सोयाबीन आहारात असणं खूप गरजेचं आहे. कारण सोयाबीनमध्ये प्रोटीनसह अनेक पोषक गुणधर्म असतात. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असतं. ज्यामुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारते. हाडे आणि मांसपेशी मजबूत होण्यासाठी सोयाबीनची चांगली मदत होते. सोयाबीन खाण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते, मधुमेह नियंत्रित राहतो, मेंदूचे कार्य सुरळीत होते, हाडे आणि स्नायू बळकट होतात शिवाय तुमच्या पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. यासाठी सोयाबीनपासून बनवलेल्या या रेसिपीज (Soyabean Recipe In Marathi) ट्राय करून बघाच… कारण या स्वादिष्ट, चटकदार आहेतच. पण त्यामुळे तुमचे आणि कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहू शकते.
Table of Contents
- Soybean Bhaji Recipe In Marathi | सोयाबीनची भाजी
- Soyabean Chilli Recipe In Marathi | सोयाबीन चिली रेसिपी
- Soya Chunks Curry Recipe In Marathi | सोया चंक्स करी
- Soyabean Biryani Recipe In Marathi | सोयाबीन बिर्याणी
- Soyabean Pulao Recipe In Marathi | सोयाबीन पुलाव
- Soyabean Masala Recipe In Marathi | मसाला सोयाबीन
- Soyabean Manchurian Recipe in Marathi | सोयाबीन मंचुरिअन
- Soyabean Cutlet Recipe In Marathi | सोयाबीन कटलेट
- Soyabean Pakoda Recipe In Marathi | सोयाबीन पकोडा
- Soybean Stir Fry Recipe In Marathi | सोयाबीन फ्राय
- Soya Kebabs | सोया कबाब
- Soya Pancakes | सोया पॅनकेक
सोयाबीन खाण्याचे फायदे आणि तोटे | Soybean Benefits In Marathi
Soybean Bhaji Recipe In Marathi | सोयाबीनची भाजी
सोयाबीनची भाजी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असते. मुलांनाही ही भाजी खूप आवडते. पोळी अथवा भाकरीसोबत सोयाबीनची भाजी जास्त चांगली लागते.
साहित्य –
- एक वाटी सोयाबीन चंक्स
- एक कांदा
- एक चमचा दही
- दोन मोठे टोमॅटो
- कोथिंबीर
- धणे पावडर
- हळज
- दोन लवंग
- दोन वेलची
- दालचिनीचा तुकडा
- आल्यालसणाची पेस्ट एक चमचा
- हळद
- लाल तिखट
- एक चमचा जिरे
- तूप
- चवीनुसार मीठ
- तेल
सोयाबीनची भाजी करण्याची कृती –
- सोयाबीन चंक्स थोड्यावेळ कोमट गरम पाण्यात भिजत ठेवा.
- गॅसवर कढई ठेवा आणि त्यामध्ये एक चमचा शुद्ध तूप टाका.
- त्यावर जिरं, लवंग, दालचिनी, वेलची गरम करून घ्या
- कांदा कापून तो भाजून घ्या
- टोमॅटोची प्युरी तयार करा.
- कांदा आणि भाजलेले मसाले वाटून वाटण तयार करा
- तेलावर तयार मसाला, टोमॅटोची प्युरी परतून घ्या.
- त्यावर सोयाबीन चंक्स, दही परतून घ्या.
- वरून चिमूटभर हळद, मीठ, धण्याची पावडर आणि गरजेनुसार लाल मसाला टाका. पाणी टाकून मिश्रण शिजू द्या.
- कोथिंबीर टाकून भाजी गरमगरम सर्व्ह करा
- आहारात सुरु करा सोयाबीन तेलाचा वापर आणि मिळवा फायदे
आहारात सुरु करा सोयाबीन तेलाचा वापर आणि मिळवा फायदे
Soyabean Chilli Recipe In Marathi | सोयाबीन चिली रेसिपी
घरात लहान मुलं असतील तर त्यांना नेहमीपेक्षा वेगळे पदार्थ आवडतात. यासाठी जर तुम्ही सोया चिल्ली करण्याचा बेत आखला असेल तर ही रेसिपी नक्की वाचा.
साहित्य –
- दोन कप सोया चंक्स
- एक कांदा
- एक सिमला मिरची
- चार ते पाच लसणाच्या पाकळ्या
- अर्धा चमचा काळीमिरी पावडर
- दोन चमचे कॉर्न फ्लोअर
- सोया सॉस
- टोमॅटो सॉस
- दोन चमचे दही
- चवीपुरतं मीठ
- कांद्याची पात
सोया चिल्ली करण्याची कृती –
- सोया चंक्स उकडून पाणी निथळून घ्या
- एका भांड्यात दही, काळीमिरी पावडर, मीठ आणि सोया सॉस मिक्स करा
- त्यात सोया चंक्स आणि कॉर्न फ्लोअर मिसळा
- तेल गरम करून सोया चंक्स तळून घ्या
- कढईत तेल गरम करा त्यात लसूण परतून घ्या
- कांदा आणि सिमला मिरचीचे मोठे चौकोनी तुकडे कापून परतून घ्या
- कांद्यावर सोया सॉस, टोमॅटो सॉस, काळीमिरी पावडर आणि मीठ टाका
- आवडीनुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे परतून घेऊ शकता
- मिश्रणात तळलेले सोयाबीन टाका आणि चांगलं परतून घ्या
- कांद्याची पात टाकून सजवा आणि वाढा
चेहऱ्यावर ग्लो आण्यासाठी जाणून घ्या सोयाबीन तेलाचे फायदे (Soybean Oil Benefits In Marathi)
Soya Chunks Curry Recipe In Marathi | सोया चंक्स करी
सोया चंक्स वापरून तुम्ही मस्त करी बनवू शकता. भात अथवा पोळीसोबत ही करी मस्त लागते.
साहित्य –
- एक वाटी सोया चंक्स
- एक कांदा
- एक टोमॅटो
- एक चमचा आलं लसूण पेस्ट
- एक चमचा गरम मसाला
- एक चमचा धणे पावडर
- एक चमचा लाल तिखट
- चिमूटभर हळद
- चवीनुसार मीठ
- तेल
सोया चंक्स करी बनवण्याची कृती –
- गरम पाण्यात सोया चंक्स टाका आणि निथळून घ्या
- कढईत तेल गरम करून कांदा परतून घ्या
- आलं लसणाची पेस्ट परतून घ्या
- टोमॅटोची प्युरी परता आणि सर्व मसाले त्यात मिसळा
- मसाल्यातून तेल वेगळे झाले की त्यावर सोया चंक्स परतून घ्या
- ग्रेव्ही घट्ट हवी की पातळ त्यानुसार करी बनवा आणि पाच मिनीटे भाजी शिजू द्या.
नाचणी सत्व आणि नाचणी रेसिपीज (Nachni Satva Recipe In Marathi)
Soyabean Biryani Recipe In Marathi | सोयाबीन बिर्याणी
सोयाबीन्सपासून बिर्याणी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मात्र आज आम्ही तुमच्यासोबत एक खास पद्धत शेअर करत आहोत.
साहित्य –
- एक वाटी सोयाबीन चंक्स
- दोन वाटी शिजवलेला भात
- एक चमचा आलं लसणाची पेस्ट
- दोन चमचे दही
- दोन लवंग
- दोन वेलची
- तीन चार काळीमिरी
- जिरे पावडर
- लाल तिखट
- एक दालचिनीचा तुकडा
- एक बटाटा
- एक कांदा
- एक सिमला मिरची
- अर्धी वाटी मटार
- अर्धी वाटी गाजर
- एक टोमॅटो
- केशर
- तेल
- चवीनुसार मीठ
सोया बिर्याणी बनवण्याची कृती –
- सोया चंक्स गरम पाण्यात भिजवून निथळून घ्या.
- एका भांड्यामध्ये सर्व भाज्या, आलं लसणाची पेस्ट, सर्व मसाले एकत्र करून ठेवा.
- कढईमध्ये कांदा, काळीमिरी, लवंग, वेलची, तमालपत्र, दालचिनी परतून घ्या.
- सर्व भाज्या मिसळा, सोया चंक्स मिसळा आणि साहित्य एकजीव करा
- भाज्या शिजल्यावर त्यात शिजलेला भात टाका आणि वरून केशराचे दूध शिंपडा
- वाफेवर बिर्याणीला चांगला दम द्या
चटपटीत आणि स्वादिष्ट राजमा रेसिपीज (Rajma Recipe In Marathi)
Soyabean Pulao Recipe In Marathi | सोयाबीन पुलाव
सोयाबीनपासून तुम्ही पुलावही करू शकता. सोयाबीन मुळातच पौष्टिक असल्यामुळे सोयाबीन पुलाव खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
साहित्य –
- एक वाटी तांदूळ
- एक वाटी सोयाबीन चंक्स
- एक कांदा
- एक टोमॅटो
- आवडीनुसार वाटीभर फ्लॉवर, मटार, सिमला मिरची, गाजर भाज्या
- एक चमचा लिंबाचा रस
- जिरे, तमालपत्र, दालचिनी आणि काळीमिरी
- दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या
- एक छोटा आल्याचा तुकडा
- जिरे पावडर
- हळद
- धणे पावडर
- पुलाव मसाला
- चवीपुरतं मीठ
- तूप
सोयाबीम पुलाव करण्याची कृती –
- तांदूळ एक तास धुवून भिजत ठेवा
- पाण्यात मीठ, तूप, हळद टाकून भात शिजवून घ्या
- गरम पाण्यात सोयाबीन चंक्स टाकून निथळून घ्या.
- मिक्सरमध्ये लसूण, आलं, जिरे पावडर, धणे पावडर मिक्स करून घ्या.
- कढईत तूप गरम करून त्यात जिरे, तमालपत्र, दालचिनी, काळीमिरी भाजून घ्या.
- खडे मसाले भाजून झाले की त्यावर पातळ चिरलेला कांदा परतून घ्या.
- कांद्यावर आलं लसणाची पेस्ट परतून घ्या
- फोडणीत सर्व भाज्या टाका आणि मंद गॅसवर शिजू द्या.
- भाज्या शिजल्या की पुलाव मसाला आणि मीठ टाका
- शिजलेला भात टाका आणि व्यवस्थित मिक्स करा
- भातावर लिंबू पिळा आणि पुलाव सर्व्ह करा.
अशी बनवा चमचमीत घेवड्याची भाजी रेसिपी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)
Soyabean Masala Recipe In Marathi | मसाला सोयाबीन
सोयाबीनपासून एखादा चटकदार पदार्थ बनवायचा असेल तर मसाला सोयाबीन मस्त पर्याय आहे.
साहित्य
- दीड वाटी सोयाबीन्स
- एक कांदा
- एक आल्याचा तुकडा
- तीन ते चार लसणाच्या पाकळ्या
- एक टोमॅटो
- दोन ते तीन हिरव्या मिरच्या
- हळद
- एक चमचा लाल तिखट
- चवीनुसार मीठ
- एक चमचा चाट मसाला
- तेल
मसाला सोया करण्याची कृती
- सोयाबीन्स रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी कुकरमध्ये शिजवून घ्या
- कढईत तेलावर कांदा, हिरवी मिरचीचे तुकडे, आलंलसणाची पेस्ट परतून घ्या.
- त्यात टोमॅटोची प्युरी टाका आणि चांगले परतून घ्या
- फोडणीत हळद, लाल तिखट, मीठ आणि उकडलेले सोयाबीन्स टाका
- गरजेनुसार पाणी टाका आणि दहा मिनीटे भाजी शिजू द्या.
- चाट मसाला टाकून सर्व्ह करा.
Soyabean Manchurian Recipe in Marathi | सोयाबीन मंचुरिअन
मंचुरिअन खायला आवडत असतील तर सोया मंचुरिअन नक्कीच ट्राय करायला हवेत.
मंचूरिअन साठी साहित्य
- एक वाटी सोयाबीन
- एक चमचा आले लसूण पेस्ट
- एक चमचा लाल तिखट
- पाव चमचा काळीमिरी पावडर
- दोन मोठे चमचे मक्याचे पीठ
- चवीनुसार मीठ
सूपसाठी साहित्य
- एक चमचा तेल
- एक चमचा लसून बारीक चिरलेला
- अर्धा चमचा आले बारीक चिरलेले
- एक कांदा उभा चिरलेला आणि कांद्याची पात
- अर्धी सिमला मिरची चिरलेली
- एक चमचा सोया सॉस
- एक चमचा चिली सॉस
- एक चमचा टॉमेटो सॉस
- एक चमचा व्हिनेगर
- एक चमचा साखर
- थोडं लाल तिखट
- मक्याचे पीठ
- पाणी
- चवीनुसार मीठ
सोया मंचुरिअन करण्याची कृती
- एका भांड्यात पाणी गरम करा आणि सोयाबीन चंक्स उकडून त्यातील पाणी काढून टाका.
- सोयाबीन चंकमध्ये मीठ, आलं लसणाची पेस्ट, लाल तिखट, मक्याचे पीठ मिसळून घ्या.
- तेल गरम करून त्यात सोया चंक्स तळून घ्या
- एक चमचा मक्याचे पीठ आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा.
- सूपसाठी कढईत तेल गरम करा आणि आलं, लसून, कांदा, सिमला मिरची परतून घ्या
- त्यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, व्हिनेगर टाका आणि चांगले मिक्स करा
- मक्याच्या पीठाचे पाणी त्यात मिसळा आणि पातळ सूप तयार करा.
- सूपमध्ये मीठ आणि साखर मिसळा
- गरमगरम ग्रेव्हीमध्ये सोयाबीन्स चंक्स टाका आणि वरून काळीमिरी आणि कांद्याची पात टाकून सजवा.
Soyabean Cutlet Recipe In Marathi | सोयाबीन कटलेट
संध्याकाळी चहासोबत स्नॅक्स बनवण्यासाठी ही रेसिपी उत्तम आहे.
साहित्य
- दोन वाटी सोया चंक्स
- एक उकडलेला बटाटा
- एक कांदा
- एक कप ब्रेड क्रम्स
- एक चमचा हिरवी मिरची पेस्ट
- एक चमचा आलं लसूण पेस्ट
- कोथिंबीर चिरलेली
- अर्धा चमचा हळद
- अर्धा चमचा काळीमिरी पावडर
- चवीनुसार मीठ
- तेल
सोया कटलेट बनवण्याची कृती
- सोया चंक्क उकडून ते बटाट्यासोबत कुस्करून घ्या.
- कांदा, ब्रेड, हिरवी मिरची पेस्ट, आलंलसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर, काळीमिरी पावडर एकत्र करा
- मिश्रणाला कटलेटचा आकार द्या
- ब्रेडक्रमवर घोळवा आणि शॅलो फ्राय करा
Soyabean Pakoda Recipe In Marathi | सोयाबीन पकोडा
गरमागरम भजी अथवा पकोडा खाण्याचा बेत असेल तर आज सोयापासून बनवा हा हटके प्रकार
साहित्य
- एक कप सोया चंक्स
- एक चमचा गरम मसाला
- एक चमचा लाल तिखट
- एक वाटी बेसन
- एक चमचा तांदळाचे पीठ
- आलं लसणाची पेस्ट
- एक चमचा ओवा
- तेल
- हळद
सोया पकोडा बनवण्याची कृती
- सोया चंक्स उकडून निखळून घ्या.
- सर्व साहित्य एक जीव करा
- गरम तेलात मस्त भजी तळून घ्या
Soybean Stir Fry Recipe In Marathi | सोयाबीन फ्राय
सोयापासून आणखी एक चटपटीत पदार्थ बनवायचा असेल तर ट्राय करा सोया चंक्स स्टिर फ्राय.
साहित्य
- एक वाटी सोया चंक्स
- एक टोमॅटो
- एक आल्याचा तुकडा
- एक हिरवी मिरची
- एक सिमला मिरची
- कोथिंबीर
- जिरे
- धणे पावडर
- तेल
- चवीनुसार मीठ
सोया चंक्स स्टिर फ्राय साठी कृती
- सोया चंक्स गरम पाण्यात भिजवून निथळून घ्या
- टोमॅटो, आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट तयार करा
- कढईत तेल गरम करा आणि जिरे आणि धण्याची पावडर टाकून फोडणी द्या.
- टोमॅटो, आलं आणि मिरचीची पेस्ट परतून घ्या
- सर्व मसाले टाका आणि परतून घ्या.
- सोया चंक्स टाका आणि शिजवून घ्या
- कोथिंबीरस टाकून सर्व्ह करा
Soya Kebabs | सोया कबाब
कबाबशिवाय कोणतीही पार्टी पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे यंदा तुमच्या पार्टीच्या मेन्यूत सोया कबाबचा बेत करा.
साहित्य –
- दोन वाटी सोया चंक्स
- एक वाटी पोहा
- दोन उकडेला बटाटा
- एक चमचा आलं लसणाची पेस्ट
- मिरचीची पेस्ट
- कोथिंबीर
- एक चमचा धणे पावडर
- एक चमचा जिरे पावडर
- एक चमचा लाल तिखट
- एक चमचा चाट मसाला
- एक चमचा आमचूर पावडर
- एक चमचा गरम मसाला
- तेल
- चवीनुसार मीठ
सोया कबाब बनवण्याची कृती –
- सोया चंक्स गरम पाण्यात भिजवून निथळून घ्या
- सर्व साहित्य आणि मसाले एकत्र करा
- मिश्रणाला हवा तसा कबाबचा आकार द्या
- नॉन स्टिक तव्यावर कबाब शॅलो फ्राय करा
Soya Pancakes | सोया पॅनकेक
सोया पॅनकेक एक पौष्टिक आणि सर्वांना आवडेल अशी डिश आहे.
साहित्य
- एक वाटी सोया पीठ
- एक वाटी ओट्स
- मीठ
सोया पॅन केक बनवण्याची पद्धत
- ओट्स रोस्ट करून दळून घ्या
- ओट्सचे पीठ आणि सोया पीठात मीठ मिसळा
- पाणी टाकून पॅन केक होतील इतकं पातळ करा
- नॉन स्टिक तव्यावर थोडं तेल टाका आणि पॅन केक तयार करून घ्या
- सोया पॅन केक मध, दही अथवा सॉस सोबत छान लागतात.