बॉलीवूड आणि हॉलीवूडची कितीही क्रेझ असली तरी मराठी चित्रपटातील डायलॉग्ज्सची सर त्यांना कधीच येणार नाही. कारण मराठीतील कित्येक डायलॉग्ज्स आजही आठवणीने एकमेकांना बोलले जातात आणि ते ऐकताच चेहऱ्यावर हसू नक्कीच येतं. मग तो नटसम्राट हा चित्रपट असो वा अशी ही बनवाबनवी चित्रपट असो. येत्या मराठी भाषा दिनाची माहिती आणि मराठी भाषा दिन शुभेच्छा सोबत डायलॉग्ज्सही शेअर करता येतील. या लेखात आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत मराठीतल्या नव्या आणि जुन्या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग्ज्स.
मराठीत एकसेएक चित्रपट आहेत ज्यांचे डायलॉग्ज्स आजही आपल्याला अगदी तोंडपाठ आहेत. मराठीतील या अजरामर कलाकृती आणि त्यातील संवाद हे अगदी आजच ऐकल्यासारखे वाटतात. चला मराठी जुन्या चित्रपटातील अजरामर डायलॉग्ज्स पाहूया.
धनंजय माने इथेच राहतात का? (अशी ही बनवाबनवी)
श्याम जसा पायाला घाण लागू नये म्हणून जपतो तसच मनाला घाण लागू नये म्हणून पण जप. (श्यामची आई)
तुम्ही दिलेले चाळीस रुपये पण वारले. (अशी ही बनवाबनवी)
शंतनू….(अशी ही बनवाबनवी)
आणि या मिसेस बालगंधर्व…(अशी ही बनवाबनवी)
अजून बारका नाही मिळाला का ? (शंतनू स्टूल घेऊन येतो तेव्हा ) (अशी ही बनवाबनवी)
जाऊबाई…इतक्यात नका जाऊ बाई जाऊबाई (अशी ही बनवाबनवी)
झुरळ… तशी आपल्या ऑफिसमध्ये झुरळ जरा कमीच आहेत. (अशी ही बनवाबनवी)
आणि हा माझा बायको..(अशी ही बनवाबनवी)
आनंदी गडे जिकडे तिकडे चोहीकडे..विश्वास सरपोतदार (अशी ही बनवाबनवी)
विश्वास सरपोतदार :- तुम्हाला काही लाज लज्जा आहे का? धनंजय माने :- हो.. जे काही ते आम्ही बरोबरच नेऊ, तुम्हाला नाहीतरी त्याचा काय उपयोग (अशी ही बनवाबनवी)
दूर व्हा दूर व्हा, सगळं निरर्थक आहे. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे ती मी आहे. ज्युलियस सीझर, मी आहे प्रतापराव, मी ऑथेल्लो, सुधाकर आणि हॅम्लेट आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट. (नटसम्राट)
टू बी ऑर नॉट टू बी…दॅट इज द क्वेश्चन…जगावं की मरावं हा एकच सवाल आहे.(नटसम्राट)
कुणी घर देता का घर? एका तुफानाला कुणी घर देता का? एक तुफान भिंती वाचून छपरावाचून, माणासाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून, डोंगराडोंगरात हिंडत आहे. कुणी घर देता का घर? (नटसम्राट)
प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं कधी योग्यता नसताना मिळतं. कधी चूक नसताना निघून जातं. (नटसम्राट)
विधाता तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजून ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू ही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन करूणाकरा आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे ? (नटसम्राट)
ह्याचा सत्कार करा सत्कार. (सरकारनामा)
तुमचे सावरता सावरता आमचे निसटायची वेळ आली आहे. (सरकारनामा)
अण्णा, तुला हिथं गाडीन. (सरकारनामा)
बोकड कापायचंय, बोकड. (सरकारनामा)
अशोक सराफ: ही कसली भाजी? निशिगंधा वाड : अंबाड्याची. अशोक सराफ: सगळा अंबाडाच घातला वाटत. (एकापेक्षा एक)
बाई वाड्यावर या (पिंजरा)
Damit (थरथराट)
कवट्याच्या कवटीला काळिमा फासालात… आ थू (थरथराट)
आहाईहीउहुएही…..फीसचक…टकलु हैवान (थरथराट)
ओम फट स्वाहा हा..(झपाटलेला)
डोळे बघ डोळे बघ…(पछाडलेला)
बाबा लगीन धीन्गच्याक धीच्यांग…(पछाडलेला)
मग माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर (झपाटलेला)
मराठीतील मुख्यतः जेवढे डायलॉग्ज्स प्रसिद्ध आहेत त्यात जास्तीत जास्त विनोदी डायलॉग्ज्सची संख्या आहे. नजर टाकूया मराठीतील विनोदी आणि प्रसिद्ध डायलॉग्ज्स.
तुला माणूस म्हणावं तर अक्कल नाही आणि गाढव म्हणावं तर शेपूट नाही. (कायद्याचं बोला)
कोण नाही कोणचा वरण भात लोणचा (लालबाग परळ)
नया है वह ( टाईमपास)
मेहुणे मेहुणे मेव्हान्यांचे पाव्हणे (दुनियादारी)
माझी लव प्राजू .. साईबाबा शप्पत..आपल्याला दोन गोष्टी लई आवडतात, काजू कतली आणि माझी प्राजू पतली!! (टाईमपास)
सस्ती चीजोंका शौक हम भी नही रखते…तुझी माझी यारी मग *** गेली दुनियादारी (दुनियादारी)
हातात क्याटबरी असताना समोर आलेलं बिस्कीटसुद्धा तुला सोडवत नाही..बच्चूच आहेस तू….(दुनियादारी)
भाग भाग के आय और मौत को समोर पाया… ऐ रिशी पकुर. (दुनियादारी)
मेव्हणे मेव्हणे आणि म्हेवण्यांचे पाहुणे. (दुनियादारी)
आपल्या लाईनकडे बघणंसुद्धा एक कला आहे, लाईनला पण कळलं पाहिजे की, आपण तिच्याकडे बघतोय. (शाळा)
लाजल्यावर मी खूप छान दिसते नं. तू खूप छान लाजतेस. (पुणे मुंबई पुणे)
अरे आओ ना.…फिर (प्यारवाली लव्हस्टोरी)
आजपासून काशिनाथ पर्व सुरू झालंय. (आणि डॉ. काशीनाथ घाणेकर)
अपना हो तो चर्चा, नई तो कायको फुकट का खर्चा…(प्यारवाली लव्हस्टोरी)
सरस्वती माते मला नाही पाहिलीस ह्या पोरांना तरी पाव ग बाई. (दुनियादारी)
लाजतेय कि लाजवतेय, सरळ उभी रहा…(प्यारवाली लव्हस्टोरी)
जोपर्यंत आपण आपली स्वत:ची लाल करून घेत नाही, तोपर्यंत लाल्या होत नाही. (आणि डॉ. काशीनाथ घाणेकर)
पहिली सिगरेट आणि पहिला मित्र.(दुनियादारी)
आणि माझ्या नावाच्या आधी लागतं नंतर नाही, या थिएटरचा लांडगा फक्त एक आहे..मी (आणि डॉ. काशीनाथ घाणेकर)
मितवा, मित्र, तत्वज्ञ,वाटाड्या,मितवा?…तू माझी ….मी तुझा!!! (मितवा)
चांगल्या झाडावर नेहमी माकडे चढतात. (दुनियादारी)
चेहरा ओला केल्यावर डोळ्यातील पाणी लपत असा वाटत का तुला? (मितवा)
आता त्रास करून घायचा नाही आता त्रास द्यायचा. (दुनियादारी)
या जगात बारमध्ये बसायला जागा आणि प्रेम नेहमी कमी पडत….(दुनियादारी)
लोक रुप पाहतात.आम्ही ह्रदय पाहतो, लोक स्वप्न पाहतात.आम्ही सत्य पाहतो…फरक एवढाच आहे की,लोक जगात मित्र पाहतात, पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो………!! (दुनियादारी)
नात्यांची गरज असावी पण गरजेपुरते नाते नसावे.(दुनियादारी)
आपण टाईमपास नाही करत…आपलं सिरीयसली आणि जाम प्रेम आहे तुझ्यावर…(टाईमपास)
हम जियेंगे अपनी मर्जीसे और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जीसे…(टाईमपास)
आई-बाबा आणि साईबाबाची शप्पथ अशीच पाहिजे आपल्याला !!! (टाईमपास)
आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार…. चला हवा येऊ द्या ! (टाईमपास)
तू माझ्या बाबांना शकाल म्हणतोस??? (टाईमपास)
दगडू…लाईफमध्ये लव नावाचा टाईमपास पाहिजे ! मला वेड लागले प्रेमाचे….(टाईमपास)
तुझं हो जराजरी ऐकलं ना तरी दिल धडधड करायला लागलाय रे..! (टाईमपास)
याला म्हणतात MM म्हंजे ? मॅरेज मटेरीअल..जे आजकाल गायब होत चाललं आहे. (टाईमपास)
प्रेम बरोबर असेन ना तर अख्खं जग जिंकेन आपण. (टाईमपास)