ADVERTISEMENT
home / आरोग्य
Skipping rope benefits

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत दोरीच्या उड्या

निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने फिटनेस राखणं गरजेचं आहे. फिट राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. वर्क आऊटप्रमाणे योग्य डाएट, योगासने, प्राणायमाचा ही तुमच्या आरोग्यावर चांगला फायदा होतो. पण जर तुम्हाला व्यायामासाठी फार वेळ काढता येत नसेल तर कमीत कमी चालण्याचा व्यायाम आणि घरच्या घरी दोरीच्या उड्या मारण्याचा व्यायाम जरूर करा. दोरीच्या उड्या  (Skipping Rope) हा व्यायामाचा एक सोपा मार्ग आहे. हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ काढावा लागत नाही. दिवसभरात पंधरा ते वीस मिनीटे तुम्ही दोरीच्या उड्या मारण्यासाठी नक्कीच वेळ काढू शकता. शिवाय हा व्यायाम तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता. यासाठी लागतात फक्त दोरीच्या उड्या ज्या तुमच्या बॅगेतून सहज कॅरी करता येतात. यासाठी जाणून घ्या दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे

तसंच जाणून घ्या Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे

दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे

दोरीच्या उड्या मारणं आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरतं. दोरीवरून दोन्ही पायाने उडी मारून हा व्यायाम करता येतो. पूर्वीच्या काळी लहान मुलांचा हा खास खेळदेखील असत असे. ज्यामुळे खेळता खेळता मुलांचा व्यायाम होत असे. शाळेत दोरीच्या उड्या मारणे एक महत्त्वाचा क्रीडा प्रकार असत असे. मात्र आता हा क्रीडा प्रकार लुप्त झाल्यामुळे त्याबद्दल माहिती मिळवणे गरजेचं झालं आहे. जाणून घ्या फायदे

वजन कमी होते

वजन कमी करण्यासाठी आजवर तुम्ही अनेक उपाय केले असतील. पण यासाठी तुम्ही कधी दोरीच्या उड्या मारल्या आहेत का ? नसतील तर हा उपाय जरूर करा. कारण उड्या मारण्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज लवकर बर्न होतात. शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्याचा हा सोपा मार्ग आहे. चरबी कमी झाल्यामुळे तुमचे वजन आपोआप कमी होते. यासाठी दररोज काही मिनीटे दोरीच्या उड्या जरूर मारा. यासोबतच वाचा सकाळी चालण्याचे अप्रतिम फायदे (Morning Walk Benefits In Marathi)

ADVERTISEMENT

शारीरिक ऊर्जा वाढते

काम केल्यावर तुम्हाला लगेच थकवा जाणवत असेल तर तुम्हाला तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढवण्याची गरज आहे. यासाठी नियमित दोरीच्या उड्या मारा ज्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढेल. दररोज उत्साही राहण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

सांधेदुखी कमी होते

आजकाल बैठ्या जीवनशैलीमुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. यातील मुख्य समस्या म्हणडे सांधेदुखी. सांध्यांची नियमित हालचाल झाली नाही तर ते जखडतात आणि हालचाल करणं कठीण होतं. यासाठी दररोज पुरेशी शारीरिक हालचाल होणं गरजेचं आहे. दोरीच्या उड्या मारण्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराची योग्य हालचाल होते. 

शारीरिक संतुलन वाढते

खेळाडू अथवा अॅथलीट नेहमी दोरीच्या उड्या मारतात. अनेकदा सिनेमामध्ये अशा प्रकारचे वर्कआऊट दाखवण्यात येते. यामागचं कारण यामुळे शारीरिक संतुलन राखण्यास मदत होते. कोणत्याही खेळात अथवा क्रीडा प्रकारामध्ये गरज असते ते शारीरिक आणि मानसिक संतुलनाची… दोरीच्या उड्या मारण्यामुळे तुम्हाला दोन्ही प्रकारचे संतुलन राखणे सोप जाते. तसंच वाचाल तर थक्क व्हाल (Benefits Of Cycling In Marathi)

उंची वाढते

लहानपणी ठराविक वयापर्यंत शारीरिक उंची वाढते असं सांगितलं जातं. यासाठीच योग्य वयात उंची वाढण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. कारण दोरीच्या उड्या मारण्यामुळे लहान मुलांची उंची वाढते कारण यात मुलांच्या पाठ, पाठीचा कणा, पायांचे स्नायू यांच्यावर योग्य ताण येतो. ज्यामुळे उंची वाढण्यासाठी चांगली मदत होते. 

ADVERTISEMENT

दोरीच्या उड्या कोणी मारू नयेत

दोरीच्या उड्या मारण्याचे अनेक फायदे असले तरी काही लोकांनी दोरीच्या उड्या मारणे टाळलेलेच बरे. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, गुडघ्याचा त्रास आहे,  ह्रदयविकार आहेत अशा लोकांनी आणि  गरोदर महिलांनी दोरीच्या उड्या मारू नयेत.

21 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT