ADVERTISEMENT
home / मनोरंजन
लग्नानंतर लेकीची पाठवणी करताना भावूक झाला तारक मेहताचा ‘जेठालाल’

लग्नानंतर लेकीची पाठवणी करताना भावूक झाला तारक मेहताचा ‘जेठालाल’

हिंदी टेलीव्हिजनवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा आजवर पाहिली नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. लहान मुलं असो वा मोठी व्यक्ती सर्व जण ही मालिका एकत्र पाहून विनोदाचा आनंद लुटताना दिसतात. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे या मालिकीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा जेठालाल म्हणजेच अभिनेता दिलीप जोशीच्या खऱ्या आयुष्यात एक आनंदाची घटना घडली आहे. हे आनंदी आणि भावूक क्षण त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

35+ Wedding And Marriage Wishes, Quotes, Messages In Marathi 2021 | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

जेठालालच्या मुलीचे झाले लग्न

अभिनेता दिलीप जोशींनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले असले तरी त्यांना खरी ओळख मिळाली ती तारक मेहताचा उल्टा चष्मामधील जेठालाल या भूमिकेमुळे… त्यामुळे आज लोक त्यांना जेठालाल या नावानेच ओळखतात. या जेठालाल म्हणजेच दिलीप जोशींच्या मुलीचे लग्न नुकतेच पार पडले. एका वडिलांसाठी मुलीचे लग्न ही एक स्पेशल आणि भावूक करणारी गोष्ट असते. जेठालालनेही त्याच्या मुलीच्या लग्नातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

मासिक पाळीच्या काळातही वर्कआऊट करतेय सारा अली खान

ADVERTISEMENT

दिलीप जोशीने शेअर केली भावनिक पोस्ट

या फोटोंसोबत जेठालालने एक भावनिक पोस्टदेखील शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहीलं आहे, “चित्रपट आणि गाण्यांमधून तुम्ही भावना समजू शकता, पण जेव्हा एखादी गोष्ट तुमच्यासोबत खऱ्या आयुष्यात घडते तेव्हा तिची मजा काही वेगळीच असते. या दोन गोष्टींची तुलना होऊ शकत नाही.  माझी मुलगी नियती आणि माझ्या कुटुंबात सहभागी झालेल्या हर्षवर्धनला खूप शुभेच्छा देतो. त्या सर्व लोकांचे मला आभार मानायचे आहेत जे या आनंदाच सहभागी झाले. ज्यांनी ज्यांनी या नव्या दापंत्याला आर्शीवाद दिले. जय स्वामी नारायण” दिलीप जोशींच्या मुलीचे नाव नियती असून त्यांच्या जावयाचे नाव हर्षवर्धन आहे. हर्षवर्धन लोकप्रिय लेखक अशोक मिश्रा यांचा मुलगा आहे. नियती आणि हर्षवर्धन कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली आणि पुढे त्याचे प्रेमात रूपांतर झाले. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. खरंतर दिलीप जोशींच्या मुलीचे लग्न मागच्या वर्षीच ठरलं होतं मात्र लॉकडाऊनमुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. 

कतरिनाच्या अंगठी आणि मंगळसूत्राची का आहे चर्चा, जाणून घ्या किंमत

15 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT