ADVERTISEMENT
home / मनोरंजन
प्रियांका – निकच्या लग्नात खास राजस्थानी मेनू

प्रियांका – निकच्या लग्नात खास राजस्थानी मेनू

बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा जल्लोष आणि आनंद चालू आहे. दीपिका – रणवीरच्या इटलीतील लग्नानंतर आता प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) जोधपूरमध्ये रॉयल वेडिंगच्या तयारीमध्ये मग्न झाले आहेत. या दोघांचं कुटुंब आणि अगदी जवळचे नातेवाईक – मित्र या लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी जोधपूरला पोहचले आहेत. तुम्हालाही नक्कीच त्यांच्या लग्नामध्ये काय असणार आहे याची उत्सुकता आहे ना? आम्ही खास तुमच्यासाठी प्रियांका आणि निकच्या लग्नाची सर्व माहिती घेऊन आलो आहोत. कसा असणार आहे हा शाही विवाह सोहळा? काय असेल पाहुण्यांसाठी खास मेनू? अगदी प्रि-वेडिंगपासून ते प्रियांका – निकच्या सप्तपदीपर्यंत सर्व काही तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

प्री वेडिंग पासून ते सप्तपदीपर्यंत
बॉलीवूडमध्ये डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ सध्या खूपच वाढली आहे. त्यामुळे हल्ली सामान्य लोकंही डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य द्यायला लागले आहेत. विरूष्का आणि दीपवीरने आपल्या लग्नासाठी स्वप्नवत असे लोकेशन अर्थात इटलीची निवड केली. तर प्रियांका आणि निकने मात्र भारतीय लोकेशनची निवड केली आहे. राजस्थानमधील जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये हे दोघं विवाहबद्ध होत आहेत. दोघंही अगदी शाही लग्न करणार असल्याचं एकंदरीतच लक्षात येत आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचा हा शाही विवाह सोहळा चार दिवस चालणार आहे. पूजेपासून सुरुवात झालेल्या या विधींमध्ये मेंदी, संगीत, हळद आणि अनेक डिनर पार्टीजचा समावेश आहे. अजूनही प्रियांका आणि निकने आपल्या लग्नाची तारीख घोषित केली नसली तरीही २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने आणि ३ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने विवाह होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

priyanka-chopra-nick-jonas-wedding

मेन्यूमध्ये मिळणार शाही स्वाद
देसी गर्ल प्रियांका चोप्राचं लग्न राजस्थानमध्ये आहे, त्यामुळे देश-विदेशातील स्पेशल कुजीनव्यतिरिक्त जेवणामध्ये नक्कीच राजस्थानी पदार्थांची रेलचेल असणार आहे. प्रियांका आणि निकच्या शाही लग्नामध्ये इटालियन, मेक्सिकन, चायनीज आणि काँटिनेन्टल पदार्थांसह दाल बाटी चूरमा, प्याज कचोरी, गट्टे की सब्जी आणि मिरची वडा यासारखे स्पेशल राजस्थानी पदार्थही असतील. जेवल्यानंतर निकयांका (nickyanka) आपल्या पाहुण्यांसाठी डेझर्ट म्हणून केक्स आणि इतर मिठाईसोबत राजस्थानमधील प्रसिद्ध घेवर, कलाकंद, मोहनथाळ आणि मूगाच्या डाळीचा हलवादेखील सर्व्ह करणार असल्याचं वृत्त आहे.

ADVERTISEMENT

priyanka-chopra-nick-jonas

गिफ्ट्सची खास मागणी
बऱ्याचदा सेलिब्रिटीज आपल्या लग्नात आणि रिसेप्शनमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना कोणत्याही प्रकारचं गिफ्ट्स आणू नका असं सांगतात. मात्र प्रियांनाने आपल्या पाहुण्यांनी कोणतं गिफ्ट आणावं याची एक यादीच तयार केली आहे. ज्यामध्ये टीव्हीपासून भांड्यांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. प्रियांकाने अॅमेझॉन वेडिंग रजिस्ट्रीवर काही वस्तू शॉर्टलिस्ट केल्या आहेत, ज्या वस्तूंसह ती आपल्या नव्या संसाराची सुरुवात करणार आहे. प्रियांने सोशल मीडियावरही आपली ही यादी शेअर केली आहे. गिफ्ट्सचं हे कल्चर भारतामध्ये नवं असलं तरीही यु. एस. आणि युरोपमध्ये हे कल्चर प्रसिद्ध आहे. इतकंच नाही प्रियांकाने आपल्या घरासाठीच नाही तर आपला नवरा निक आणि आपली कुत्री डायनासाठीदेखील गिफ्ट्स मागवले आहेत.

priyanka-chopra-royal-wedding
या शाही लग्नासंदर्भात सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की POPxo Marathi वाचत राहा.

इमेज सोर्स – इन्स्टाग्राम 

ADVERTISEMENT

POPxo is now available in six languages: English, Hindi, Tamil, Telugu, Marathi and Bangla.

AWESOME NEWS! POPxo SHOP is now Open! Get 25% off on all the super fun mugs, phone covers, cushions, laptop sleeves, and more! Use coupon code POPXOFIRST. Online shopping for women never looked better!

 

 

ADVERTISEMENT
30 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT