ADVERTISEMENT
home / आरोग्य
urine_infection

युरीन इन्फेक्शन (Urine Infection) झाले हे कसे ओळखावे

 महिला आरोग्यामधील अनेकांना सतत होणारा त्रास म्हणजे युरीन इन्फेक्शन (Urine Infection)  लघवीच्या जागी जळजळ, खाज असे काही सुरु झाले की, साधारणपणे आपल्याला युरीन इन्फेक्शन (Urine Infection)  झाल्यासारखे वाटते. पण तुम्हाला नक्की ते झाले आहे का? याची माहिती असेल तर तुम्हाला त्यावर इलाज करणे सोपे जाते. खूप महिलांना आजच्या घडीलाही  युरीन इन्फेक्शन (Urine Infection)  संदर्भात काहीही माहिती नाही. त्यांना लघवीच्या जागी असा काही त्रास होऊ शकतो हे देखील फारसे पटत नाही. पण लघवीच्या जागी रोजच्यापेक्षा अधिक त्रास होत असेल तर तुम्हाला युरीन इन्फेक्शन (Urine Infection)  झाले की, नाही हे ओळखता यायला हवे. युरीन इन्फेक्शन (Urine Infection)  झाले हे कसे ओखावे चला घेऊया जाणून 

युरीन इन्फेक्शन होण्याची अनेक कारणे असतात. स्वच्छता हे त्यापैकी एक कारण असले तरी सेक्समुळे देखील हा त्रास होऊ शकतो. खूप जणांना सेक्सनंतर योनीमध्ये सूज जाणवणे, लघवीला कमी होणे, दुखणे अशा गोष्टी होतात. त्यामुळे युरीन इन्फेक्शन होण्याची कारणे अनेक आहेत. पण तुम्हाला तो झाला हे ओळखायचे कसे? असा प्रश्न पडला असेल तर जाणून घ्या युरीन इन्फेक्शन (Urine Infection) ची लक्षणे

  1. जर तुम्हाला युरीन इन्फेक्शन (Urine Infection)  झाले असेल तर योनी मार्गात खूप जळजळ होताना जाणवते. युरीन पास होताना ही जळजळ इतकी असह्य असते की, खूप जण लघवीला जाणे देखील टाळतात. जर काही तासांपासून तुम्हाला असा त्रास सुरु झाला असेल तर तुम्ही लगेचच डॉक्टर गाठा. कारण यावर योग्य इलाज योग्य वेळी झाला तर तुम्हाला त्यातून लवकर आराम मिळण्यास मदत मिळते. 
  2. लघवीला न जाण्याची सवय खूप जणांना असते. लघवी आली तरी ती धरुन राहणे. आरामात जाणे ही सवय देखील तुम्हाला अशा ​​युरीन इन्फेक्शन (Urine Infection)  साठी त्रासदायक ठरु शकते. लघवीचा रंग त्यामुळे बदलतो. पिवळी, लालसर अशी लघवी तुम्हाला झाली असेल तर युरीन इन्फेक्शन (Urine Infection)  झाल्याचा धोका असू शकतो. 
  3. ज्याप्रमाणे पाळीमध्ये असताना महिलांचे ओटीपोट दुखते. अगदी त्याचप्रमाणे सतत ओटीपोट दुखत असेल तर तुम्हाला युरीन इन्फेक्शन (Urine Infection)   झालेले असू शकते. पाळी येत असेल किंवा येणार असेल असा अंदाज घेऊन याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. 
  4. लघवीला कमी होणे हे देखील युरीन इन्फेक्शन (Urine Infection) चे लक्षण आहे. खूप जणांना लघवी फारच कमी कमी होते. याकडे दुर्लक्ष करु नका. तुमच्या युरीनिरी ट्रॅकमध्ये बिघाड झाला असेलतर असे होत असते. याचे कनेक्शन इन्फेक्शनशी असल्यामुळे याचा त्रास होऊ शकतो. 
  5.  लघवीला वास येत असेल तरी देखील  युरीन इन्फेक्शन (Urine Infection)  झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. युरीनला फेस येत असेल तरी देखील अशा इन्फेक्शनची शक्यता टाळता येत नाही. 

आता तुम्हाला हा काही त्रास होत असेल तरी देखील तुम्हाला  युरीन इन्फेक्शन (Urine Infection) झाल्याची शंका नाकारता येत नाही. 

27 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT