपर्यंत गरम करावं. तुमचं तेल तयार आहे.


केसांना काळं ठेवण्यासाठी गरजेचं आहे योग्य खाणं (Diet To Prevent White Hair)


तुमचं अनियमित आणि चुकीचं खाणं हेदेखील वेळेपूर्वी केस पांढरे होण्याचं मुख्य कारण आहे. तुम्ही जर स्वस्थ असाल तर तुमचे केसही काळे आणि घनघोर होतील. नियमित आहारात काही असे पदार्थ असतात जे केवळ तुमच्या केसांना नीट ठेवत नाहीत तर त्यांना सुंदर आणि घनघोर बनविण्यासाठी मदत करतात.  त्यामध्ये पालक, रताळं, अक्रोड, गाजर, अंडं, बदाम, केळं हे सर्व प्रमुख पदार्थ आहेत. वास्तविक हे सर्व खाद्यपदार्थ प्रोटीन आणि विटामिनने असे पौष्टिक गुणांचे पदार्थ आहेत. त्यामुळेच तुम्हाला जर तुमचे केस वेळेपूर्वी पांढरे व्हायला नको असतील तर हे खाद्यपदार्थ तुमच्या आहारात सामील करून घ्या.


केस काळे राहण्यासाठी कोणते योग करावे? (Yoga Poses To Get Rid Of White Hair)


तुम्हाला माहीत आहे का तुमचे केस वेळेपूर्वी पांढरे होत असल्यास अथवा कमी वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे करण्यासाठी योगदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असते. अनेक योगासन करून तुम्ही तुमचे केस काळे करून घेऊ शकता. त्यापैकी काही आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत -


शीर्षासन


केसांशी संबंधित कोणत्याही समस्या जसं केस गळणं वा केस पांढरे होणं यापासून सुटका मिळण्यासाठी शीर्षासन हा उत्तम पर्याय आहे. वास्तविक शीर्षासन करून डोक्यातील रक्तसंचार वाढतो, ज्यामुळे केस पांढरे होण्यासारखी समस्या संपुष्टात येते. मात्र लक्षात ठेवा शीर्षासन हे योग्य माणसाच्या सल्ल्यानेच करायला हवं, नाहीतर केस काळे होण्याऐवजी अजून पांढरे होतील.


कपालभाती


कपालभाती हा श्वासाचा व्याया आहे. या आसनाचा तुम्ही केस काळे राखण्यासाठी, सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि वाढते वय कमी दाखवण्यासाठी उपयोग करू शकता.


केसांना काळं करण्याचे २० घरगुती उपाय (Home Remedies For White Hair)


1. बटाट्याच्या सालांमध्ये स्टॉर्च असतं. त्याचा उपयोग करून पांढरे केस काळे करता येतात. पाण्यात बटाट्याच्या काही साली १० मिनिट्स ठेवून उकळवून घ्या आणि मग थंड करून केसांना लावा.


2. दुधाच्या रसात ऑलिव्हचे तेल अथवा तिळाचे तेल घालून अर्धा तास मालिश करावे. त्यानंतर केसांना शॅम्पू लावून धुऊन टाकावे.


3. केसांमध्ये बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त डायऐवजी नैसर्गिक हेअरडायचा वापर करावा. मेंदी, चहापानाचे पाणी याचा उपयोग करावा. यामधून केसांना पोषक तत्व मिळतात आणि याचा रंगही चांगला राहतो.


4. कांद्याच्या रसात लिंबू घालून केसांच्या मुळापासून लावल्यास, केस काळे होतात.  


5. आठवड्यातून एकदा केसांच्या मुळांना कच्चे दूध लावल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत.


6. आठवड्यातून दोन वेळा केसांना चहाच्या पाण्यानेही धुऊ शकता. हा उपाय नक्कीच केसांना काळं  करण्यासाठी उत्तम आहे.


7. देशी तूपाचा वापर केल्यास, केस चांगले होतात. देशी तूपाने केसांना मसाज करावा. आठवड्यातून दोन वेळा असं केल्यास, लवकरच पांढऱ्या केसांपासून सुटका मिळेल.


8. पांढऱ्या केसांच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी कॉफीदेखील खूपच फायदेशीर आहे. पाण्यात २-३ चमचे कॉफी घालून उकळवावी. थोडी जाड झाल्यावर उतरवावी. थंड करून केसात लावावी. ४५ मिनिटांनंतर केस धुऊन टाकावे.


9. आलं वाटून घ्यावं आणि त्यामध्ये जरासं कच्च दूध घालून केसात लावावं. त्यानंतर अर्धा तास झाल्यावर केसांना शॅम्पू लाऊन धुऊन टाकावे.


10. आवळ्यात मेंदी मिसळून केसांची कडिशनिंग करावी. हवं असल्यास, आवळ्यांना बारीक कापून त्यात गरम नारळाचे तेल मिक्स करून केसांना लावावे. त्यामुळेदेखील केस पांढरे होत नाहीत.


11. कच्ची पपई घ्यावी आणि त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट केसावर १० ते १५ मिनिट्स लावावी आणि मग केस धुवावे. असं तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता.


12. दोडक्याचे तुकडे सुकवून ते कुटून घ्यावे. त्यानंतर नारळाचं तेल त्यात मिक्स करून ४ दिवस ठेवावे. त्यानंतर ते उकळवून घ्यावे आणि बाटलीत भरावे. हे तेल केसांना लावून डोक्याचं मालिश करावं. यामुळे केस काळे होतात.


13. आठवड्यातून तीन-चार वेळा अर्धा कप दह्यात चुटकीभर काळीमिरी आणि एक चमचा लिंबू रस मिक्स करून केसांना लावावे. १५ मिनिटं झाल्यावर धुऊन टाकावे. केस पांढऱ्याचे काळे होतात.


14. एक कप चहाचे पाणी उकळवून त्यात एक चमचा मीठ घालावे. हे मिश्रण केस धुण्याआधी एक तास लावावे त्याने केस काळे होतात.


15. नारळ तेलामध्ये गोडलिंबाची पानं घालून पानं काळी होईपर्यंत उकळवावी. हे तेल हलक्या हाताने केसांच्या मुळाशी लावावे. केस काळे आणि घनघोर होतील.


16. केसांमध्ये लिंबाचं तेल आणि रोझमेरी तेल घातल्याने केस पांढरे होत नाहीत.


17. २ चमचे हिना पावडर, १ चमचा दही, १ चमचा मेथी, २ चमचे कॉफी, २ चमचे तुळस पावडर, ३ चमचे पुदीना याची पेस्ट मिक्स करून केसांना लावावी. तीन तासानंतर शॅम्पू करावा. कमी वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतील.


18. आवळा ज्युस, बदामाचं तेल आणि लिंबूचा रस एकत्र करून केसांच्या मुळाशी लावल्यास, केसांमध्ये चमक येते आणि केस पांढरे होत नाहीत.


19. केसांमध्ये रोज तिळाचं तेल लावल्यास, केस नेहमी काळे राहतील.


20. केसांमध्ये कोरफड तेल लावल्याने केस पांढरे होत नाहीत. त्यासाठी तुम्हाला कोरफड जेलमध्ये  लिंबू रस घालून पेस्ट बनवून ती केसांमध्ये लावावी लागेल.


तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:


केस लवकर वाढवण्यासाठी घरगुती उपाय


Oils For Hair Growth & Tips In Marathi


Hair Color जास्त काळ टिकण्यासाठी सोप्या टिप्स


टेम्पररी स्ट्रेटनिंगसाठी घरगुती उपाय