सोयाबीनमध्ये अनेक पोषक घटक असतात. सोयाबीनपासून टोफू अथवा सोया मिल्क बनवलं जातं. यात प्रोटिन्सचे प्रमाण भरपूर असल्यामुळे शाकाहारी लोकांसाठी ते अतिशय पोषक ठरते. यासाठी सोयाबीन सीड्स, सोयाबीन तेल आणि सोयाबीनपासून बनवलेले इतर पदार्थ आहारात असायला हवे. सोयाबीन खाण्यामुळे अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका मिळू शकते. सोयाबीनमध्ये प्रोटिन्ससोबतच मिनरल्स, व्हिटॅमिन्सही असतात. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते, मधुमेहींसाठी सोयाबीन खाणं सोयाबेन तेलाचे फायदे खूपच फायदेशीर ठरतं. एवढंच नाही सोयाबीन खाण्याने तुमच्या मासिक पाळीच्या समस्या दूर होऊ शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा सोयाबीन कधीच कच्चं खाऊ नका. त्याचप्रमाणे सोयाबीन चंक्सचा भाजीसाठी वापर करण्यापूर्वी ते काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. यासाठीच जाणून घ्या सोयाबीन खाण्याचे फायदे (Soybean Benefits in marathi) आणि सोयाबीन खाण्याचे तोटे.
Table of Contents
- झोपेच्या समस्या कमी होतात (Helps Relieve Sleep Disorders)
- मॅनोपॉझमध्ये आराम मिळतो (Relieve Menopausal Symptoms)
- मधुमेह नियंत्रित राहतो (Help Manage Diabetes)
- रक्ताभिसरण सुधारते (Help Improve Blood Circulation)
- गरोदरपणात उपयुक्त (Essential for
- ह्रदयाचे आरोग्य उत्तम राहते (Boost Heart Health)
- हाडांचे आरोग्य सुधारते (Improve Bone Health)
- पचनशक्ती वाढते (Boost Digestion)
- कर्करोगापासून संरक्षण मिळते (Prevent Cancer)
- वजन कमी होते (Weight Loss)
- सोयाबीन खाण्याचे तोटे (Side Effects Of Soybeans)
- सोयाबीन खाण्याचे फायदे आणि निवडक प्रश्न – FAQs
झोपेच्या समस्या कमी होतात (Helps Relieve Sleep Disorders)
सोयाबीन खाण्याचे फायदे (soyabin khanyache fayde) जाणून घेताना तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की सोयाबीन खाण्यामुळे तुम्हाला शांत झोप लागू शकते. सोयाबीनमध्ये अनिद्रेच्या लक्षणांना दूर करणारे गुणधर्म असतात. आरोग्य तज्ञ्जांच्या मते सोयाबीनमुळे तुमच्या झोपेच्या तक्रारी तर कमी होतातच शिवाय तुमच्या निद्रानाशाचा त्रासही पूर्णपणे बरा होऊ शकतो. कारण सोयाबीनमध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशिअम आहे. ज्यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढते आणि शरीराला चांगला आराम मिळतो.
मॅनोपॉझमध्ये आराम मिळतो (Relieve Menopausal Symptoms)
सोयाबीन खाण्यामुळे तुमच्या मासिक पाळीतील अनेक समस्या दूर होतात त्याचप्रमाणे मॅनोपॉझमध्येही आराम मिळतो. कारण सोयाबीनमुळे शरीरातील एस्ट्रोजीनची पातळी संतुलित राहते. जर एस्ट्रोजीनची पातळी कमी झाली तर महिलांना मासिक पाळीत अथवा मॅनोपॉजच्या काळात अंगदुखी सारखे अनेक त्रास जाणवतात. ज्या महिलांनाअंगमेहनतीची अथवा कष्टाची कामं करावी लागतात. अशा महिलांना मॅनोपॉझच्या काळात खूप त्रास होतो. मात्र जर तुमच्या आहारात सोयाबीन असेल तर मॅनोपॉझची लक्षणे कमी प्रमाणात जाणवू शकतात.
चेहऱ्यावर ग्लो आण्यासाठी जाणून घ्या सोयाबीन तेलाचे फायदे (Soybean Oil Benefits In Marathi)
मधुमेह नियंत्रित राहतो (Help Manage Diabetes)
मधुमेहींना नेमकं काय खावं हा प्रश्न त्यांना नेहमीच सतावत असतो. कारण मधुमेहींच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या ह्रदय, किडनी, मेंदूवर होऊ शकतो. सोयाबीन खाण्यामुळे मधुमेंहीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित तर राहतेच शिवाय त्यामुळे त्यांचे कोलेस्ट्रॉल वाढत नाही. यासाठीच मधुमेहींनी नियमित सोयाबीन पासून बनवलेल्या पोळ्या खाव्या. गव्हात सोयाबीन मिसळून दळलेलं पीठ पोळ्यांसाठी वापरल्यास चांगला फायदा होऊ शकतो.
रक्ताभिसरण सुधारते (Help Improve Blood Circulation)
सोयाबीन खाण्याचे फायदे (soyabin khanyache fayde) असे आहेत की, सोयाबीनमध्ये लोह आणि कॉपर हे दोन घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात पुरेशा लाल रक्त पेशी निर्माण होतात. तज्ञ्जांच्या मते लाल रक्त पेशींची निर्मिती योग्य प्रमाणात झाल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. यासाठीच रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आहारात पुरेसे सोयाबीन प्रत्येकाने खायला हवे.
गरोदरपणात उपयुक्त (Essential for Pregnancy)
सोयाबीनमध्ये फॉलिक अॅसिड आणि बी कॉप्लेक्स भरपूर प्रमाणात असते. जे गर्भावस्थेमध्ये महिलांच्या शरीराला आवश्यक असते. गर्भवती महिलांनी सोयाबीनचा आहारात समावेश केल्यास त्यांच्या शरीराला हे पोषक घटक मिळतात. गर्भाच्या वाढ आणि विकासासाठी आणि सुलभ प्रसूतीसाठी गर्भवती महिलांच्या आहारात सोयाबीन असायला हवे.
ह्रदयाचे आरोग्य उत्तम राहते (Boost Heart Health)
सोयाबीन खाण्यामुळे ह्रदयाच्या अनेक समस्या कमी होतात. ह्रदयाचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल कमी आणि गुड कोलेस्ट्रॉल योग्य प्रमाणात असण्याची गरज असते. कारण कोलेस्ट्रॉल मुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो आणि ह्रदयाच कार्य सुरळीत होत नाही. सोयाबीनमध्ये गुड कोलेस्ट्रॉल असते. ह्रदयाचे कार्य चांगले राहण्यासाठी शरीराला याचा चांगला फायदा होतो. सोयाबीनमध्ये असलेल्या लेसीथीनमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहत नाही. म्हणूनच ह्रदयविकार असलेल्या लोकांनी सोयाबीनचा आहारात अवश्य वापर करावा.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Cholesterol)
हाडांचे आरोग्य सुधारते (Improve Bone Health)
सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आणि कॅल्शिअम असतात. हाडे मजबूत होण्यासाठी याची शरीराला गरज असते. ज्या लोकांना आर्थ्राटीस सारखे गंभीर हाडांचे विकार आहेत. त्यांनी आहारात सोयाबीनचा वापर केल्यास चांगला आराम मिळू शकतो. शिवाय सोयाबीनमध्ये फॅट्स आणि कॅलरिज कमी असतात. ज्यामुळे तुमचे वजन वाढत नाही. एवढंच नाही तर अॅनिमिया अथवा अशक्तपणा असलेल्या लोकांनी नियमित सोयाबीनची भाजी खाल्लास चांगला फायदा होऊ शकतो. कारण त्यामुळे त्यांच्या शरीरातील लाल रक्त पेशीतर वाढतातच शिवाय हाडेही मजबूत होतात. शरीराचा योग्य विकास करण्यासाठी सोयाबीन हा एक चांगला पर्याय आहे. कारण त्यामुळे तुमच्या मांसपेशी, नखं, हाडे, केस मजबूत होतात.
पचनशक्ती वाढते (Boost Digestion)
जर तुम्हाला वारंवार अचपन, गॅस होणे, पोट फुगणे, पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात सोयाबीन असायला हवे. कारण सोयाबीनमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि तंतूमय पदार्थांमुळे तुमचे पोट व्यवस्थित स्वच्छ होते. पोट स्वच्छ झाले, पचनशक्ती वाढली की आपोआप तुमच्या पोटाच्या समस्या, लठ्ठपणा कमी होतो.
कर्करोगापासून संरक्षण मिळते (Prevent Cancer)
सोयाबीन्समध्ये मोठ्या प्रमाणावर अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमचे कर्करोगापासून संरक्षण होते. काही संशोधनानुसार सोयाबीनमधील अॅंटि ऑक्सिडंट कर्करोगाच्या पेशींनी नष्ट करतात. शरीराला फ्री रेडिकल्सपासून दूर ठेवण्यासाठी आहारात सोयाबीनचा वापर करावा. शरीराचे संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी सोयाबीन्सचे विविध प्रकार नियमित खाणे फायद्याचे ठरेल.
वजन कमी होते (Weight Loss)
वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात सोयाबीनचा समावेश करू शकता. कारण सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटिन्स असतात. ज्यामुळे तुमच्या मांसपेशींचा विकास होतो आणि प्रोटिनमुळे शरीराचे योग्य पोषण होते. सोयाबीन्समध्ये फायबर्स असल्यामुळे सतत भूक लागत नाही आणि तुमचे वजन नियंत्रित राहते. यासाठीच वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये सोयाबीन असायलाच हवे.
सोयाबीन खाण्याचे तोटे (Side Effects Of Soybeans)
जसे सोयाबीन खाण्याचे फायदे आहेत तसेच त्याचे काही दुष्परिणामही आहेत. कोणत्याही गोष्टीचे आहारात अधिक प्रमाणात सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम जाणवतात. सोयाबीनचेही अधिक प्रमाणात सेवन करणे त्रासदायक ठरू शकते. सोयाबीन खाण्याचे तोटे माहीत असतील तर तुम्ही कधीच अती प्रमाणात सोयाबीन खाणार नाही. यासाठी…
- दिवसातून दोनदा सोयाबीन खाऊ नका. एकच वेळ प्रमाणात सोयाबीन तुम्ही नक्कीच खाऊ शकता.
- जर तुम्ही गरोदर असाल अथवा स्तनपान देणाऱ्या नवमाता असाल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्लानुसारच सोयाबीनचे सेवन करा.
- सोयाबीनमुळे स्पर्म काऊंट कमी होण्याची शक्यता असते. यासाठी जर तुम्ही बाळासाठी प्लॅनिंग करत असाल तर पुरूषांनी सोयाबीनचा वापर आहारात प्रमाणातच करा.
सोयाबीन खाण्याचे फायदे आणि निवडक प्रश्न – FAQs
सोयाबीन भिजवून खाण्याचे काय फायदे आहेत ?
सोयाबीन भिजवून खाण्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात आणि ह्रदयाचे आरोग्य सुधारते.
सोयाबीन कसे खावे ?
सोयाबीन खाण्याचे फायदे आणि प्रकार निरनिराळे प्रकार आहेत. तुम्ही सोया चंक्सची भाजी करू शकता. सोयाबीन्सचे दूध पिऊ शकता. सोया चंक्स पासून स्टार्टर अथवा इतर पदार्थ बनवू शकता. सोयाबीन्सची बिर्याणी खाऊ शकता.
सोयाबीन्समध्ये किती प्रमाणात प्रोटिन्स असते ?
पन्नास ग्रॅम सोयाबीन्समध्ये जवळ अठरा ते एकोणीस ग्रॅम प्रोटिन्स असते.
सोयाबीन दिवसभरात किती वेळा खावे ?
सोयाबीन दिवसभरात फक्त एकच वेळ खावे त्यापेक्षा जास्त वेळ खाण्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो.