आपण जेव्हा आपल्या फिटनेसकडे लक्ष देतो तेव्हा अर्थातच साखर हा भाग आपल्या रोजच्या आयुष्यातून गायब झालेला भाग असतो. साखरेविषयी नेहमीच आपण वाईट ऐकलं आहे. साखरेमुळे वजन वाढतं किंवा साखरेने अनेक आजार होतात हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. पण अशाही काही पद्धती आहेत ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची चमक हीच साखर वाढवायला मदत करते. वाचून आश्चर्य वाटलं ना? हो पण हे खरं आहे. तुमची त्वचा अधिक तजेलदार आणि चमकदार बनवण्यासाठी कशा पद्धतीने साखर वापरायची याची माहिती खास आम्ही तुम्हाला देत आहोत. जाणून घेऊया साखरेचे हे वेगळे उपयोग –
1. चेहऱ्यावर चमक (Glow) आणण्यासाठी
तुम्हाला अचानक कोणत्याही पार्टीत जावं लागणार असेल आणि तुमच्या त्वचेवर अजिबातच तेज नसेल तर तुमचा मूड नक्कीच खराब होतो. पण असं होऊ देऊ नका. यासाठी आमच्याकडे आहे एक सोपी पद्धत ज्यामुळे तुम्हाला लगेच तुमच्या चेहऱ्यावर चमक आणता येईल.तुम्ही तुमचा चेहरा पहिले साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि मग चेहरा न पुसताच त्यावर दोन चमचे साखर आणि एक चमचा गुलाबपाणी एकत्र करून केलेलं पाणी चेहऱ्यावर लावा. साधारण 4-5 मिनिट्सनंतर तुमचा चेहरा पुसा. पाच मिनिटात तुमच्या चेहऱ्यावर चमक आलेली तुम्हाला दिसेल.
2. परफेक्ट क्लिंन्झर
तुम्ही कोणत्याही कंपनीचा क्लिंन्झर वापरत असाल तो तुमच्या हातात घ्या आणि त्यामध्ये एक चमचा साखर मिक्स करून घ्या. हे मिक्स केलेलं मिश्रण तुम्ही धुतलेल्या चेहऱ्यावर 4-5 मिनिट्स घासत राहा. आता साध्या पाण्याने पुन्हा चेहरा धुवा. हे क्लिंन्झर तुमच्या चेहऱ्यावर अधिक चांगला परिणाम करतं. यामुळे तुमची त्वचा अधिक मुलायम आणि smooth दिसते.
3. फेअर कॉम्लेक्शनसाठी
तुम्हाला जर असं वाटत असेल की, तुमचं कॉम्प्लेक्शन (Complexion) दिवसेंदिवस अधिक खराब होतं आहे, त्यासाठी खास उपाय आहे. तुम्ही एका वाटीत लिंबाचा रस काढा आणि त्यामध्ये एक चमचा साखर मिसळा. ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहरा आणि मानेवर लावा. तुम्हाला हवं असल्यास, हात आणि पायावरदेखील तुम्ही हा प्रयोग करू शकता. हे लाऊन साधारण 1 मिनिट तसंच ठेवा आणि कमीत कमी 4 मिनिट्स हातांना हलकं मालिश करा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा.
4. मुलायम त्वचेसाठी
तुमची त्वचा कोरडी होत असेल तर तुम्ही दोन चमचे नारळाच्या तेलामध्ये एक चमचा साखर मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लाऊन हाताने मालिश करा. साधारणतः 5 मिनिट्स मसाज केल्यानंतर तुम्ही साध्या पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही पूर्ण शरीरावरील डेड स्किन (dead skin) काढण्यासाठी वापर करू शकता. फक्त त्यासाठी बदामाच्या तेलाचा अथवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करा.
5. प्रदूषणाच्या परिणामापासून वाचण्यासाठी
साखर तुमच्या त्वचेला प्रदूषणापासूनही वाचवते. वाचून आश्चर्य वाटलं तरीही हे खरं आहे. तुमच्या त्वचेवर प्रदूषणाचा प्रभाव दिसू नये आणि चमक येण्यासाठी साखरेचा वापर येतो. त्यासाठी तुम्ही रात्री गुलाबपाण्यात 5-6 बदाम भिजवून ठेवा आणि मग सकाळी उठून याची पेस्ट बनवून घ्या. तयार पेस्टमध्ये एक चमचा साखर आणि अर्धा चमचा बदाम तेल मिसळून चेहरा आणि मानेवर लावा. 10 मिनिटांनंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. परिणाम तुम्हाला स्वतःलाच जाणवेल.
6. त्वचेच्या पोषणासाठी
त्वचेला पोषण देणं तितकंच गरजेचं आहे जितकं तुमच्यासाठी जेवण. त्वचेला योग्य पोषण मिळण्यासाठी तुम्ही साखरेचा वापर करू शकता. त्यासाठी एक चमचा साखर घेऊन त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि मग त्याने चेहऱ्यावर स्क्रब करा. योग्य स्क्रबिंगमुळे त्वचेला चांगलं पोषण मिळेल.
तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावर चमक आणायची असेल साखर हा खूपच चांगला पर्याय आहे. नक्की वापरून पाहा.
फोटो सौजन्य – Shutterstock
हेदेखील वाचा –
नितळ त्वचा हवी असेल तर असा करा हळदीचा वापर
ग्लिसरीनच्या वापराने मिळवा सुंदर त्वचा
भारतीयांची त्वचा आहे वेगळी म्हणून त्यांनी अशी घ्यावी काळजी