ADVERTISEMENT
home / मनोरंजन
samantha_nanachaitnya

या सेलिब्रिटी कपलच्या घटस्फोटाची चर्चा, पण…

 सेलिब्रिटी कपल्सची लग्न आणि त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा या नेहमीच सुरु असतात. हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी अधिक पटकन समजू शकतात. सध्या सोशल मीडियाच्या माहितीनुसार साऊथ इंडस्ट्रीतील एकदम हॉट असं कपल म्हणजे समँथा प्रभू आणि छाया अकिनी हे एकमेकांपासून वेगळे होत असल्याच्या चर्चांना उधाण आलेले आहे. सगळ्या मीडियाभर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या रंगलेल्या असताना समँथा मात्र सुट्टीचा मस्त आनंद घेताना दिसत आहे. त्यामुळे आता या दोघांमध्ये नक्की आलबेल आहे की नाही हे त्यांनाच ठाऊक आहे. या बद्दल काही दिवसांपूर्वी समँथाने मीडियाशी संवादही साधला ती काय म्हणाली ते जाणून घेऊया.

संग्राम- खुशबू यांच्या घरी येणार नवा पाहुणा, शेअर केला आनंद

अशी झाली सुरुवात

चर्चांना उधाण येण्यासाठी समँथा कारणीभूत ठरली आहे. लग्नानंतर समँथाने आपलं नाव बदलल होतं. ती समँथा अकिनी असं नाव लावत होती. पण काहीच दिवसांपूर्वी तिने ते नावं काढून टाकलेले आहे. तिने आता आपले नाव समँथा प्रभू असं लावायला घेतलं आहे. तिने आडनावातून अकिनी काढून टाकल्यामुळे या चर्चांना उधाण आलेले आहे.  त्यातच काही दिवसांपूर्वी नागार्जुन म्हणजेच तिचे सासरे यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसाला देखील ती उपस्थित नव्हती. तिची ही अनुपस्थित बरेच काही सांगून गेली आहे. एरव्ही कुटुंबासोबत असणारी समँथा ही आता कुटुंबासोबत बाहेर फिरत नसून तिच्या काही मित्रांसोबत ती बाहेर फिरताना दिसत आहे. त्यामुळेच की काय तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर अनेकांनी शिक्कामोर्तब केलेले आहे.

रीना जिंकत आहे ‘मन उडू उडू झालं’ मधून प्रेक्षकांचे मन

ADVERTISEMENT

समँथाने बाळगले मौन

समँथा सध्या काही चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तिचे अनेक प्रॉजेक्ट सुरु आहेत. या शुटिंगसाठी ती बाहेर असते. पण तिच्या या अचानक बदलामुळे ज्यावेळी तिला प्रत्यक्षात विचारणा करण्यात आली त्यावेळी मात्र तिने या सगळ्यावर मौन बाळगणे पसंत केले. तिने एका मुलाखतीदरम्यान या अफवांवर मला बोलण्याची मुळीच इच्छा नाही असे सांगून या विषयावर बोलणे टाळणे. त्यामुळे आता या दोघांनी नक्की एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावर सध्या काहीच बोलता येणार नाही. 

नागार्जुन चर्चेपासून दूर

समँथाला हा प्रश्न विचारला गेला आणि तिने या सगळ्या गोष्टीला अफवा सांगून टाळाटाळ केली आहे. पण हा प्रश्न अद्याप नागाचैतन्य विचारण्यात आलेला दिसत नाही. नागाचैतन्य अकाऊंटवर फारशी हालचाल दिसत नाही. या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर काहीही बदल केलेला नाहीत. त्यांच्या अकाऊंटमध्ये या दोघांचे कपल म्हणून  बरेच फोटो दिसत आहेत. त्यामुळे कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचणे हे देखील सध्याच्या स्थितीत काही पटण्यासारखे वाटत नाही. 

आता हा केवळ अकाऊंटमधील बदलामुळे झालेले गैरसमज आहे की, त्यांचा घटस्फोट झाला आहे हे येत्या काळात लवकरच कळेल. 

विद्युत जामवाल आणि नंदिता मेहतानीचा झाला साखरपुडा, नेहा धुपियाने दिल्या खास शुभेच्छा

ADVERTISEMENT
07 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT