आईवडील हे मुलांसाठी नेहमीच पहिले आदर्श असतात. त्यामुळे मुलांनी मोठं झाल्यावर त्यांच्या आईवडिलांप्रमाणे बनावं असं मानसिक प्रेशर असतं. कलाकाराचा मुलगा अथवा मुलगी मोठी झाली की सहज कलाकार बनू शकते. कारण त्यांना या क्षेत्रात येण्यासाठी स्ट्रगल करावं लागत नाही. आईवडिलांची ओळख आणि लोकप्रियता त्यांच्या पाठी असते. मात्र असं असूनही अनेक स्टार किड्स करिअरसाठी वेगळी वाट शोधतात. पाहू या अभिनयला रामराम ठोकलेल्या अशा काही कलाकारांच्या मुलांची नावे… यासोबतच वाचा तुमचे आवडते बॉलीवूड सेलिब्रेटीज आणि त्यांच्या विचित्र सवयी
श्वेता बच्चन नंदा
अभिताभ बच्चन यांच्या घरातच सर्व कलाकार आहेत. पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन आणि सूनबाई ऐश्वर्या रॉय बच्चन अशी अभिनयाची मांदियाळी असलेल्या घरात श्वेता बच्चन नंदा मात्र या करिअरपासून नेहमी दूरच राहिली. बिग बीची मुलगी असूनही तिने अभिनयाची वाट धरली नाही. श्वेता नंदा लाईमलाईट पासूनही दूरच असते. ती एक चांगली लेखिका असून तिला या क्षेत्रात जास्त रस आहे. तसंच वाचा टीव्हीवर ठरले हिट, पण बॉलीवूडमध्ये अनफिट, कोण आहेत हे कलाकार जाणून घ्या
रिद्धिमा कपूर
कपूर घराणं म्हणजे बॉलीवूडचं सर्वात लोकप्रिय घराणं… पृथ्वीराज कपूर पासून ते आता रणवीर कपूर पर्यंत सर्वांनी अभिनयाचा वारसा जपलेला आहे. घरात एवढे कलाकार असूनही ऋषी कपूर आणि नीतू कपूरची मुलगी रिद्धिमा कपूर मात्र बॉलीवूडपासून नेहमीच दूर राहिली. रिद्धिमा एक नावाजलेली ज्वेलरी डिझायनर आहे. तिचा स्वतःचा ‘आर’ हा ज्वेलरी ब्रॅंड आहे.
अंशुला कपूर
बोनी कपूर, श्रीदेवी कपूर, अनिल कपूर, अर्जून कपूर, सोनम कपूर, जान्हवी कपूर असे घरात एकापेक्षा एक बॉलीवूड सेलिब्रेटी असतानाही बोनी कपूरची मुलगी अंशुला कपूर मात्र या चकाचक दुनियेपासून थोडी दूरच असते. वडिलांचे या क्षेत्रात एवढं नाव असूनही अंशुलाला अभिनयात करिअर करायचं नाही.
बॉलीवूडचे हे कलाकार आहेत ‘शुद्ध शाकाहारी ‘
क्रिष्णा श्रॉफ
जॅकी श्रॉफ म्हणजेच जग्गू दाची मुलगी क्रिष्णा श्रॉफपण बॉलीवूडपासून दूरच आहे. जॅकीचा मुलगा टायगर श्रॉफने बॉलीवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र क्रिष्णाला क्षेत्रात रस नाही. कृष्णा फिटनेसबाबत मात्र खूपच जागरुक आहे. त्यामुळे ती स्वतःची जिम सध्या चालवत आहे. तिला नेहमीच बॉडी बिल्डिंग, फिटनेस यात रस असल्यामुळे ती स्वतःचा फिटनेस क्लब चालवत आहे. मराठी चित्रपट पाहायला आवडत असतील तर वाचा हे Famous Marathi Dialogues (मराठीतील प्रसिद्ध डायलॉग्ज्स)
शाहीन भट
बॉलीवूडमध्ये भट फॅमिलाचाही चांगलाच दबदबा आहे. असं असूनही महेश भट यांची मुलगी शाहीन भट मात्र या क्षेत्रापासून लांब राहणं पसंत करते. पूजा भट आणि आलिया भटने बॉलीवूडमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. शालीन भटला कॅमेरासमोर येणं मुळीच आवडत नाही. तिला अभिनयापेक्षा लेखन आणि दिग्दर्शन करायला आवडेल असं तिचं मत आहे.
याचप्रमाणे संजय दत्तची मुलगी त्रिशला दत्त, अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप, अनिल कपूरची मुलगी रिया कपूर यांनाही अभिनयात करिअर केलेलं नाही.