ADVERTISEMENT
home / Love
ways-to-tell-your-partner-you-want-to-be-intimate

रोमान्स करावा वाटत असेल तर जोडीदाराला द्या अशी Hint

एकमेकांबरोबर राहणं, एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांवर प्रेम करणं हे प्रत्येक कपल्ससाठी (Couple) खास असतं. पण काही जोड्या अशाही असतात ज्यांना आपल्या जोडीदाराला आपल्याला रोमान्स करायचा आहे हे बिनधास्तपणे सांगता येत नाही अथवा आपल्या मनातील भावना पटकन मांडता येत नाही. आपल्याला आपल्या जोडीदारासह इंटिमेट (Intimate) व्हायचं आहे, असं सांगायला त्यांना जमत नाही. तर काही महिला आपल्याला रोमान्स करायचा हे लाजेपोटी न सांगता आपल्या भावना मनात तशाच राहू देतात. कारण आपण जर आपल्या भावना व्यक्त केल्या तर आपल्या जोडीदाराला काही वेगळं तर वाटणार नाही ना अथवा आपल्याबाबत काही चुकीचा गैरसमज तर करून घेणार नाही ना असंही त्यांना वाटत असतं. तुम्हालाही असं काही वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला आपल्याला रोमान्स करावा वाटत आहे याची हिंट (Hint) आपल्या वागण्यातून देऊ शकतात. व्हॅलेंटाईन्स डे च्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आम्ही काही सोप्या टिप्स तुम्हाला सांगत आहोत. हे तुमच्या नात्यात करणं गरजेचे आहे कारण तुमचे नाते यावर अधिक टिकून राहते आणि तुमच्या आयुष्यातील रोमान्सदेखील. या टिप्सचा वापर करून तुमचा आज रोमान्स करण्याचा मूड आहे हे तुम्ही तुमच्या जोडीदाराला नक्की सांगू शकता.  

जोडीदाराचा हात पकडा (Hold his hand)

कोणत्याही महिलेला आपल्या जोडीदाराने हात पकडलेला अतिशय आवडते. तिला त्याच्या हात पकडण्याने अधिक सुरक्षित आणि अधिक आपलेपणा जाणवतो. तुम्हाला रोमान्स करण्याचा मूड असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराचा हात पकडा आणि हात अतिशय हळूवारपणे प्रेमाने आपल्या हाताने हातात घेऊन त्यावर फिरवत राहा. तुमच्या वाईब्स (Vibes) आणि स्पर्शाने तुमच्या जोडीदाराला नक्की तुम्हाला काय म्हणायंच आहे हे जाणवतं. तुमचा जोडीदार एकटा असेल अथवा कामात असेल आणि तुम्हाला असा मूड असेल तर अशा प्रकारे हातात हात घेऊन तुमच्या स्पर्शाने तुम्ही त्यांना तुमच्या मनातील भावना जाणवून देऊ शकता. तुमचा असा संकेत त्यांना समजणं नक्कीच कठीण नाही. 

त्यांची प्रशंसा करा (Praise him or her)

तुम्ही तुमच्या जोडीदाराला ते कोणत्या खास कपड्यांमध्ये चांगले दिसतात अथवा दिसते याबाबत सांगा. तसंच त्यांनी आज एखादा विशिष्ट शर्ट अथवा ड्रेस घालावा याबाबत तुम्ही त्यांचे मन वळवा. त्यांनी घातलेल्या कपड्यांनंतर तुम्ही त्यांची प्रशंसा करा आणि त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढविण्यास मदत करा. तसंच तुमचा मूड असेल तर तुम्ही त्यांच्या शरीराच्या एखाद्या भागाची अथवा तुमच्यामधील एखादा ठरलेला शब्द असेल जो इतर कोणालाही माहीत नसेल अशा शब्दात त्यांची प्रशंसा करा, जेणेकरून तुमचा रोमान्सचा मूड आहे हे त्यांना जाणवेल. अशावेळी आपल्या जोडीदाराला लाजेने चूर होताना पाहणं हा वेगळाच अनुभव असतो.

फुलांचा करा वापर (Use flowers)

प्रेम आणि रोमान्सची भावना जर जोडीदाराला न बोलता सांगायची असेल तर फुलांचा नक्कीच चांगला वापर करता येतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराला जर रोमँटिक मूडचा संकेत द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला फुलांचे गजरे द्या अथवा आपल्या बेडरूमध्ये गुलाबाच्या पाकळ्या पसरून ठेवा. तुम्हाला हवं असेल तर तुमच्या जोडीदाराला आवडत असलेल्या फुलांच्या पाकळ्या बेडवर पसरून ठेऊ शकता. यापेक्षा अधिक रोमँटिक आणि रोमान्सचा संकेत काय असू शकतो नाही का?

ADVERTISEMENT

स्टिकी नोट्सची घ्या मदत (Take help of Sticky Notes)

तुम्ही कोणत्याही प्रकारची गोष्ट नीट व्यक्त करू शकत नसाल तर तुम्ही स्टिकी नोट्सचा आधार घ्या. या नोट्समध्ये तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या वेळा माहीत असायला हव्यात. बाथरूमच्या आरशापासून ते बेडरूमच्या कपाटाच्या आरशापर्यंत त्याला संकेत देणाऱ्या नोट्स अथवा प्रेमाच्या चारोळ्या अथवा अशा प्रेमाचे भाव व्यक्त करणाऱ्या अथवा संकेत देणाऱ्या कविता तुम्ही त्यांच्यासाठी लिहू शकता. हे अत्यंत रोमँटिक आणि सुंदर भावना असून तुमच्या जोडीदाराचा मूड बनविण्यासाठीही फायदेशीर आहे. 

जोडीदाराला मिठी मारणे (Cuddle him or her)

न बोलता सर्वाधिक प्रेम अथवा रोमान्स व्यक्त करण्याची भावना म्हणजे आपल्या जोडीदाराला मिठी मारणे. यावरून तुमच्या मनात काय चालले आहे हे कळून येते. तुमच्या जोडीदाराच्या स्पर्शातून आणि मिठीतून त्याच्या अथवा तिच्या मनातील भावना पटकन तुम्हाला कळते. कधी कधी शब्दातूनही व्यक्त होत नाही ते मिठीतून आणि स्पर्शातून व्यक्त होत असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा सहवास हवा असेल आणि रोमान्स करावा वाटत असेल तर त्याला मनापासून मिठी मारा. 

तुमचाही जेव्हा असा रोमान्सचा मूड होत असेल तेव्हा हे सोपे उपाय नक्की करून पाहा आणि आपल्या जोडीदारासह प्रेमाच्या सागरात बुडून जा!

24 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT