गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह घराघरातून पाहायला मिळत आहे. कलाकारांच्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. यंदा अभिनेत्री स्पृहा जोशीने एका आगळ्या वेगळ्या ट्री गणेशाची स्थापना केली आहे. स्पृहाच्या गावी गणपती आणण्याची परंपरा आहे. त्यामुळे तिच्या घरी गावी गणपतीची स्थापना केली जाते. मात्र स्पृहाला कामानिमित्त प्रत्येक वर्षी गावी जाणं शक्य होत नाही. यासाठीच तिने अशा पद्धतीने इफोफ्रेन्डली गणेशाची स्थापना तिच्या राहत्या घरी केली आहे. विशेष म्हणजे तिने स्थापना केलेला गणपती बाप्पा हा ‘ट्री गणेशा’ आहे. या निमित्ताने घरी गणपती बाप्पाचं आगमन तर होईलच शिवाय त्याच्या विसर्जनातून निसर्गाची नवनिर्मिती देखील होईल अशी तिला आशा आहे. याबाबत स्पृहाने स्वतः हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
स्पृहाचा ट्री गणेशा
स्पृहाने प्रतिष्ठापना केलेला हा गणपती बाप्पा ट्री गणेशा आहे. या गणेशमुर्तीमध्ये एका रोपाचे बीज आहे. या ट्री गणेशाची स्थापना स्पृहाने एका कुंडीत केली आहे. दररोज ती त्या गणेशमुर्तीवर पाणी घालणार आहे. ज्यातून काही दिवसातच एक सुंदर रोप जन्माला येणार आहे. निसर्गाला पूरक आणि पोषक असा गणेशोत्सव साजरा करणं फारच गरजेचं आहे. वाढतं प्रदूषण आणि पर्यावरणाचं ढासळणारा समतोल पाहता आज सर्वांनीच अशा प्रकारचा गणेशोत्सव साजरा करायला हवा. सेलिब्रेटीच्या वागण्याबोलण्याचा त्यांच्या चाहत्यांवर नेहमीच परिणाम होत असतो. सहाजिकच कलाकारांनी अशी चांगली उचलेली पावले पाहून त्यांचे चाहते त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करू शकतात. स्पृहाने केलेली कृती नक्कीच कौतुकास्पद आहे. तसंच सोशल मीडियाच्या काळात गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस शेअर करून आपल्या भावना नक्की शेअर करा.
स्पृहा जोशी एक संवेदनशील अभिनेत्री
स्पृहाने उंच माझा झोका या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकांमधून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मोरया आणि देवा मधील तिने साकारलेल्या भूमिकांमधून तिला छोटे पण महत्त्वाच्या भूमिका साकारता आल्या.स्पृहाने अनेक मराठी नाटकांमध्येही काम केलं आहे. सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर या लहान मुलांच्या गाण्यांच्या कार्यक्रमातील निवेदनामुळे ती बच्चेकंपनीमध्ये लोकप्रिय झाली. स्पृहा स्वतः एक उत्तम कवयित्री आहे. ती एक संवेदनशील कलाकारही आहे. त्यामुळेच पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्याची सुरूवात स्वतःपासून करण्यासाठी तिने एक चांगली सुरूवात केली आहे.
अधिक वाचा
अवधूत गुप्ते तयार करणार पहिली Crowdsource गणपती आरती