ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
मासिक पाळीच्या काळातही वर्कआऊट करतेय सारा अली खान

मासिक पाळीच्या काळातही वर्कआऊट करतेय सारा अली खान

मासिक पाळी येतातच प्रत्येकीला हवा असतो फक्त आणि फक्त आराम…. पिरिएड सुरू होताच कोणतंही दैनंदिन काम करणं अक्षरशः नकोसं होतं. कारण या काळात पोटातून आणि कंबरेतून येणारे क्रॅम्प प्रचंड वेदनादायी असतात. थकवा जाणवत असल्यामुळे याकाळात नुसतं झोपून राहावं असंच प्रत्येकीला वाटत असतं. सहाजिकच मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास प्रत्येकीसाठी निरनिराळा असतो. मासिक पाळीचा नैसर्गिक असल्यामुळे या त्रासापासून सेलिब्रेटींचीही सुटका होत नाही. सध्या सारा अली खानला पिरिएड सुरू आहेत. मात्र या काळातही ती चक्क जीममध्ये जाऊन वर्क आऊट करतेय. यामागचं खरं कारण सध्या सारानेच तिच्या इनस्टाग्रामवर शेअर केलं आहे. 

ओळखा मासिक पाळी येण्याची लक्षणे | Masik Pali Yenyachi Lakshane

साराने शेअर केला खास व्हिडिओ

सारा अली खानने नुकताच जीममध्ये वर्कआऊट करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र हा तिचा नेहमीचा फिटनेस व्हिडिओ नाही. कारण यासोबत साराने एक खास मेसेज सर्व महिलावर्गासाठी शेअर केला आहे. साराने शेअर केलं आहे की, “आज मी सकाळी उठले तेव्हा मला असं वाटत होतं की, मी आज जीमला जाऊच शकणार नाही. मी खूप थकलेले होते, अशक्त वाटत होतं आणि पोटही खूप दुखत होतं. कारण आज माझे पिरिएड सुरू झाले. पण मग मी स्वतःला पूश केलं आणि जीममध्ये जाण्यासाठी प्रवृत्त केलं. जीममध्ये येऊन वर्कआऊट केल्यामुळे आता मला फिट वाटत आहे. मानसिक रित्या, शारिरीक रित्या, हॉर्मोनली आणि सर्वच बाजूने आता मला त्यामुळे खूप बरं वाटत आहे. मी हे करू शकले याबद्दल मला स्वतःचा खूप अभिमान वाटतोय. ” या व्हिडिओमध्ये सारा अगदी नेहमीप्रमाणे हेव्ही वर्कआऊट करताना दिसत आहे. साराने सर्व महिलांना मासिक पाळीच्या काळातही व्यायाम करायला हवा हा संदेश अप्रत्यक्षरित्या दिलेला आहे.

मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय (How To Reduce Menstrual Pain In Marathi)

ADVERTISEMENT

साराने मेहनतीने कमी केलं होतं स्वतःचं वजन

या व्हिडिओमधून साराचा व्यायाम करण्याबाबत असलेला प्रामाणिकपणा आणि मेहनत दिसून येते. कोणतंही कारण तिला व्यायामापासून दूर नेऊ शकत नाही. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापुर्वी सारा अली खानचे वजन जवळजवळ 96 किलो होतं. तेव्हादेखील तिने मेहनतीने स्वतःच्या डाएटवर नियंत्रण ठेवलं आणि सातत्याने व्यायाम केला. ज्यामुळे नंतर सारा फीट आणि सुडौल झाली. सारा आज बॉलीवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.  साराला आधी पॉली सिस्टिक ओव्हरी सिंड्रोमची समस्यादेखील होती. मात्र योग्य आहार, व्यायामाने तिने तिची आरोग्य समस्या स्वतःच दूर केली. सारा नेहमी सातत्याने व्यायाम करताना दिसते. वेकेशन अथवा शूटवर असतानाही ती व्यायाम करणं सोडत नाही.

मासिक पाळीच्या समस्या व उपाय (Menstrual Problem And Their Solution In Marathi)

14 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT