‘कौन बनेगा करोडपती’मध्ये क्षुल्लक प्रश्नाचे उत्तर न आल्यामुळे ट्रोल झालेल्या सोनाक्षीचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोनाक्षीला इंडिगो एअरलाईन्सने प्रवास करताना वाईट अनुभव आला असून तिने थेट व्हिडिओ शेअर करत तिचे गाऱ्हाणे मांडले आहे. आता सोनाक्षीसोबत नेमकं काय झालं असा प्रस्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही तिचा हा सगळा अनुभव नक्की वाचायला हवा. कारण एरव्ही शांत असणाऱ्या सोनाक्षीसोबत असे काही झाले की, तिने थोडं चिडूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. तिने ट्विट करत या सगळ्या अन्यायाला वाचा फोडली आहे.
करोड’पती’ असलेल्या अभिनेत्री, जगतात ऐशोआरामात आयुष्य
काय आला सोनाक्षीला अनुभव
सोनाक्षी इंडिओ एअरलाईन्सने प्रवास करत असताना तिला हा अनुभव आला आहे. तिने तिची बॅग लगेजमध्ये टाकली होती. तिने तिची बॅग लगेज बेल्टवरुन घेतल्यानंतर तिला तिच्या बॅगची दैनीय अवस्था झालेली दिसली. तिची बॅग अक्षरश: तुटून आली होती. तिच्या बॅगचा पट्टा तुटला होता. या बॅगचे एक चाकही निखळून आला होते. तिने इंडिगोवर ताशेरे ओढताना सॅमसोनाईटची खिल्ली उडवली आहे. ती म्हणाली की, सॉरी सॅमसोनाईट इंडिगोच्या सर्व्हिसपुढे तुमचाही टिकाव लागला नाही. एकूणच सर्वसामान्यांना एअरलाईन्सचा असा अनुभव कधी ना कधी येतच असतो. पण आता सेलिब्रिटींच्या बॅगाही अशा तुटून येत असतील तर मग विचारता सोय नाही.
Hi @IndiGo6E, Hulk is 6E, this was not so 6E. You broke the unbreakable.#Indigo pic.twitter.com/8x4lVzBlqH
— Sonakshi Sinha (@sonakshisinha) November 3, 2019
कौन बनेगा करोडपतीमुळे झाली ट्रोल
काही दिवसांपूर्वी जेव्हा सोनाक्षी सिन्हा कौन बनेगा करोडपतीमध्ये आली होती. त्यावेळी तिला रामायणासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. हनुमान कोणासाठी संजीवनी घेऊन आले होते? हा साधा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. पण या प्रश्नाचे उत्तर तिला आले नाही. तिच्या दोन भावांचे नाव लव-कुश आहे. तिच्या बंगल्याचे नाव ‘रामायण’ आहे. पण तिला रामायणासंदर्भात काहीच माहीत नाही. याला काहीच अर्थ नाही. असे म्हणत लोकांना तिची खिल्ली उडवली होती.
दबंग गर्ल सोनाक्षी करतेय नवोदित अभिनेत्याला डेट
खानदानी शफाखानामध्ये दिसली सोनाक्षी
सोनाक्षीने तिच्या करीअरची सुरुवात दबंगपासून केली.त्यानंतर तिला बऱ्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. धर्मा प्रोडक्शनच्या ‘कलंक’ या चित्रपटातही ती महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. नुकताच तिचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट येऊन गेला. त्यातही ती दिसली. पण सोलो लीड असलेला तिचा चित्रपट ‘खानदानी शफाखाना’ मात्र तितकासा चालला नाही. तिचा हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरला. पण असे असले तरी तिचा आणखी एक चित्रपट फ्लोअरवर येण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे ‘दबंग 3’ त्यामुळे सोनाक्षी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज आहे. या शिवाय ‘भूज: द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचे शुटींगही तिने संपवले आहे. या चित्रपटात ती अजय देवगण आणि परिणिती चोप्रासोबत दिसणार आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.