‘कढी’ हा प्रकार अनेकांच्या आवडीचा. दह्यात बेसन घालून किंवा नुसतं फोडणीच्या ताकाला ही काही जण कढी असे म्हणतात. तुम्ही कंधी सिंधी कढी असं काही ऐकलं आहे का? जर ऐकलं असेल तर या कढीतही दही असतं असचं तुम्हाला वाटेल. पण दही न वापरता केली जाणारी ही रेसिपी सिंधी घरांमध्ये अगदी आवर्जून केली जाते. सिंधी कढी ही पौष्टिक असते कारण त्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घातल्या जातात. सिंधी कढी ही बेसनपासून तयार केली जाते. पण ही कढी करण्याची नेमकी पद्धत कोणती ती जाणून घेऊया.
हाताची बोटं चाटत राहाल असा चविष्ट मसाला पाव बनवा घरी, सोपी रेसिपी
अशी करा सिंधी कढीची तयारी
सिंधी कढी घरी करणे फारच सोपे आहे. सिंधी कढी करण्यासाठी फार सामानही लागत नाही. फक्त ही कढी करण्यासाठी तुमच्याकडे थोडी सहनशक्ती आणि मनाची शांतता हवी. कारण खूप बारीक आचेवर ही शिजवावी लागते.
साहित्य: साधारण तीन टोमॅटो, अर्धा वाटी चिंचेचा कोळ, आवडीच्या भाज्या ( भेंडी, गवार, बटाटा किंवा आरवी,शेवगाच्या शेंगा) मीठ, साधारण एक वाटी बेसन, हळद, लाल तिखट
फोडणीसाठी : मोहरी, मिरची, मेथ्याचे दाणे, कडीपत्ता, किसलेलं आलं,
कृती :
- टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. टोमॅटोचे डोळे काढून ते शिजवण्यासाठी एका कुकरमध्ये टाका. त्यामध्ये थोडे पाणीही असू द्या. कारण आपल्याला टोमॅटोचे पाणी हवे आहे. साधारण 3 ते 4 शिट्ट्या घेऊन टोमॅटो चांगले शिजू द्या.
- सगळे साहित्य एकत्र केल्यानंतर आता फोडणीची तयारी करायची आहे. एका कढईत साधारण दोन चमचे तेल गरम करुन घ्या. तेल तापल्यावर त्यात मोहरी, मेथीचे दाणे चांगले फुटू द्या. हिरव्या मिरच्या, किसलेलं आलं आणि कडिपत्ता टाकून चांगलं परतून घ्या.
- आता यात बेसन घालून बेसन परतत राहा. तेल हे जास्त असेल तर बेसन चांगलं भाजलं जातं. बेसन जळता कामा नये. त्यामुळे आच कमी करुन बेसन चांगलं भाजून घ्या. त्याल हळद, लाल तिखट घालून चांगलं परतून घ्या.
- आता त्यात टोमॅटोचे सगळे पाणी घालून घ्या. मीठ घालून त्यात सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या घाला.
- ही आता कढी सध्या पातळ वाटेल. पण तुम्हाला आता भाज्या याच्यामध्ये शिजवायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ लागेल. तुम्ही छान ती मंद आचेवर शिजवून घ्या.
- भाज्या चांगल्या शिजल्या की, सगळ्यात शेवटी तुम्ही चिंचेचा कोळ घाला. कारण ही कढी थोडी आबंट गोड लागते. चिंचेचा कोळ घातल्यानंतर तुम्ही कढी फार उकळू नका. ती फार आबंट होण्याची शक्यता असेल.
- तयार सिंधी कढी तुम्ही मस्त जीरा- राईस सोबत खाऊ शकता.
आता काहीतरी वेगळं खाण्याचा मूड होतं असेल तर तुम्ही आताच सिंधी कढी करा आणि त्याचा आनंद घ्या.