ADVERTISEMENT
home / मनोरंजन
स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली माडेचं नवीन गाणं ‘माझ्या रानफुला’

स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली माडेचं नवीन गाणं ‘माझ्या रानफुला’

लाखो तरुणींच्या गळ्यातला ताईत असलेला सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आणि सुरेल गायिका वैशाली माडे यांचं ‘माझ्या रानफुला’ हे गाणं आपल्याला लवकच ऐकायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या धर्मावर, जातीवर चित्रित केलेले सिनेमे पाहिले. मात्र महाराष्ट्रात अशी एक जमात आहे, जी नेहमीच मागासलेली आणि सध्याच्या सोयीसुविधांपासून वंचित राहिली आहे, ती म्हणजे आदिवासी जमात. ही जमात कशी होती आणि हे लोक किती लांबपर्यंत प्रवास करून, आयुष्यात कशी प्रगती करु शकतात, या विषयावर भाष्य करणारा ‘ऑनलाईन मिस्टेक’  हा मराठी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

 

आल्हाददायक अनुभव देणारं ‘माझ्या रानफुला’

गायिका वैशाली माडेला या गाण्याबद्दल विचारलं असता तिने सांगितलं की, या गाण्याचे बोल इतके अप्रतिम आहेत की, हे गाणं गाताना ते आपल्या खूप जवळचं वाटतं.

ADVERTISEMENT

तसचं हे गाणं गाताना एक आल्हाददायक अनुभव मिळाला, असं गायक स्वप्नील बांदोडकर यांनी सांगितलं.

‘माझ्या रानफुला’चं संगीत

file000146

या गाण्याचे संगीतकार दिनेश अर्जुना आणि गीतकार श्रीकृष्ण राऊत आहेत. ‘माझ्या रानफुला’ हे गाणं माझ्यासाठी आजपर्यंत संगीत दिलेल्या गाण्यांपैकी खूप वेगळं आणि हटके गाणं असल्याचं संगीतकार दिनेश अर्जुना यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

प्रेमाच्या गुलाबी रंगाने भरलेले हे गाणं ऐकण्याची उत्सुकता अजून वाढलीयं, असं म्हणायला हरकत नाही. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. ‘ऑनलाईन मिस्टेक’ या चित्रपटात गणेश यादव, रोहन पेडणेकर, प्रल्हाद चव्हाण, विशाल पाटील, आदिती कांबळे, साया काशिद, अस्मिता खटखटे हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसंच या चित्रपटाचं नृत्यदिग्दर्शन नरेंद पंडित करणार असून, रवि चंदन हे कॅमेरामन असणार आहेत.

आस्क मोशन फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते अरुण किनवटकर असून त्यांचा निर्माता म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. त्याचबरोबर ते स्वत: आदिवासी कुटुंबातले आहेत. नुकतंच या चित्रपटातील पहिल्या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आणि गायिका वैशाली माडे यांनी हे गाणं गायलं आहे. 

डॉ. राज माने आणि विनोद संतोषराव डवरे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. समाजाने दुर्लक्षित केल्यामुळे आदिवासी लोक कसं आणि का नक्षलवादी बनतात, या विषयावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट असल्याचं चित्रपटाचे निर्माते अरुण किनवटकर यांनी सांगितलं की, या चित्रपटात आदिवासी आणि राजघराणं यांच्या वारसांमध्ये घडणारी सुंदर अशी प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. यावरच आधारित ‘माझ्या रानफुला’ असं एक सुंदर रोमँटीक गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं.

हेही वाचा – 

ADVERTISEMENT

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ कॉलेज डायरी चित्रपटात पाच वेगवेगळ्या भाषेतील गाणी

प्रेमाचा निखळ अनुभव सांगणारं ‘अजुन अजुन’ गाणं

सोनू निगमच्या ‘रकम्मा’ गाण्यावर अभिनय करणार हटके डान्स

प्रेमवीरांची दांडी गुल करायला आले ‘दांडी गुल’ गाणे

ADVERTISEMENT
21 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT