ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
लाँग ड्राईव्हला जाताना

लाँग ड्राईव्हला निघण्यापूर्वी गाडीत असायला हव्यात या गोष्टी

 पावसाळ्याच्या या दिवसात वातावरण इतके मस्त असते की, या दिवसात मस्त पावसाळी कविता, पावसाळी पदार्थ- कांदा भजी, कॉर्नचा बेत आणि मस्त लाँग ड्राईव्ह.(Long Drive) या दिवसात भिजलेले रस्ते आणि बहरलेली झाडं पाहता. घरातून बाहेर पडून गाडीत बसून पिकनिकला जाण्याचे प्लॅन याच दिवसात बनतात. लाँग ड्राईव्हला जाण्याचा प्लॅन या दिवसात केला असेल तर तुमच्या गाडीत काही गोष्टी असायलाच हव्यात. त्या गोष्टी कोणत्या आणि त्यांचे नियोजन कसे असायला हवे. याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. 

( यातील बऱ्याच गोष्टी आपल्या घरातच असतात. पण त्या घेण्याचा विचार आपण करत नाही. त्यामुळे यासाठी खूप खर्च येईल असे अजिबात नाही.) 

छत्री किंवा रेनकोट

छत्री

पावसाच्या दिवसात सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे छत्री किंवा रेनकोट. गाडीत कायम बसून राहूच असे नाही. कधी कधी मस्त गाडी लावून रस्त्यांवर उतरुन मका, मॅगी खाण्याची मजा ही काहीतरी वेगळीच असते.  खूप जण गाडीतून जाताना नेमक्या या गोष्टी कशाला हव्यात याचा विचार करतात आणि घेत नाहीत. मग पाऊस असताना गाडीतून उतरणे कठीण होऊन जाते. अगदी आवर्जून जर तुम्हाला काही भरायचे असेल तर तुम्ही गाडीत छत्री ठेवा.

टॉवेल

लाँग रुट किंवा लाँग ड्राईव्हला निघाल्यानंतर खूप जणांचे प्लॅन अनप्लॅन्ड असतात. म्हणजे रस्ता तिथे जाऊ असेही खूप जण असतात. अशावेळी कधी भिजणं, खेळणे याच्यामध्ये अंग खराब होण्याची शक्यता असते. एक छोटासा टॉवेल हा अशावेळी आपल्याकडे हवा. हा टॉवेल घेताना तो पटकन सुकेल असा घ्या. शिवाय जर थंडी वाजली तर अशावेळीही त्याचा उपयोग करता येईल असा विचार करता. बाजारात जाड पण पटकन सुकणारे टॉवेल मिळतात. असे टॉवेल नक्की कॅरी करा. 

ADVERTISEMENT

स्किनकेअर रुटीन

 त्वचेची काळजी ही फारच महत्वाची असते. अशावेळी फेसवॉश, बॉडीवॉश, इंडिमेट वाईप्स, टुथब्रश अशा काही गोष्टी आपल्याकडे हमखास असू द्या. म्हणजे तुम्ही जिथे कुठे थांबाल तिथे तुम्हाला पटकन फ्रेश होता येईल. इतकेच नाही तर राहायची वेळ आली तर तुमची गैरसोय होणार नाही. पण हे सगळे साहित्य नीट एका पाऊचमध्ये भरा. म्हणजे ते सांडण्याची भीती नाही

पाणी आणि खाऊ

कुठेही आणि कधीही जा  पाणी आणि खाऊशिवाय लाँग ड्राईव्ह पूर्णच होऊ शकत नाही. पाणी ही अशी गोष्ट आहे जी जास्त झाली तर चालेल पण कमी होता कामा नये. त्यामुळे शक्य असल्यास पाण्याचा बॉक्स घ्या. पाणी संपल्यानंतर रिकामी बाटली अजिबात फेकू नका. कारण त्याचा उपयोग तुम्हाला इतर काही कारणांसाठी करता येऊ शकतो. शिवाय खाऊ घेणे तितकेच महत्वाचे असते. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाताना सगळीकडे खाऊ मिळेल असे नाही. अशावेळी काही सुके खाऊचे पदार्थ गाडीत ठेवा. त्यामुळे सोबत लहानमुले असली तर तुमची अबाळ होणार नाही. 

औषधे

औषधांचा डबा

शेवटचे आणि सगळ्यात महत्वाचे ते म्हणजे काही बेसिक औषधे. जुलाब,सर्दी, डोकेदुखी आणि ताप यावरील सर्वसाधारण गोळ्या तुमच्याकडे असायला हव्यात. त्यामुळे तुम्हाला जर अचानक बरं वाटत नसेल तर त्यावर पटकन इलाज करता येईल. पावसाळ्यातील लाँग ड्राईव्हच्या दरम्यान खूप वेळा भिजणं होतं. त्यामुळे डोकेदुखी, सर्दी होणे अगदी साहजिक आहे. अशावेळी साध्या गोळ्याही काम करतात. 

आता लाँग ड्राईव्हला निघण्यापूर्वी या गोष्टी गाडीत घेतल्या की, नाही याची खातरजमा करा. 

ADVERTISEMENT
04 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT