बऱ्याचदा असं म्हटलं जातं की, नातं टिकण्यासाठी मुलाकडे योग्य पैसा आणि मुलीला देण्यासाठी योग्य सेक्स (Sex) या दोन गोष्टी खूपच महत्त्वाच्या असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? मुली सहसा मुलांमध्ये अशा कोणत्या गोष्टी पाहतात ज्या नातं टिकण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. बऱ्याचदा मुलांना असं वाटतं की आपल्याकडे पैसा असला अथवा आपण व्यवस्थित आपल्या जोडीदाराला सेक्समध्ये समाधान देत आहोत, यामुळे आपला जोडीदार नक्कीच सुखी असेल. पण असं अजिबात नाही. कोणत्याही इंटिमसी (Intimacy) पेक्षा मुलींना अशा काही गोष्टी आपल्या जोडीदाराकडून अपेक्षित असतात, ज्या तुम्ही जाणून घेणे आहे गरजेचे. तुम्हीही तुमचे नाते टिकविण्यासाठी याचा आधार नक्कीच घेऊ शकता. जाणून घेऊया मुलींसाठी काय आहेत महत्त्वाच्या गोष्टी.
एकमेकांच्या डोळ्यात पाहून बोलणे
डोळे हा तुमच्या मनाचा आरसा असतो असं म्हटलं जातं. आपल्या जोडीदाराबाबत बोलताना अथवा कोणतीही गोष्ट तिच्याशी शेअर करताना तिच्या डोळ्यात पाहून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. कारण तुम्ही खरं बोलत आहात हे तिला तुमच्या बोलण्यातून कळते. त्याशिवाय तुमच्या बोलण्यातून तिच्याविषयीचे प्रेम आणि काळजी व्यक्त होते हे पाहणे कोणत्याही मुलीला अधिक आवडते. त्यामुळे कधीही नजर चोरून आपल्या जोडीदाराशी बोलू नका. याशिवाय डोळ्यातूनच तुमचे प्रेम अधिक कळते. त्यामुळे मुलीसाठी हे अधिक महत्त्वाचे असते.
बेडवर एकमेकांच्या मिठीत विसावून गप्पा मारणे
एकमेकांबाबत प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी सेक्सचीच गरज नसते. तर मुलींच्या दृष्टीने कधीकधी जेव्हा त्या भावनिक असतात, तेव्हा त्यांना अधिक जवळ घेऊन केवळ त्यांना स्पर्शाने आपण आहोत हे जाणवून देणे अधिक गरजेचे आहे. बेडवर आपल्या जोडीदाराला जवळ घेऊन अथवा मिठीत घेऊन गप्पा मारणे आणि तिच्या मनातील गोष्टी जाणून घेणे मुलींसाठी महत्त्वाचे असते. केवळ सेक्स हा जवळ असण्याचा पर्याय असू शकत नाही. कधी कधी सेक्सपेक्षाही मनाने जवळ येणे मुलींसाठी अधिक महत्त्वाचे आहे.
अधिक वाचा – तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स
आजारी पडल्यावर काळजी घेणे
तुम्ही जवळ असाल अथवा नसाल, जेव्हा तुमची गर्लफ्रेंड अथवा बायको आजारी पडते तेव्हा तिची काळजी घेणे, तिला काय हवं नको ते पाहणे आणि तिची काळजीने विचारपूस करणे हे अधिक महत्त्वाचे ठरते. कारण बरं नसताना शारीरिक थकव्यासह मानसिक थकवाही येत असतो. सहसा महिलांना अशावेळी आपली काळजी करणारं कोणीच नाही असं वाटत असतं. त्यामुळे अशावेळी तिला शारीरिक आणि मानसिक आधार देत तिची काळजी करणं हे कोणत्याही मुलीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यातून जोडीदाराला आपल्याबद्दल वाटणारी काळजी आणि प्रेम व्यक्त होतं असं मुलींना वाटतं. त्यामुळे हे कोणत्याही मुलाने आपल्या जोडीदारासाठी करायला हवे.
अधिक वाचा – Love Test – जीवनसाथी बनविण्यासाठी विचारा हे प्रश्न
तुमच्या भावना वेळोवेळी करा व्यक्त
नेहमीच शारीरिक जवळ येणे ही मुलींसाठी गरज असते असं नाही. तर शब्दातून भावना व्यक्त करणे हे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. आपल्या जोडीदाराला आपल्याबाबत काय वाटत आहे अथवा आपण कसे दिसत आहोत, आपण कसे वागतोय आणि आपल्याबाबत त्याला वेळोवेळी काय वाटत आहे, याबाबत मुलींना जाणून घेण्यात अधिक रस असतो. त्यामुळे जोडीदाराने तिच्याबाबत नेहमी सतर्क राहून तिला शब्दातून आपल्या मनातील भावना सांगायला हव्यात. यामुळे ती सुखावते आणि तिला आपला जोडीदार हा आपलाच असून त्याचे आपल्यावरच प्रेम आहे, ही भावना कायम राहते आणि ती तितक्याच आपुलकीने जोडीदाराची काळजी घेते आणि प्रेमाने वागते. कधीतरी तिच्यासाठी एखादी चारोळी अथवा कविता लिहूनही भावना व्यक्त केल्यास, तिला आपण अधिक विशेष असल्याचे जाणवते.
अधिक वाचा – रोमान्स करावा वाटत असेल तर जोडीदाराला द्या अशी Hint
एकत्र राहा आणि वेळ घालवा
कधी कधी काहीही न करता केवळ एकमेकांबरोबर राहणे हेदेखील सुखावह असते. मुलींसाठी आपला जोडीदार आपल्या आजूबाजूला असावा यासारखे काहीच सुख नाही. त्याला आजूबाजूला बघून त्यांना आनंद मिळत असतो. त्यासाठी त्याला बिलगून राहायची अथवा मिठीत राहायची अथवा सतत बोलत रहाण्याचीही गरज भासत नाही. त्याच्या असण्यानेही तिचं जग आणि मन भरलेलं राहतं. त्यामुळे कधीतरी तिला हवा तसा वेळ तिला द्या आणि तिच्यासोबत वेळ घालवा. यासाठी वेगळं काहीही करण्याची गरज भासत नाही.
सेक्स हा बहुदा महिलांसाठी दुय्यम भाग असतो. मुलींसाठी या सर्व गोष्टी सेक्सपेक्षाही अधिक महत्त्वाच्या असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराला अर्थात गर्लफ्रेंड – बायकोला आनंदी ठेवायचे असेल तर तुम्ही नक्की या गोष्टी करून पाहा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक